हा खेळ प्रेमाचा भाग २
'साकेत, किती स्वार्थी आहेस तू. तुझ्या सोयीनुसार तू साक्षीला आयुष्यातून दूर लोटलं. तिला किती त्रास होत असेल ह्याची कल्पना आहे का?' त्याचे मन त्यालाच कोसत होतं.
आरशात तो स्वतःलाच प्रश्न विचारत होता.
'साक्षी, मी अपराधी आहे. तुझा विश्वासघात केला आहे..'
त्याचेही डोळे रडून रडून सुजले होते.
तितक्यात दारावर कोणीतरी नॉक केलं.
पटकन त्याने डोळे पुसले. दिर्घश्वास घेतला.
दार उघडलं. पाहतो तर अमोल होता. अमोल त्याचा बालमित्र.
त्याचा चेहरा पाहून तो लगेच ओळखून गेला.
अमोलला बघून त्याला रहावलं नाही. तो त्याच्या गळ्यात पडून ढसाढसा रडला.
अमोलने देखील साकेतला मन मोकळं करू दिलं. त्याच्या पाठीवरून हात फिरवू लागला.
बराच वेळ तो रडत होता.
ड्रेसिंग टेबलजवळ पाण्याची बॉटल होती.
त्याने साकेतला पाणी प्यायला दिलं.
त्याने साकेतला पाणी प्यायला दिलं.
"साकेत, शांत हो."
"अमोल, मी माझ्या साक्षीला दुखावलं आहे. खूप दुखावलं आहे. ती मला कधीच माफ करणार नाही. मी पापी आहे. मी काय करून बसलो."
साकेत इतका लाचार कधीच झाला नव्हता.
त्याला असं शेवटचं रडताना पाहिले होते, जेव्हा त्याचे वडील देवाघरी गेले होते. त्यानंतर साकेतला असं कमजोर होतांना पाहिले नव्हते.
"अमोल, मी साक्षीला सगळं सांगितलं." डोळे पुसत तो म्हणाला.
"काय? पण का घाई केली? थोडं थांबायचे होते."
"त्याने काय होणार होतं? आईचा निर्णय बदलणार होता का? असं किती दिवस मी तिला अंधारात ठेवणार ? त्याने मला काय मिळणार होतं?"
"काकुशी मी एकदा बोलू का?" अमोल.
"अमोल, मी आईला चांगलं ओळखतो. देव जरी खाली आला तरी ती तिचा निर्णय बदलणार नाही. मामावर किती जीव होता हे मी पाहिले आहे."
"पण तुझं काय साकेत? काकूंना माहीत होतं ना की तू आणि साक्षी एकमेकांवर प्रेम करता? त्यांनी थोडा विचार करायला हवा होता."
"अमोल, मी आईला खूप समजावलं; पण काही उपयोग नाही. आई म्हणतेय मी माझ्या भावाला वचन दिलं आहे. ते वचन जर मी पूर्ण केलं नाही तर त्याच्या आत्म्याला शांती मिळणार नाही."
"हे फारच विचित्र घडलं आहे."
इथे साक्षीची वेगळी अवस्था नव्हती.
तीला स्वतःला अजूनही विश्वास बसत नव्हता की हे सगळं घडलं आहे.
तो तिला म्हणायचा,
काहीही झालं तरी तुझी साथ सोडणार नाही. तू माझं आयुष्य आहे. शेवटच्या श्वासापर्यंत सोबत असणार आहे.
त्याच्या डोळ्यात खरेपणा होता..
तिच्या मैत्रिणीला नेहाला हेवा वाटायचा.
ती साकेतचं प्रेम पाहून म्हणायची.
साक्षी, तू लकी आहेस. साकेतसारखा मुलगा शोधूनही सापडणार नाही.
आज सगळंच आठवत होतं.
असं वाटत होतं की साकेतने यावं आणि बोलावं की हे सारं खोटं आहे. सगळं पहिल्यासारखं व्हावं.
तो एकांत तिला गिळंकृत करू पाहत होता.
ऑफिस केव्हाच सुटलं होतं.
हीच एकटी लॅपटॉपसमोर बसून होती.
हीच एकटी लॅपटॉपसमोर बसून होती.
ह्यावेळेस तर ती घरी असते.
आज तिला कसलेच भान नव्हते.
साकेत वेगळ्या मार्गाने निघून गेला ह्यापेक्षा दुःखदायक काय असेल.?
साकेत वेगळ्या मार्गाने निघून गेला ह्यापेक्षा दुःखदायक काय असेल.?
सकाळी त्याचा फोन आला. म्हणाला होता की महत्वाचं बोलायचे आहे.
किती खुश होती ती.
त्याच्यासाठी सुंदर सजली होती. त्याने वाढदिवसाला गिफ्ट केलेला ड्रेस घातला होता.
छान मेकअप केला होता.
तिला काय माहीत होतं की आजची सकाळ तिला त्याच्यापासून दूर घेऊन जायला आली होती.
तिचा फोन वाजला.
तिच्या आईचा नम्रतचा फोन होता.
तिने डोळे पुसले आणि फोन घेतला..
"हॅलो, आई बोल."
"साक्षी, कुठे आहेस तू? ऑफिस मधून निघाली की नाही?"
"आई, सॉरी फोन करायचे राहून गेले. ऑफिसमध्ये थोडं जास्त काम होतं. मी पाच मिनिटात निघते."
"बरं ठीक आहे. सांभाळून ये."
साक्षीच्या अंगातून त्राण निघून गेल्यागत झालं होतं.
तिने घरचा रस्ता धरला, सोबत साकेतच्या असंख्य आठवणी.
प्रेम सुंदर भावना; पण जेव्हा खरं प्रेम आयुष्यातून वजा होतं तेव्हा मात्र आयुष्य जगणं असह्य होतं. असंच झालं आहे साक्षी आणि साकेतचं. दोघेही व्याकुळ झाले आहेत,पण काहीही करू शकत नाही. प्रेमाने त्या दोघांना जवळ तर आणलं होतं; पण नशीब मात्र विभक्त करू पाहत होतं.
क्रमशः
अश्विनी ओगले.
अश्विनी ओगले.
आजचा भाग कसा वाटला कंमेंटमध्ये जरूर सांगा. एक लाईक जरूर द्या.
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा