हक्क 4

मराठी कथा

सर्वांकडून शिक्षणासाठी होकार मिळाला आणि आदितीचा पुढचा मार्ग सुकर झाला. अदितीला दोन्ही गोष्टी मिळाल्या, तिचं प्रेम आणि दुसरीकडे तिचं करियर... कोणतीतरी एक गोष्ट सोडण्याचं आता कारणच नव्हतं..

वडिलांनी थाटामाटात लग्न लावून दिलं. लग्नात कुठलीही कसर सोडली नाही. अदिती लग्न करून सासरी आली. तिचं कॉलेज सुरू व्हायला अजून 15 दिवस अवकाश होता. तोवर तिने घरात पूर्ण लक्ष दिलं.

सकाळचा नाश्ता, जेवण, साफसफाई सगळं जातीने ती बघायची. सुदर्शन आणि घरचे खुश होते. त्यांना आता रोज असं आयतं आणि चविष्ट जेवण मिळत होतं.

पंधरा दिवस संपले आणि आदितीने सांगितलं, की उद्यापासून मी कॉलेजला जाणार आहे...

"बरं बरं.. कितीला जायचं आहे?"

"सकाळी 9 ला निघेल..संध्याकाळी 6 पर्यंत येईल.."

सासरच्यांनी लग्नाच्या वेळी शब्द दिला असल्याने त्यांना काही बोलता आलं नाही, पण खरं तर त्यांना सवय झाली होती आदिती घरात वावरण्याची, तिनी सगळी कामं करण्याची..

पहिल्या दिवशी तिला कुणी काही बोललं नाही. ती सकाळी लवकर उठून नाष्टा आणि जेवण बनवून कॉलेजला निघून गेली. संध्याकाळी 6 वाजता घरी आली..एरवी माहेरी ती अशी कोलेजवरून घरी यायला निघाली की आईला फोनवरच सांगे,

"आई खूप भूक लागलीये...काहीतरी बनवून ठेव.."

मग आई आल्या आल्या तिला गरमागरम काहीतरी देई. तिला माहेरची ही आठवण येऊन रडू आलं. तिने स्वतःला सावरलं. तिला अपेक्षा होती की सकाळचा स्वयंपाक मी करते तर संध्याकाळी किमान सासूबाईंनी तयारी तरी करून ठेवावी. पण सासूबाई दुपारी जे tv पाहायला सोफ्यावर बसत ते डायरेक्ट संध्याकाळी जेवायला सोफा सोडत.

तिने किचनमध्ये पाय ठेवला..किचनची अवस्था तिला बघवत नव्हती. उष्टी ताटं, भांडी, खरकटी सगळी ओट्यावर पसरलेली. इतकंच काय तर सकाळी धुवून ठेवलेली भांडी सुद्धा जागेवर लावली नव्हती.

ती आली आणि सासूबाईंनी कामातून हातच काढुन घेतला होता. तिला वाईट वाटलेलं, पण आपल्या शिक्षण घेण्याला ते आडकाठी करत नाहीये हीच गोष्ट मोठी समजून ती समाधान मानत होती.

तिला कॉलेज सुरू होऊन आठवडा झाला. नेहमीप्रमाणे सोमवारी ती कॉलेजला जायला निघाली, तेवढ्यात सासूबाईंचा आवाज आला,

"बापरे, किती कचरा साचलाय.. घंटागाडी नेमकी आदिती गेली की मग येते.."

अदितीला काय बोलावे समजेना, आता साहजिकच आदिती नाहीये म्हटल्यावर कचरा सासूबाईंनी टाकणं अपेक्षित होतं..

अदिती निघाली तसं सासूबाई पुन्हा म्हणाल्या,

"अगं तो कचरा किती साचलाय??"

अदितीला काय बोलावं कळेना.."तुम्ही टाका की मग.." असं बोलायला तिची जीभ सरावत नव्हती. सासूबाई असे प्रश्न विचारतकी ज्याची उत्तरं दिली तर तिच्यावर "उद्धट" असा शिक्का बसेल.

दुसऱ्या दिवशी ती कॉलेजला जायला निघाली,


🎭 Series Post

View all