गेल्या भागात आपण पाहिले की साक्षी स्वतःपासून साकेतला दूर करू पाहत होती आणि बाबांनी तिच्यासाठी स्थळ आणलं होतं.
तिच्या आयुष्यात काय चाललं आहे हे त्यांना माहीत नव्हते आता पाहू पुढे.
तिच्या आयुष्यात काय चाललं आहे हे त्यांना माहीत नव्हते आता पाहू पुढे.
दुपारी मनवा घरी आली. साक्षीची चौकशी केली.
ती बेडरूममध्ये आराम करत होती.
बाबांना पाहून ती खुश झाली आणि त्यांच्या गळ्यात पडली.
"मनू, आज बाहेर जेवायला जायचं आहे."
"खरंच बाबा?"
"हो खरंच. जा तयारी कर."
ती जाऊ लागली तसं बाबांनी आवाज दिला.
"मनू, ताईला पण सांग तयारी करायला."
ती नम्रताकडे पाहू लागली.
तशीच उभी होती. त्या दिवशी साक्षी फार रागात बोलली होती. रागात कसलं? झिडकी दिली होती..
"अगं काय झालं मनू?"
"काही नाही बाबा. सांगते मी ताईला."
"हम्म."
ती जरा घाबरतच साक्षीच्या रुममध्ये गेली.
तिचा मूड कसा आहे ह्याचा अंदाजा घेतला.
"ताई." हळू आवाजात म्हणाली.
"ये मनू." साक्षी.
'ताईचा मूड ठीक आहे. म्हणजे ताई ओरडणार नाही.' ती मनातल्या मनात म्हणत होती.
"ताई, अगं बाबा म्हणाले आहे तयारी करा. बाहेर जेवायला जायचं आहे ना."
"हो चालेल. मी रेडी होते."
मनवा निघू लागली.
"मनू." तिने तिला रोखलं.
ती थांबली.
साक्षीचा चेहरा निरखुन पाहत होती.
तिची ताई आज वेगळीच दिसत होती. उदास, विचारात हरवलेली.
"दोन मिनिटं माझ्याकडे बस."
ती जाऊन साक्षीकडे बसली.
ती जाऊन साक्षीकडे बसली.
त्या दिवशी ज्या पद्धतीने ती मनवाशी वागली होती हे तिच्याशी लक्षात होतं. तिला वाईट वाटत होतं.
"मनू, त्या दिवशी मी फार ओरडून बोलले गं, त्यासाठी सॉरी."
"अगं ताई सॉरी कशाला बोलते. तू तर माझी मोठी बहीण आहे. तू मला ओरडू शकते."
"तुझ्या भल्यासाठी ओरडलं तर ठीक आहे गं, पण त्या दिवशी माझं फ्रस्टेशन तुझ्यावर काढलं, जे काढायला नको होतं. खरंच मला वाईट वाटलं . आय एम रियली सॉरी मनू. पुन्हा असं नाही होणार."
हे बोलत असताना तिच्या डोळ्यात पाणी होतं. म्हणून मनवाला देखील फार वाईट वाटलं.
"ताई, प्लीज हा असं फॉर्मल नको राहू माझ्याशी. ठीक आहे गं असेल काही प्रॉब्लेम म्हणून तु मला ओरडली असशील, नाहीतर तू माझे किती लाड करते. तिने साक्षीचे डोळे पुसले आणि एक घट्ट मिठी दिली."
"आणि ताई काय गं तू कधीपासून इतकं टेन्शन घ्यायला लागली? तू तर मोठी मोठी कामं सहज करते. तू ना जास्त डोक्यावर प्रेशर नको घेऊ. हा सगळं काही छान करते. तू माझी बेस्ट आणि हुशार ताई आहेस. तुला सगळं येतं. तू सगळं व्यवस्थित करते.". हे बोलत असताना मनवाच्या डोळ्यात एक वेगळीच चमक होती.तीच्यासाठी ताई जगातील सर्वात बेस्ट ताई होती. एकदम खास. तिच्या ताईला अशी कोणतीच गोष्ट नव्हती की, जी येत नव्हती. सर्वच बाबतीत हुशार.
"मनवा काही गोष्टी व्यवस्थित करता येत नाही गं, कितीही प्रयत्न केले तरी. मना विरोधात काही गोष्टी घडतात." ती कोड्यात म्हणाली.
"ताई सगळं ठीक तर आहे ना? का अशी बोलते आहेस?" तिने तिच्या खांद्यावर हात ठेवला.
साक्षी भानावर आली.
"काही नाही गं. चल बाबा आवाज देत आहेत. मी पण तयारी करते, तू देखील लवकर तयारी कर हो आणि मी तुला जो तुझ्या वाढदिवसाला ड्रेस दिला आहे ना तो घाल. त्यात तू खूप छान दिसते." तिने विषय बदलला.
"हम्म.. लगेच तयारी करते."
मनवा निघून गेली. साक्षी विचारात हरवली..
'साकेतने मला कॉन्टॅक्ट करण्याचा पुन्हा प्रयत्न केलाच असेल ना? त्याला जेव्हा कळेल की मी त्याला ब्लॉक केलं आहे त्याला किती वाईट वाटेल? पण ठीक आहे आता हे गरजेच आहे.अजून गुंतण्यात अर्थ नाही.'
तिने खूप मोठं पाऊल उचलं होतं. इतक्या सहज साकेतच्या आयुष्यातून निघावं लागेल हा स्वप्नातही विचार केला नव्हता.
तिने नेहाला मेसेज करून सांगितलं की तिने साकेतला ब्लॉक केलं आहे.
इथे साकेत देखील तिच्या अशा बोलल्याने तुटून गेला होता. साक्षी सोबत पुन्हा बोलावं म्हणून त्याने तिला फोन केला; पण काही केल्या फोन लागला नाही.
आता तो खूप अस्वस्थ झाला. काही केल्या त्याला साक्षी सोबत बोलायचं होतं. त्याने नेहाला फोन केला.
"नेहा, साक्षीचा फोन लागत नाहीये, काही प्रॉब्लेम आहे का?"
"साकेत तिने तुला ब्लॉक केलं आहे."
त्याला त्याच्या कानावर विश्वास बसत नव्हता.
"का?"
"ह्या प्रश्नाचे उत्तर तूच शोधलं तर बरं होईल." असं बोलून तिने फोन ठेवून दिला.
तो तसाच डोक्याला हात लावून बराच वेळ बसला. डोळ्यातून येणारे अश्रू थांबण्याचे नाव घेत नव्हते.
कुणीतरी काळीज बाहेर काढत आहे असंच वाटत होतं. प्रचंड वेदना, त्रास होत होता.
आज तो प्रसंग आठवला ज्या दिवशी त्याने साक्षीचा नंबर मोबाईलमध्ये सेव केला होता.
"मिस साक्षी, तुमचा नंबर मिळेल का?"
तिच्या चेहऱ्यावर असलेलं स्मितहास्य त्याला सुखावून गेलं.
प्रेमाचा प्रवास तेव्हाच तर सुरू झाला होता.
गोड प्रवास.
क्रमशः
अश्विनी ओगले.
आजचा भाग कसा वाटला कंमेंटमध्ये जरूर सांगा. कथेचा पुढचा भाग एक ते दोन दिवसात येईल. धन्यवाद.
कथेचा वापर you tube किंवा कोठेही करू नये.
३०/०४/२०२५
३०/०४/२०२५