भाग ४
"जन्मदात्यांच, कर्तृत्व मोठं आहे.. तुम्ही एवढं केलंय आमच्यासाठी. आम्ही तुमच्यासाठी काय करणार आणि काय देणार. काय त्या शुल्लक गोष्टींचं टेन्शन घेतेस.. कप असो की टीव्ही, अख्खी क्रॉकरी फुटू दे घरातली, मंदार हसत बोलला.
"आणि हो.... आमचं काही चुकलं तर... काही सुद्धा, मनात न ठेवता स्पष्ट आणि बिनधास्त बोलायचं, हक्काने सांगायचं." मंदारने आश्वस्त केलं..
"आई, मी पण.... कधीकाळी पटकन बोलून जाते.. मला समजावून घेण्यापेक्षा, मला चुका नजरेत आणून द्या. वेळीच दुरुस्त करा. मला समज द्या प्लीज...." मंजिरीने आशाताईंचा हात हातात घेतला.
"आता हाताशी आलेलीच आहे तर... चांगला सासुरवास करून घे. कशी डोळ्यांना घाबरली पाहिजे" मंदार हसत म्हणाला.
"आता दोन चार वर्षात जावई आणि सून येईल तिला. तीच सासू होईल.. आता या वयात, मी तरी काय सासुरवास करणार?" सासुरवास नको आणि सुनवास पण नको.... जे आहे, जसं आहे बरं चालू आहे."आशाताई समाधानाने बोलल्या.
"आई तुम्ही एक नेहमी, लक्षात असू द्या... आमची मुलं मोठी झाली, शिक्षणासाठी बाहेर पडली तरी... तुमच्यासाठी आम्ही लहान आहोत अजूनही... हे घर, तुमचं आहे.. आमच्यावर तुमचा पूर्ण अधिकार आहे. कारण आमचं अस्तित्व तुमच्यापासून सुरू होतं आणि तुमच्या आशीर्वादाने आयुष्याला पूर्णत्व येतं." मंजिरीने आशा ताईंचा हात हाती घेतला.
वय वाढलं म्हणून कोणी मोठ होत नसतं.. आईवडिलांच्या आशीर्वादाचा हात डोक्यावर आहे म्हटल्यावर लहान म्हणून जगण्यातच आनंद आहे. आणि लहान आहोत म्हटल्यावर, चुका करण्याचा आम्हाला आणि त्या दुरुस्त करण्याचा तुम्हाला पूर्ण अधिकार आहे." मंजिरी शांतपणे बोलत होती.
मंजिरीच्या बोलण्याने, आशा ताईंचे डोळे अश्रुंनी भरून वाहायला लागले.
मंजिरीने, आशाताईंच्या डोळ्यातलं पाणी पुसलं. मंदारने आईला जवळ घेतलं. मंजिरी त्यांच्या हातावर हळुवार थोपटत होती.
'त्या दिवशी, नवीन आणलेल्या डब्ब्याच झाकण काढताना, आईंचा गोंधळ झाला. नॅपकिन किचन मधला कोणता? डायनिंग टेबलवरचा कोणता? तर बेसिन जवळ हात पुसायला ठेवलेला कोणता? पायपुसन असो की सोफ्यावरचे कुशन.. कुठले कुठे? छोट्या छोट्या गोष्टींसाठी हल्ली गोंधळ उडतो त्यांचा.' मंजिरीला जाणवलं.
' आपण सुद्धा... वस्तू जशाच्या तशा ठेवण्यावर आग्रही असतो. मुल मोठी झाली, बाहेर पडली. घरात नसतात... घर जसच्या तसं राहावं म्हणून, आत्ताहास असतो माझा ही. सोफ्यावरच कव्हर विस्कटलेलं दिसलं की चिडचिड होते. ओट्यावर सगळं जागच्या जागी, नीट व्यवस्थित आणि ओटा नेहमी स्वच्छ पुसलेला लागतो. आपली स्वच्छता इतरांसाठी त्रासदायक वाटू शकते किंचित सुद्धा विचार करत नाही. उलट मला माझ्याप्रमाणे हवं असतं म्हणून तोरा मिरवायला जरा ही मागे पुढे बघत नाही.'
' कृष्ण जन्माष्टमीच्या दिवशीची गोष्ट, आईनी देवाची छान पूजा केली... रात्रीच्या कृष्णजन्माच्या सोहळ्यासाठी... आईनी दुपारीच छान तयारी केली. पण मला माझ्याप्रमाणे हवं होतं सगळं... मी उगाच इकडचं तिकडे आणि तिकडचं इकडे करत बसली.. आजकाल, काय तो स्टेटस अपडेट करण्यासाठी, फोटो आणि व्हिडिओचा नाद लागलाय आपल्याला सुद्धा.. आपल्या केलेल्या तयारीवर पाणी फिरलं, आईना वाटलंच असणार.'
' मध्यंतरी आई, सत्यनारायण पूजा आणि घरी भजन करायचं बोलल्या... सुट्टीचा एक दिवस जाणार, म्हणून मीच मध्ये काडी टाकली.'
गोष्ट छोटी... अगदी चपात्या की पोळ्या... रेडीमेड आटा असो की दळून आणलेली कणिक... अगदी, फोडणीच्या वरणावरून ही मतमतांतर होतं.. लोणचं मोहरीच्या तेलातलं की गोडे तेलातलं यावरून ही आम्ही दोघी आपल्या मतावर अडून बसतो... शिरा गुळाचा की साखरेचा..... अरे देवा!! किती आणि काय काय? म्हणतात ना दोन बायका घरात असल्या की भांड्याला भांड लागणारंच.. तसं झालंय आमचं.'
' मी ऑफिसमध्ये जाते.... ऑफिसमध्ये गेल्यावर कामात विसर पडतो सगळ्याचा.. पण आई... आई तर घरीच असतात... कुणाजवळ बोलतील हे सगळं.. मग आतल्या आत कुढत बसतात... असंच घडतंय, आईंसोबत....'
' मी ऑफिसमध्ये जाते.... ऑफिसमध्ये गेल्यावर कामात विसर पडतो सगळ्याचा.. पण आई... आई तर घरीच असतात... कुणाजवळ बोलतील हे सगळं.. मग आतल्या आत कुढत बसतात... असंच घडतंय, आईंसोबत....'
'आपण म्हणतो... सगळं तुमचं आहे... तुमचा हक्क आमचं कर्तव्य वगैरे.... पण वागतो का तस?' मंजिरीच आत्मचिंतन सुरू होतं बहुतेक.
थोड्या वेळ, तिघेही स्तब्ध झाले होते... जराशी शांतता पसरली तशी क्षणांत तिघांच्या चेहऱ्यावर हास्याची लकेर सुद्धा उमटली. मंदार आणि मंजिरीने, आईंचा हात हातात घट्ट पकडून ठेवला होता.. तो एक क्षण सगळं विसरून, आपण सगळे सोबत आहोत, आश्वस्त करणारा होता.
क्रमशः
शुभांगी मस्के...
क्रमशः
शुभांगी मस्के...
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा