हा दुजाभाव कशासाठी भाग 2
आज यांना घरी यायला खूप उशीर झाला? साडे सहाला ऑफिस सुटतं. बहुतेक जास्तीच काम आहे वाटतं . दीप्तीचा स्वयंपाक झाला होता. तिने सासुबाई आणि जाईला जेवायला वाढलं. जेवण झाल्यावर सासुबाई पुढे जावून बसल्या. सासरे दहा वर्षापुर्वी वारले होते. आकाशने कष्ट करून शिक्षण पूर्ण केल होत. अतिशय मेहनती होते ते माय लेक.
दीप्तीने मागच आवरल. दोन तीनदा फोन बघितला. आकाशला आठ नंतर फोन करून बघू.
आकाश आले की विचाराव लागेल . रोहनसाठी तरी मुलगी बघायला जाव लागेल. तो खूप चांगला आहे मी गेली नाही तर तो मला घ्यायला येईल. हे ऐकतील की नाही काय माहिती. त्यांना तिकडे आवडत नाही.
बरोबर आहे त्यांच. आई कस करते नेहमी दोन जावयां मधे भेदभाव करते . ती आमच्या दोघांशी अस का वागते ते समजत नाही? तरी आकाश कधीच मला किंवा माझ्या घरच्यांना काही म्हणत नाही . दुर्लक्ष करतात.
आई ताई जिजाजींचा किती मान ठेवते. आम्हाला पाण्यात बघते. जिजाजी श्रीमंत आहेत. त्यांच्या मोठा बिझनेस आहे. शेती, घर, गाडी सगळ आहे. अर्थात यात त्यांची मेहनत आहे. मला ही आवडतात ते दोघ. खूप चांगले आहेत. मला लहान बहिणी प्रमाणे मानतात. जाईचे किती लाड करतात.
पण आईच्या प्रत्येक वाक्यात ते कसे चांगले आम्ही खराब अस असत. हे काही मला पटत नाही. हे जॉब करतात तेच आवडत नाही तिला. तरी हे इंजिनियर आहेत अत्यंत हुशार. सुरुवातीला स्ट्रगल असतोच. बिझनेस नौकरीचा फरक पडतोच. आमच व्यवस्थित सुरू आहे त्यात मला काही अडचण वाटत नाही. यांच चांगल वागणं, चांगला स्वभाव, हुशारी, किती गुण आहेत. आणि आई बाबांनीच शोधले ना हे स्थळ माझ्यासाठी. अरेंज मॅरेज झाल आमचं. मग आता का दुजाभाव.
पैसा सगळं काही असत का? किती सुखी आहे मी यांच्या सोबत ते आईला दिसत नाही का? आमच ही स्वतः च घर आहे. मोटर सायकल आहे. दोन पैशाच कर्ज नाही. यांना कसल व्यसन नाही. सगळा कारभार माझ्या हातात. अजून काय हवं. आई दोघ जवायांना समान वागणूक का देत नाही?
बाहेर परिचित मोटर सायकलचा आवाज आला. आकाश आत आले. दीप्ती कडे डबा दिला. बॅग जागेवर ठेवली. दीप्तीने डबा घासायला टाकला. प्यायला पाणी दिलं.
"आज उशीर झाला?"
"हो मोठ्या ऑर्डरच काम सुरू आहे. अजिबात वेळ नाही."
झाल आता काय सांगणार यांना. आईकडे जायच आहे. हे बिझी आहेत वाटतं.
तिने भाजी गरम केली. भांडी खाली घेतली. दोन ताट केले. आकाशने सवयी प्रमाणे विचारल आई आणि जाईच जेवण झाल का?
हो.
ते फ्रेश होऊन आले. "चल तू."
"हो पाणी घेते." दोघंच जेवण झालं. आकाश पुढे आई सोबत बोलत होते. दीप्तीने झाकपाक केली. गाद्या घातल्या ती जाईला गोष्ट सांगत होती. ती झोपली.
आकाश टीव्ही बघत होते. सासुबाई पुढे कॉटवर झोपल्या होत्या. काय करू बोलू का आता. हे आत का येत नाही. ती त्यांच्या जवळ जावून बसली. तिची अस्वस्थता त्यांना समजली.
"काय झालं?" त्यांनी विचारल.
"आईचा फोन आला होता. रोहन साठी मुलगी बघायला जायचं आहे."
कधी?
"पर्वा कार्यक्रम आहे. उद्या जाव लागेल आई कडे."
"ठीक आहे तू जाईला घेवून जा."
"तुम्ही नाही येणार का?"
"माझ नाही जमणार खूप काम आहेत सुट्टी मिळणार नाही."
"अहो पर्वा सुट्टी आहे ना. रविवार. याल का तुम्ही? "
तो तिच्या कडे बघत होता. तिची इच्छा होती त्याने याव तिच्यासाठी तो तयार झाला." ठीक आहे तू जा उद्या मदतीला. मी येतो पर्वा. मग सोबत घरी येवू. "
चालेल. ती खुश होती.
" जाई झोपली का? " त्याने सहेतुक विचारल.
ती हो म्हणाली.
आलोच. ती आत जावून पडली.
तो बातम्या बघत होता.
थोड्या वेळाने त्यांनी टीव्ही बंद केला. "आई उद्या दीप्ती तिच्या आईकडे जाईल. "
हो.
आकाश आत आले. त्यांनी दार लावून घेतल.
©️®️शिल्पा सुतार
