"आता लग्न केलं नाहीस तर आयुष्यभर पस्तावशील.."
"अगं पण मला पुढे शिकायचं आहे, अजून मी माझ्या पायावर उभी सुद्धा नाहीये.."
"ठीक आहे, तू म्हणशील तसं करू आपण. आम्हाला काही घाई नाही, पण एवढाच विचार कर फक्त...की सुदर्शन सारखा मुलगा तुला पुन्हा भेटणार आहे का??"
आदिती विचारात पडली. सुदर्शनचं असं अचानक स्थळ येणं तिच्यासाठी धक्काच होता. तिला शाळेतले दिवस आठवले,
इयत्ता पहिलीपासून सुदर्शन तिच्या वर्गात होता. गोरापान, उंच, बोलके डोळे, सुंदर हास्य यामुळे पटकन तो डोळ्यात भरायचा. सगळ्या मुलींचा तो लाडका. आदितीचा पहिला क्रश. मनोमन अदिती त्याला पसंत करायची. पुढे कॉलेजला सर्वांच्या वाटा वेगळ्या झाल्या आणि अदिती सुदर्शनला विसरली सुद्धा.
पण इतक्या वर्षांनी सुदर्शन समोर यावा तेही लग्न करण्यासाठी? तिच्यासाठी हा सुखद धक्का होता, पण आता ती मोठी झाली होती, भावनेच्या भरात निर्णय घेणं तिला शक्य नव्हतं. यावेळी तिची प्राथमिकता फक्त आणि फक्त शिक्षण होती.
आदितीने आपल्या चुलत, मावस बहिणी, मैत्रिणी यांची परिस्थिती बघितली होती. लग्न करून कुणाचंही भलं झालं नव्हतं. करियर तर सोडाच, प्रत्येकजण संसाराच्या गाड्यात अडकलेला होता, पिचला गेला होता. आदितीला असं आयुष्य नको होतं, तिला स्वतःच्या पायावर उभं राहायचं होतं जेणेकरून उद्या कुणावर अवलंबून राहावं लागू नये.
ग्रॅज्युएशन झाल्यावर तिच्याबरोबर असलेल्या बऱ्याच मुलींची लग्न झाली.क्रमशः
पुढील भाग (हक्क-2 पासून)
https://www.irablogging.com/all-blogs?series_id=4068
पुढील भाग (हक्क-2 पासून)
https://www.irablogging.com/all-blogs?series_id=4068
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा