Login

हा दुजाभाव कशासाठी भाग 3

माणसाने माणसावर माणूस म्हणून प्रेम करावे गरीब श्रीमंत अस काही नसत
हा दुजाभाव कशासाठी भाग 3

दुसर्‍या दिवशी दीप्ती आवरुन तयार होती. "आकाश तुम्ही उद्या वेळेवर या."

"हो. हे घे. " त्यांनी तिला हजार रुपये दिले. ते ऑफिसला गेले.

दीप्ती आवरून तयार होती. "आई तुम्ही येता का?"

"नाही तू जावून ये. आकाशच आजच बघाव लागेल."

ती जाईला घेवून निघाली. दोन तास लागत होते आईकडे जायला. स्टँड वर बाबा आले होते घ्यायला. रिक्षा करून ते घरी निघाले. जाई बाबांजवळ होती. रस्त्यात तिला खाऊ घेतला.

"नोकरी वगैरे नीट सुरू आहे ना आकाश रावांची? " बाबा चौकशी करत होते.

" हो बाबा बिझी असतात ते. "

" इंजिनिअर आहेत ते. महत्वाचे काम असतात ऑफिस फॅक्टरी मधे. त्यांच्या इतक शिकलेल आपल्या घरात कोणी नाही. "

दीप्तीला आकाशचा एकदम अभिमान वाटला. पण आईला समजत नाही ना हे. तिच्या पुढे हुशार लोकांना किम्मत नाही. पैसा आहे म्हणजे झालं.

अलका ताईंना पैसा, स्टेटस ह्या गोष्टी माणुसकी पेक्षा जास्त प्रिय होत्या. बाबा साधे होते. ते नेहमी लोक जपून होते. त्यांच्या मित्राच्या ओळखीने आकाशच स्थळ सांगून आल होत. तेव्हा आईने नाक मुरडल होत. "अहो त्यांची खूप सामान्य परिस्थिती आहे."

"मुलगा चांगला आहे शिकलेला आहे."

"पण ही परिस्थिती नीट व्हायला बरेच वर्ष जातील माझ्या मुलीची."

"आता आपण हा निर्णय दीप्तीला घेवू दे तू मधे मधे करू नकोस." बाबांनी खडसावले.

आकाश दीप्ती एक दोनदा भेटले, बोलले. तिला त्यांचा प्रामाणिक पणा साधी रहाणी आवडली. तिने होकार दिला.

तो राग अजून आई धरून आहे. मी नाही म्हटले तरी हिने होकार दिला. इगो दुखावला गेला. त्या सारख दीप्ती आकाशचा अपमान करत होत्या. त्यांच्या परिस्थिती वरून बोलत होत्या. बाकीच्यांनी लक्ष्यात यायच की नाही माहिती नाही पण यामुळे दीप्ती कंटाळून गेली होती. काय कमी आहे आमच्यात? नेहमीच आहे. आईच्या घरी यायचा कंटाळा येतो.

घर आल. रोहन पुढे येऊन भेटला. त्याने लगेच जाईचा ताबा घेतला. जाई पण खुश होती मामा सोबत.

"काय ग तुम्ही दोघी आल्या? सासुबाई नाही आल्या का तुझ्या?" अलका ताईंनी विचारल.

" नाही त्या पुढच्या कार्यक्रमाला येतील."

चहा झाला.

"रोहन वहिनीचा फोटो तरी दाखव." रोहन आणि दीप्ती बोलत बसले. खूप खुश होता रोहन.

"ताई कधी येणार आहे?" त्यांनी लगेच तिला फोन लावला.

ताई संध्याकाळी येणार होती. "काही आणायचं आहे का आईला विचार?"

आईने बरंच सामान सांगितलं होतं.

"अगं एवढं सामान आणायचं होतं तू मला पण सांगायचं ना. " दीप्ती बोलली.

"जाऊ दे बाई तुला काय सांगणार. तुमचंच घोडं लंगडं. " अलका ताई बोलल्या.

" म्हणजे काय आई?" दीप्ती दुखावली गेली.

"तू तुझी कशी करते तिकडे तुझं तुला माहिती.
त्यात अजून आमचा खर्च कशाला. "

" नाही आई काही त्रास नाही मला तिकडे. मी मजेत आहे."

"बोलायच्या गोष्टी असतात ह्या. सामान्य परिस्थिती कस धकत आपल आपल्याला माहिती." अलका ताईंची बडबड सुरू होती. त्या उद्याची तयारी करत होती.

" अरे वाह बरीच तयारी झाली तुझी आई. "

" हो मग घराण तस आहे तोलामोलाच. मुलगी पसंत आहे आम्हाला. उद्या तुम्हा बहिणींना दाखवल की लगेच तारीख धरायची आहे. "

बर्‍याच काठ पदराच्या साड्या दिसत होत्या. सोन्याचा नेकलेस सेट ही समोर होता. "आई छान झाली खरेदी."

"हो ना लग्नात माधुरी साठी अजून दागिने करणार आहे मी. " अलका ताई ठसक्यात म्हणाल्या.

" अरे वाह. "

" अरे मग ती आमची सून आहे. कुठलीही गोष्टीची कमी पडायला नको. जावई कुठे आहेत ते नाही आले का?"

" उद्या येतील ते आज सुट्टी नाही."

"हे अस आहे तुमच. घ्यायची एखाद्या वेळी सुट्टी. आज रात्री मोठे जावई येतील जेवणाचा चांगला बेत होता. बोलवून घे त्यांना ." अलका ताईंनी हुकूम सोडला.

"आई अग ते बिझी आहेत नुसत्या जेवणासाठी त्यांना बोलवता येणार नाही. त्यांच खूप महत्वाच काम सुरू आहे." दीप्ती बोलली.

"कसलं महत्त्वाचं काम? दुसर्‍या कडे जॉब आहे त्यांचा. एवढ काय जीव तोडून काम करता आहेत."

" अस व्यवस्थित काम केल तर नोकरीत चांगल होत. शिकायला मिळत. बढती होते. "

" तू इकडे असताना छान काम करत होती. तिकडे पण सुरू कर. "

" हो मी पण देणार आहे यांच्या कंपनीत इंटरव्यू. जाई राहील सासूबाईंकडे. ती पहिलीच गेली की करेल सुरुवात. " दीप्तीच पूर्वी पासून हेच ठरल होत.

" जाईला सांभाळतील का पण तुझ्या सासुबाई ?"

" हो आई खूप चांगल्या आहेत. " दीप्ती बोलली.

" तुमच स्वतः च पुढे मागे काही तरी सुरू करा. मोठ्या जावई सारख. "

" बघू पैसे लागतात त्याला. काही मदत हवी असेल तर बाबांना सांगून बघ. "

" नको आई यांना आवडणार नाही आणि स्वतःचा बिजनेस करणं म्हणजे सोपं नाही. हे इंजिनियर आहेत म्हणजे त्यांना फॅक्टरी टाकावी लागेल. करोडो रुपये लागतील सध्या तरी शक्य नाही. "