हा दुजाभाव कशासाठी भाग 4
संध्याकाळी ताई जिजाजी आणि त्यांचा सुमीत आला. खूप मजा येत होती. जाईचे खूप लाड होत होते.
"आकाश कुठे आहे? "
"ते ऑफिसमधे बिझी आहेत." दीप्तीने सांगितल.
"हो काम असतात. आम्हाला खूप अभिमान आहे त्यांचा." मोठे जिजाजी म्हणाले.
"कसला काय उगीच लोकांचे काम उपसत बसतात. मला अजिबात पटत नाही. मी तर म्हटलं होतं दीप्तीला त्यांना बोलावून घे सगळे जमले आहेत तर चांगले वाटतं." अलका ताई बोलल्या.
" आई काय बोलते आहे समजत का? काम हे काम असत. त्यावर आमच घर चालत. " दीप्ती चिडली.
" हो ना आई. काहीही काय तुझ. " ताई पण बोलली.
"आई नेहमी यांच्या नौकरी वरून बोलते. मला आवडत नाही. "
"दीप्ती तू शांत हो." ती आत निघून गेली.
बाबा आले.
"बाबा बघा ना आई कशी करते." ताईने कंप्लेंट केली.
"काय झालं?"
"नेहमी आकाश रावांना नोकरी वरून बोलत असते. कस वाटत ते. मला अजिबात आवडल नाही आईच वागण. दीप्ती चिडली होती आत्ता. " ताई सांगत होती.
ते अलका ताईंकडे रागाने बघत होते.
"दीप्ती बेटा इकडे ये." बाबा दीप्तीला घेऊन बाहेर गेले. "तुझ्या आईच्या बोलण्याकडे लक्ष देऊ नको. तुझं मन दुखलं का? मी माफी मागतो. "
" बाबा तुम्ही का माफी मागता. " दीप्तीला कसतरी वाटल.
" तुझ्या आईला वागण्या बोलण्याची समज जरा कमी आहे हे माहिती आहे ना तुला. मी समजावतो तिला."
"काही हरकत नाही बाबा. पण आता उद्या जर वहिनी आली तरी आई अशीच करणार आहे का? तुम्ही बघतात ना कीती किती टोचून बोलते. अगदी मनाला लागतं तिचं वाक्य आणि हे वाईट असते तर काही हरकत नव्हती नाव ठेवायला . पण हे किती चांगले आहेत. नाव ठेवायला अजिबात जागा नाही. तर मी का ऐकून घेऊ तिचं."
" बरोबर बोलते आहेस तू आमच्या जावई लाखात एक आहे. त्रास करून घेवू नकोस या वेळी हा प्रॉब्लेम आपण नक्की सोडवू. " बाबांनी आश्वासन दिलं.
रात्री जेवणाचा छान बेत होता. आकाशचा फोन आला. दीप्ती बाहेर जाऊन बोलत होती. रोहनने फोन घेतला. " जिजाजी उद्या सकाळी लवकर या तुम्ही आल्याशिवाय मी निघणार नाही. "
" नक्की येईल मी. "
" आत्याबाईंना पण सांगा."
हो.
सकाळी सगळे माधुरीकडे जायची तयारी करत होते. ताई तयार होती. दीप्ती साडी नेसत होती.
"थांब दीप्ती ती नको ही साडी नेस." त्यांनी दुसरी लाल साडी तिला दिली.
"नको आई मी माझी साडी नेसते. "
" आमच्या साड्या किती छान आहेत. तू साधी दिसते. हा माझा नेकलेस घाल. आणि काय हे फक्त दोन सोन्याच्या बांगड्या? तू अजून दोन करणार होती ना?" अलका ताईंच तेच सुरू होत.
"आई घरात खर्च असतो. कमावणारे हे एकटे आहेत . मला नको दागिने. असू दे मी जशी आहे तशी. साधी तर साधी."
ताई ऐकत होती. "आई इकडे ये." त्या दोघी किचन मधे गेल्या." काय चाललय तुझ? दीप्तीला कशाला सदोदित बोलतेस? "
" अग ती साधी दिसते." अलका ताई बोलल्या.
" काही नाही छान दिसते आहे ती. " ताई बोलली.
"दागिने नाही काही नाही. "
" नसु दे त्यांना जमेल तेव्हा करतील. अस तू तिचा चार चौघात अपमान नको करत जाऊ. तुला समजत नाही का. उद्या या घरात नवीन मेंबर येणार आहे. ती पण उद्या तुझा ऐकून दीप्तीला असच बोलेल. चालेल का तुला? "
अलकाताई थोडा विचार करत होत्या.
आकाश आले. जाई त्यांच्या जवळ होती. ते बाबां सोबत बोलत होते. मोठे जावई सोबत होते. मस्त गप्पा सुरू होत्या. दीप्तीने चहा ठेवला.
अलकाताई किचन मध्ये आल्या." दीप्ती आकाश रावांना कुर्ता घालायला सांग. बाकीचे घालता आहेत. "
" यांना नाही आवडत."
"त्यांचा शर्ट साध वाटतो आहे."
"नवीन आहे."
"दुसरा आणून घ्या नाही तर."
"आई मी अस करणात नाही. तू आमच्या पेक्षा रोहनकडे लक्ष दे." दीप्ती रागात बोलली.
सगळे माधुरी कडे पोहोचले. खूप गोड आहे मुलगी. जोडी एकदम शोभत होती. ती पण लगेच सगळ्यांमधे मिसळली. बाबा ओळख करून देत होते. हे मोठे जावई आणि हे छोटे जावई. ते त्यांच्या विषयी सांगणार त्या आधी अलका ताईंनी विषय बदलाला. सगळ्यांना ते लक्ष्यात आल.
त्यांच बोलून झाल्यावर मुलीकडचे आकाशशी बोलत होते. "तुमच शिक्षण काम इंप्रेस्हीव आहे." खूप गप्पा मारत होते.
©️®️शिल्पा सुतार
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा