Login

गुरूदेव भव:

लघुकथा
गोष्ट छोटी डोंगराएवढी

विषय_ गुरूने दिला ज्ञानरूपी वसा

शीर्षक _ गुरुदेव भवः

"आई पहिली गुरू, आईविना जीवन नाही सुरू".
आईच्या गर्भात असल्यापासून सुयोग्य गर्भसंस्कार करणारी, जन्मनंतर रंगायला, चालायला व बोलायला शिकवणारी, नैतिक मूल्ये रूजविणारी, सामाजिक व धार्मिक संस्कार करणारी, व सुजाण नागरिक बनविणारी पहिली गुरु म्हणजेच आई.आईइतकेच वडीलांचेही महत्व आहे.
आई वडीलानंतर संपर्कात येणार्‍या प्रत्येक व्यक्तींकडून आपण काहीतरी शिकत असतो म्हणून त्या सर्वच व्यक्ती गुरुस्थानी असतात.
आईवडीलानंतर शाळेत शिकविणाऱ्या गुरुंचे/शिक्षकाचे महत्वाचे स्थान असते.
*मी प्रायमरी शिक्षण घेत असतांना स्वतःकडे. श्री उपाध्ये गुरूजी यांनी पावकी, निमकी, पाढे पाठ करुन घेतले.त्यांना मी कधीही विसरू शकणार नाही.
प्राथमिक शिक्षणासाठी आजोळी कारंजा (लाड) येथे राहत असतांना माझे आजी-आजोबा, मामा मावशी या सर्वांनी शिस्त व वळण लावले. धार्मिक संस्कार केले*
इयत्ता ५ ते ७ वी शिक्षण घेत असतांना श्री राळेकर सर इंग्रजी व गणित शिकवायचे. त्याच्या अध्यापनाच्या प्रभावी शैलीमुळे व वारंवार प्रेरणात्मक कृतीमुळे माझा गणित व इंग्रजीचा पाया पक्का झाला.
इ ८वी ते १०वी शिक्षण घेत असतांना आ.श्री वडतकर सर यांनी इंग्रजी व आ. श्री वैरागकर सर यांनी गणित विषयाची गाडी वाढविल्यामुळे मी गणित व इंग्रजी विषयांवर प्रभुत्व मिळविले व पुढे गणिताच्या शाखेत उच्चशिक्षण घेऊन आज मी गणिताचा अध्यापक म्हणून गुरूदेव समंतभद्र विद्यामंदिर वेरूळ येथे प. पू.आचार्य आर्यनंदी महाराज यांच्या मंगल आशिर्वादाने आजतागायत कार्यरत आहे.
आ. श्री पन्नालालजी गंगवाल(काकाजी),स्व.श्री.तनसुखलालजी ठोले, स्व.श्री.देवकुमारजी कान्हेड,आ.श्री.निर्मल सर, आ. श्री बोराळकर सर व माझे सर्व सहकारी शिक्षक बंधू -भगिनी, माझे शिक्षक मित्र, माझा मित्रपरिवार, सगेसोयरे, माझे विद्यार्थी व त्यांचे पालक हे सर्व मला विविध टप्प्यांवर भेटलेले गुरूच आहेत कारण या सर्वांकडून मी काहीतरी शिकत आलेलो आहे.
लग्नानंतर माझ्या पत्नीकडून मला अनेक गोष्टी शिकायला मिळाल्या व अजुनही मिळत आहेत.
माझ्या दोन्ही मुलांकडून मी सतत काहीतरी नवीन शिकत असतो.
माझ्या जीवनात आजपर्यंत अनेक व्यक्तींकडून मला शिकायला मिळाले व मिळत आहे म्हणून मी त्या सर्वांचा कायम ऋणी आहे
गुरूंचा महिमा अगाध आहे.
गुरू हे अंधःकारातून प्रकाशाकडे नेण्याचे कार्य करतात.योग्य दिशा दाखवून प्रगतीची व विकासाची द्वारे खुली करून देतात.
अशा सर्व गुरुंना मी शत शत वंदन करतो
गुरूर्बह्मा गुरूर्विष्णू गुरूर्देवो महेश्वरा ।
गुरू: साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नम: ।।

©® श्री सुहास अजितकुमार मिश्रीकोटकर ,औरंगाबाद