Login

हा दुजाभाव कशासाठी भाग 5 अंतिम

माणसाने माणसावर माणूस म्हणून प्रेम करावे गरीब श्रीमंत अस काही नसत
हा दुजाभाव कशासाठी भाग 5 अंतिम

अलका ताईंमुळे दीप्ती नाराज होती. उगीच आलो इथे. या पुढे माहेरच्या कार्यक्रमात मी येणार नाही. आकाशला वाईट वाटल असेल का. मी नंतर यांच्या सोबत बोलेल. त्यांची माफी मागेल. काय एक एक. आई का करते अस. पुढे रोहनच लग्न बाकीचे कार्यक्रम असतिल. त्यात अस होणार असेल तर मी माझ्या घरी सुखी आहे. नको यायला इकडे. माझा नवर्‍याचा मान तो माझा मान.

लग्नाची तारीख ठरली. तिथे जेवण झाल. त्या लोकांनी सगळ्यांना साड्या दिल्या. यांनी पण माधुरी साठी नेलेले साड्या दागिने दिले. सगळे वापस आले.

घरी आल्यावर दोघ जावई मुली गप्पा मारत होत्या.

"तुम्ही थांबता आहात का आपण छान बाहेर जेवायला जाऊ." ताई बोलली.

"पुढच्या वेळी उद्या ऑफिस आहे. इथून दोन तास लागतील. जास्त अंधार होण्याआधी निघतो आम्ही." आकाश बोलले.

दीप्ती त्यांच्या कडे बघत होती. "चिडले तर नसतील ना हे. घरी गेल्यावर बोलतील का मला? की सासुबाईंना सांगतील. नाही पण शांत आहेत हे. दुसर्‍याचा राग माझ्या वर काढत नाही कधी. "

बाबा आत मधे आले. "अलका इकडे ये. काय सुरू असत तुझ नेहमी?"

"काय झालं?"

"तुला समजत नाही का तू कस वागते ते."

"म्हणजे?" त्या आवरत म्हणाल्या.

" तू सगळ्यांना एका तराजूत तोलते. ते म्हणजे पैसा ज्याच्या कडे पैसे जास्त ते तुला प्रिय. बाकीचे आवडत नाही का तुला ?"

"काय झालं? एवढे का बोलता आहात मला. "

" तुला आकाश रावां सोबत काय प्रॉब्लेम आहे. एवढा हुशार माणूस केवळ सामान्य परिस्थिती म्हणून तू त्यांच्या अपमान करणार असशील तर मला चालणार नाही. माणुसकी शिल्लक आहे का तुझ्यात. तुझ्या अश्या वागण्याने आपल्या मुलीचा संसार उद्ध्वस्त होईल ना. " बाबा चिडले.

" अहो पण मी काय म्हटले?" त्या थोड्या घाबरल्या होत्या.

" तू काहीच म्हणू नकोस. फक्त शांत रहा आणि नीट वाग. नाहीतर माझ्याहून कोणी वाईट नाही. आपली सुरूवातीची परिस्थिती विसरली का? आपण किती गरिबीत दिवस काढले. महिना अखेरी किराणा नसायचा भाजीला पैसे नसायचे. तुला मोजून तीन चार साड्या होत्या. आता देव दयेने चांगला आहे तर तू घमेंड करू नकोस. "

अलका ताई गप्प बसल्या.

"तुला पटत का तुझ वागण? लहान मुल तुझ्या पेक्षा जास्त समजूतदार आहेत. तुझ्या वागण्याचा त्यांना त्रास होतो तरी काही बोलत नाही सहन करतात. तुझ्या माहेरच्यांनी आपल्याला अशी वागणूक दिली असती तर चालल असत का? तुझा माझा सदोदित अपमान झाला असता तर कस वाटल असत ? जरा विचार करून बोलत जा. "

" माझ्या लक्ष्यात आल नाही हे. "अलका ताई नमत घेत बोलल्या.

"तू आकाश राव, दीप्तीला पाण्यात बघतेस. त्यांचा स्वभाव बघ, शिक्षण बघ, मुलगी सुखात आहे आपली. फुलासारखं जपतात तिला. अजून काय हव. स्वाभिमान आहेत ते."

दीप्ती आत आली. "काय सुरू आहे. काय झालं आई बाबा?"

दोघ गप्प बसले.

"मला नाही का सांगायच. ठीक आहे तुमच तुमच चालु द्या. आम्ही निघतो हे सांगायला आली मी. " दीप्ती बोलली.

" तस नाही. चल बाहेर. "ते सगळे बाहेर आले.

अलका ताई पुढे आल्या." मला थोड बोलायच आहे. आकाश राव दीप्ती मला माफ करा. मला समजल नाही मी तुमच मन दुखावल."

" आई काय अस. " दीप्ती आकाश कडे बघत होती. ते उठून आले. "काय झालं मामी कस नका बोलू तुम्ही मोठ्या आहात. तुम्ही मला आई सारख्या आहात मला कधीच काही वाटल नाही. तुम्ही माफी मागू नका. दीप्ती काही म्हटली का तुम्हाला? "

" नाही ती साधी आहे. माझ चुकलं. "

" काही प्रॉब्लेम नाही. "

"पुरे टेंशन नको. आपण छान आईस्क्रीम पार्टी करु. " रोहन बोलला.

" आम्ही निघतो उद्या ऑफिस आहे. आई एकटी आहे." ते निघाले. गाडीवर दीप्ती आकाशला चिटकून बसली होती. तिला त्याचा खूप अभिमान वाटत होता. किती मोठ मन आहे. हेच खर्या अर्थाने श्रीमंत आहेत. शिक्षण, हुशारी कधीच वाया जात नाही. ती माणसाला नम्र बनवते.

माणसाला माणूस म्हणून बघाव. गरीबी श्रीमंती तर तात्पुरती असते.