हक्क-2

सुवर्णमध्य

काहीजणी नोकरीला लागल्या, तर काहींनी लग्न करून घरीच बसायचं ठरवलं. आदितीला मात्र स्वतःच्या आयुष्याला एका उंचीवर नेऊन ठेवायचं होतं. नुसतं ग्रॅज्युएशन वर काहीही होणार नव्हतं, तिने पुढचं शिक्षण करायचं ठरवलं. त्यासाठी मेहनत करून प्रवेश परीक्षा दिली.

प्रवेश परीक्षेत पास झाल्याने आता तिने पुढची स्वप्न रंगवायला सुरवात केलेली. एका चांगल्या कॉलेजला तिला ऍडमिशन मिळालं. त्या कॉलेजमधून उत्तमोत्तम कंपन्यात प्लेसमेंट मिळत होत्या, लाखोंच्या घरात पॅकेज मिळत होतं.

सगळं काही ठीक चाललेलं पण तिला हेही समजलं की त्या कॉलेजची फी भरण्यासाठी वडिलांकडे पुरेसे पैसे नाहीत. वडील सांगत नव्हते पण त्यांच्या सतत बँकेतील चकरा आणि हिशोब सगळं काही सांगून जात होतं.

याच काळात सुदर्शनचं स्थळ आलं आणि तिचंही मन दोलायमान झालं. एकवेळ दुसरा कोणताही मुलगा असता तरी तिने नाकारलं असतं पण सुदर्शन, तिच्या लहानपणीचा पहिला आवडता मुलगा तिला अनासाये मिळत होता.

तिच्यापुढे खूप मोठा प्रश्न उपस्थित झाला. प्रेम आंधळं असतं असं म्हणतात, ती लग्नाला नकार देऊ शकत नव्हती, मग तिने घरच्यांशी बोलायचं ठरवलं..

"बाबा, मी लग्नाला तयार आहे पण.."

"पण काय?"

"पण लग्नासाठी मी अट टाकणार की लग्नानंतरही मला माझं शिक्षण पूर्ण करायचं आहे.."

"त्यात काय एवढं, सुदर्शनला तर तू ओळ्खतेच.. तो तर सपोर्ट करेलच तुला.."

"बाबा मी इथे आहे तोवर मला काळजी नाही, सासरी काय घडेल याची खात्री मी नाही देऊ शकत. माझ्या कित्येक मैत्रिणींना मी अशी लग्नाआधी आश्वासनं मिळताना पाहिलंय आणि नंतर सरळसरळ त्यांना हे सगळं करायला नकार मिळालाय.."

"एक काम करू, आपण त्यांच्या घरच्यांशी बोलू.."

🎭 Series Post

View all