प्रस्तुत कथा ही काल्पनिक असून त्यात नाव,गाव,
स्थळ, प्रसंग, जीवित अथवा मृत्यूशी संबंध आला तर तो योगायोग समजावा.
स्थळ, प्रसंग, जीवित अथवा मृत्यूशी संबंध आला तर तो योगायोग समजावा.
शीर्षक: हा पर्याय भाग -१
" मला तर हाच मार्ग दिसत आहे." असे म्हणून रागा रागाने ती घर सोडून गेली.
मुकेश आपल्या डोक्याला हात लावून शांत बसला होता.
मुकेश आणि रेवतीचे लग्न होऊन दोनच महिने झाले होते.
रेवती आणि मुकेशच्या आईचे जास्त पटत नव्हते, त्यातही मुकेशने आपल्या विधवा आईला समजून घेण्याबाबत त्याच्या बायकोला सांगितले होते.
रेवती आणि मुकेशच्या आईचे जास्त पटत नव्हते, त्यातही मुकेशने आपल्या विधवा आईला समजून घेण्याबाबत त्याच्या बायकोला सांगितले होते.
"अरे जाऊ दे. गेली तर गेली पुन्हा येईल, त्यात काय. तू नको एवढा त्याबद्दल टेन्शन घेऊ." मुकेशची आई म्हणाली.
मुकेश मात्र काही न बोलता सरळ आपल्या खोलीत निघून गेला.
आयुष्यात एका जोडीदाराची, आपले समजून घेण्याची आणि त्याच्या साथीची गरज आपल्याला लागते हे मुकेशला समजले होते, परंतु सतत होणारी भांडण यामुळे तो सुद्धा थकला होता.
त्याने खूप वेळा आईचं वय झालंय, त्यामुळे समजून घे असे सांगितले होते. तिने सुद्धा ते समजून घेण्याचा प्रयत्न केला होता, परंतु सर्व घरातले काम करून सुद्धा शेजाऱ्यांना काहीच काम करत नाही, हे जेव्हा तिच्या कानावर वारंवार आले, तेव्हा मात्र न राहून तिने मुकेश घरात आल्यावर ती त्याबद्दल सासुबाईंना समोर घेऊनच त्याबद्दल बोलली होती. कारण पुन्हा म्हणायला नको की, माघारी आपल्या मुलाचे कान भरते म्हणून तिने सर्व सांगितले. तो त्यावर काहीच बोलला नव्हता म्हणून तिने घर सोडण्याचा निर्णय घेतला.
' आई, तुला किती वेळा सांगितलेलं होतं की तुम्ही भांडण करत जाऊ नका म्हणून, तरीसुद्धा तू भांडण केल्याशिवाय राहू शकत नाही. तिला तरी मी किती वेळा समजून सांगणार?' तो रात्री झोपताना विचार करत होता.
' आजकालच्या मुलींना काही झालं तरी पण लगेच माहेरी जायला काहीच कसं वाटत नाही. आमच्या वेळी आम्ही सासरच्यांच्या कितीतरी गोष्टी ऐकून घेत होतो.' त्याची आई रात्री झोपताना मनात विचार करत होती.
' आता जर तिला आणायला गेलो, तर ती तिच्या तालावर नाचवेल. त्यापेक्षा तिने स्वतःहूनच यावे आणि तेव्हा सुद्धा मी तिला नीट वागणार असशील तरच इथे राहा, असे बोलणार आहे.' पुढचे सुद्धा त्याच्या आईने स्वतःहूनच ठरवले होते.
रेवती तशी बोलायला शांत होती, परंतु तिला कुठल्याही चुकीच्या गोष्टी सहन होत नव्हत्या. त्यातल्या त्यात खोटं बोलले असेल तर ते ती खपवून घेत नव्हती.
आपल्या सासूला सांधेदुखीचा त्रास असल्यामुळे त्यांना जास्त काही काम लावत नव्हती. फक्त भाज्या वगैरे काही निवडून द्यायच्या असतील तर, ते पण त्यांना जर ते करायचे असेल तरच ती करा म्हणत होती.
रेवती काही दिवसांनी दुसरा जॉब बघणार होती म्हणूनच तिने लग्नाच्या आधी जॉब सोडला होता.
थोडीफार मदत सासूबाईंनी सुद्धा केली तर आपल्याला दुसरा जॉब करताना आपली तारांबळ उडणार नाही असा तिचा विचार होता, परंतु आपल्या सुनेने जॉब करूच नये, असे मुकेशच्या आईला वाटायचे.
त्यांच्या मते बाहेर गेल्यावर तिला शिंगे फुटतील आणि मग तिची मनमानी सुरू होईल, असे मुकेशच्या आईला वाटायचे. कारण त्यांच्या मागच्याच बिल्डिंग मधल्या त्यांच्या मैत्रिणीच्या सुनेने हेच केले होते. त्यामुळे आपली सून सुद्धा अशीच करेल, असा त्यांनी आधीच पूर्वग्रह केला होता.
' मी तरी किती सहन करणार ? नवरा एका शब्दाने बोलत नाही. काही झालं तरी पण आपल्याला आईला सांभाळायचे आहे, तिचा मन राख असेच बोलत असतात . ते पण हे सगळं त्यांचं मन राखण्यामध्ये माझं मन किती दुखावलं जाते, याचा कधी विचार त्यांनी केला आहे का ? काही नाही, मी सुद्धा आता जोपर्यंत ते मला घ्यायला येणार नाहीत. तोपर्यंत मी येणारच नाही.' गाडीत बसल्यावर ती स्वतःशी म्हणत होती.
" घरी पोहोचल्यावर तू मला कॉल कर." ती फोन उचलत नाही म्हणून त्याने मेसेज केला होता.
'आता कशाला मेसेज करून माझ्याबद्दल काळजी वाटत आहे, असे दाखवत आहेत ? जेव्हा माझी बाजू घ्यायची होती तेव्हा तर घेतलीच नाही.' असे म्हणून तिने आलेल्या मेसेज वाचून फोनच बंद केला.
रेवतीचे माहेर हे लांब असल्यामुळे तिला पोहोचण्यासाठी पहाट झाली होती.
आपली आलेली मुलगी बघून आनंद तर झालेलाच होता, परंतु तिचा चेहरा बघून रेवतीच्या आई-वडिलांना तिची चिंता वाटायला लागली होती.
" हे बघ, आपण तिच्याशी नंतर बोलू; पण आता सध्या लगेच तू तिला काही विचारू नकोस." रेवतीचे बाबा तिच्या आईला म्हणाले.
क्रमशः
काय करेल रेवती?
© विद्या कुंभार
कथेचा भाग कसा वाटला हे लाईक आणि कमेंट करून सांगा.
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा