Login

हा खेळ प्रेमाचा भाग ९

कथा दोन प्रेम करणाऱ्या जीवांची
हा खेळ प्रेमाचा भाग ९


साकेतच्या डोळ्यासमोर भूतकाळ पिंगा घालू लागला. कॉलेजचा पहिला दिवस, सारे चेहरे अनोळखी. नव्या विश्वात पाऊल ठेवलं होतं.
त्याला कल्पना नव्हती पुढे काय होणार आहे.

मुलींच्या रांगेत साक्षी होती. त्याची नजर तिच्यावर खिळली. गुलाबी रंगाचा चुडीदार आणि हातात मॅचिंग बांगड्या. चेहऱ्यावर निरागसता. तिच्यात नक्कीच काहीतरी खास होतं. लक्ष वेधक अशी होती. रेखीव चेहरा. एक वेगळंच तेज होतं.

मॅडम आल्या. सर्वांनी स्वतःची नावं सांगितली.
पहिला दिवस अजिबात अभ्यास नाही. दुसऱ्या दिवशी कॉलेजला गेला तेव्हा त्याची नजर साक्षीला शोधत होती.


तिला चोरून पाहणं हा नित्याचा दिनक्रम..

पाहिलं वर्ष कसं गेलं कळलंच नाही.
निकाल लागला. साक्षीनेच टॉप केलं होतं.

ब्रेन विथ ब्युटी असा संगम म्हणजे साक्षी.

वर्षभरात दोघे एकेमेकांना ओळखू लागले होते. थोडंफार बोलणं होत होतं..

दिवस रात्र तिचेच विचार डोक्यात घोळत राहायचे. तिच्या गालावर पडणाऱ्या खळीचा तो दिवाना झाला होता.


त्यांचा मित्र मैत्रिणींचा ग्रुप झाला.

एकत्रच फिरायला,पिक्चरला जाणं होत राहायचे.

जवळीकता वाढल्याने तो साक्षीला अजून ओळखू लागला आणि प्रेमाच्या सागरात पोहू लागला.


त्याला आकाउंट विषय जड जायचा.

एक दिवस त्याने साक्षीला त्या विषयाचा अभ्यास घेण्याची विनंती केली.

ती देखील तयार झाली, शेवटी हुशार विद्यार्थिनी.


दोघेही त्या निमित्ताने जवळ आले आणि ती देखील त्याच्या प्रेमात कधी पडली हे तिची तिला कळलं नाही.


एक दिवस धीर एकवटून त्याने तिला प्रपोस केलं.


त्याला धाकधूक होती.

ती हो म्हणेल का?

ह्या विचारात असतांना ती म्हणाली,

"साकेत, तू देखील मला खूप आवडतो."

त्याच्या कानावर विश्वास बसेना.

त्याचे हात आभाळाला टेकले.
खूपच खुश झाला.


आता हे लव्ह बर्ड एकत्रच असायचे.

नेहा तर दोघांना सतत चिडवायची..

काय सोनेरी दिवस होते.

कॉलेज झालं आणि दोघांनी पुढचं शिक्षण घ्यायचं ठरवलं..

दोघांनी एम बी ए एकाच कॉलेजमध्ये केलं.


किती सवय झाली होती.

सहवास प्रेमाची नशा वाढवत होतं.

एकमेकांशिवाय राहू शकत नव्हते.

लग्न करायचे वचन दिलं होतं..

एकदा का चांगल्या कंपनीत कामाला लागले की, मग घरच्यांना सांगायचे हे ठरलं होतं.

आता पर्यंत मित्र आणि मैत्रीण म्हणूनच दोघे रहात होते. घरच्यांना खबर नव्हती, खरं तर खबर लागू दिली नव्हती.

दोघांना विश्वास होता की घरचे होकार देणार.


दोघेही कॅम्पस इंटरव्यूमध्ये सिलेक्ट झाले आणि चांगल्या पेकेजची नोकरी लागली.


आता ते स्वप्न पूर्ण करायची वेळ आली आणि एक दिवस आईने लग्नाला नकार दिला.


इतके वर्ष जीव गुंतवला होता तो सहजासहजी सुटणार होता का?


साकेत रुममध्ये बसला होता..


हे सारे दिवस आठवून त्याला रडू येत होतं.

किती गप्पा मारायचा..एकही दिवस असा गेला नाही की तिच्याशी बोलणं झालं नाही आणि आता मात्र त्याचा नंबर ब्लॉक केला होता.


कोणाशी बोलणार होता तो?


कुठे मन मोकळं करणार होता?
साक्षी हक्काचं ठिकाण होती. तिच्याशी बोललं की किती बरं वाटायचे. लहान सहान गोष्टी देखील तो तिला सांगायचा आणि ती देखील ते सारं मन लावून ऐकायची..


मंत्रमुग्ध करणारे दिवस, तिचा सहवास, तिचं प्रेम सारं काही सुटत चाललं होतं, खरं तर सुटलं होतं.


त्याने मोबाइलमधील तिचा फोटो पाहिला तसं त्याला अजूनच रडु येऊ लागलं.

'साक्षी, खूप मिस करतोय गं. खूप खूप आठवण येतेय. काय करू मी? तुझ्या कुशीत येऊन रडावसं वाटतंय. प्लिज मला असे दूर करू नको. नाही सहन होत.


तितक्यात सुलोचना आली.

"साकेत, काय हे? अजून तयार झाला नाही? पाच मिनिटात मामी आणि श्वेता येतील."

तो काहीच बोलला नाही.

"साकेत, कुठे हरवला?" तिने त्याच्या डोक्यावर हात फिरवला.

"आई, झालं ना तुझ्या मनासारखं?" त्याच्या बोलण्यात नाराजगी होती.

तिला काही कळलं नाही.

"काय झालं साकेत?"

"तुला हेच हवं होतं ना की साक्षी माझ्या आयुष्यातून निघून जावी. आई, गेली ती. मला ब्लॉक केलं तिने."


"साकेत, असंही एक ना एक दिवस तिला दूर जायचं होतं.".

"आई,किती सहज बोलून गेली गं. असंही तिला दूर जायचं होतं. खरंच आई तुला तुझ्या मुलाची तगमग दिसत नाही."


"मी आई आहे. सगळं कळतं; पण तू समजून घे बाळा."


"आई, सगळं तुझ्या मनासारखं करतोय; पण एक लक्षात ठेव श्वेताला मी बायकोचा दर्जा देऊ शकत नाही. कधीच नाही."


"हे काय बोलतोय?"

"हो आई मी कधीच तिचा स्वीकार बायको म्हणून करू शकत नाही. माझ्या मनात साक्षी कायम राहणार..तिचं स्थान मी कोणालाही देऊ शकत नाही."


साकेत निक्षून म्हणाला.

सुलोचनाला तर काही सुचेना.

पोरगं प्रेमात इतकं आंधळं झालं आहे की त्याला काही सुचेना..


एकदा लग्न झालं की सगळं विसरून जाईल. हाच तिचा समज होता.

खरंच असं होणार होतं का?


क्रमशः
अश्विनी ओगले.

आजचा भाग कसा वाटला कंमेंटमध्ये जरूर सांगा. कथेचा पुढचा भाग एक ते दोन दिवसात येईल. धन्यवाद.

कथेचा वापर you tube किंवा कोठेही करू नये.