भाग -3
सगळा गावं सामसूम पडला होता. घरे जमीनदोस्त झाली होती. आज ती शेवटची तिथं आली होती. कारण एक जीव न्यायचा अजून बाकी होता. चंद्राच्या दुधाळ प्रकाशात तीच रूप आणखीच भयानक दिसत होतं. हळुहळु काळे ढग जमा व्हायले जणू तो चंद्रही तीच्या भयानक रूपाला पाहून स्वतःला लपवू पाहत होता. तीचे विखुरलेले केस, काळ्या कुट्ट जळक्या देहावर पांढर वस्त्र फडफडत होतं, हाताच्या बोटावरील टोकदार नखं नाचवत ती विचित्र आवाजात गुणगुणत होती. काळ्या काजळीप्रमाणे रंगवलेले तीचे ओठ, डोळ्याच्या खोबणीत बटबटीत पांढरी बुभळं, पांढऱ्या शुभ्र प्रेताड चेहऱ्यावर छद्मी हास्य घेऊन एका यांत्रिक बाहुलीप्रमाणे ती त्या सूनसान वस्तीत फिरत होती.
"मीरा sss कुठेयस तू? आपणं जाऊ दूर... दूर जाऊ... कूठे लपली तू? बाहेर ये मीरा..." लाडिक आवाजात ती हडळ आवाज देतं होती. समोरच्या त्या मातीच्या घरात मीरा लटपट कापत लपून बसली होती. तीच्या कानावर तो बोचरा आवाज पडत होता. आता आपली काही खैर नाही. मदतीला देखील ती कुणाला बोलवू शकत नव्हती. तसही तीच कुटुंब आणि अख्खं गावं त्या हडळीने गिळून टाकलं होतं. उरली होती शेवटची ती... ती ब्याद जवळ आली अगदी दाराच्या जवळ... तीला वेगवेगळे आवाज देऊ लागली. अचानक आवाज बंद झाला म्हणून मीरा उठून दाराजवळ आली. बाहेर सुन्न शांतता होती. तीने हळूच कडी सरकवली. हळुहळु दार उघडलं तशी अचानक ती हडळ दारात अवतरली... तीचा काळाकुट्ट हात मीराच्या गळ्यावर पडला...
"तूच... तूच माझं शेवटचं सावज आहेस. तुला घेऊन जाणार मी... हा ss हा ss हा sss..." क्षणात ती हडळ तिथून गायब झाली. एका टेकडीवजा जमिनीवर ती मीराला घेऊन अवतरली. त्या टेकडीवर सडका दुर्गंध पसरला होता. माणसांच्या छिन्नविच्छिन्न देहांचा ढीग लागला होता. ती माणसं त्याच गावातली होती जी तीच्या मायावी आवाजाला बळी पडली होती. जागोजागी रक्त सांडल होत. त्या रक्तामुळ माती लालसर दिसत होती. मीरा मात्र ते भयानक दृश्य पाहून हादरली होती.
"हे चांडाळा... माझा शेवटचा बळी स्वीकार कर..." आकाशात गडगडाट झाला. विजांचा थयथयाट चालू झाला. त्या हडळीने आपला धारदार नखाचा हात मीराच्या दिशेने वाढवला तत्क्षणी तीच्या हातावर एक रखरखीत ऊर्जेने भारलेला अदृश्य आसूड येऊन पडला...
"ॐ नमो हनुमते रुद्रावताराय सर्व-शत्रु-संहारणाय" कपाळावर चंदनाचा टिळा, हातात कमंडलू, पांढरा शुभ्र सदरा, कमरेखाली भगव वस्त्र गुंडाळलेल, खांद्यावर त्याच रंगाचं उपरण, गळ्यात रुद्राक्षाच्या माळा... चेहऱ्यावर कमालीचा आत्म विश्वास घेऊन तो तेजस्वी पुरुष, मंत्र जाप करत जवळ येतं होता. हातात असणाऱ्या कमंडलूतून मांत्रिक ऊर्जेन भरलेलं पाणी त्या व्यक्तीने तीच्या हातावर शिंपडल तशी तीची एक पाशवी गगनभेदी किंकाळी आसमंताला भिडली...
"ए भटा... सोडणार नाही तुला. माझ्या आड येऊ नको ... मला पुढच्या आदेशावर जायचं आहे... हा शेवटचा बळी मला घेऊ दे..." ती हडंळ विव्हळत गर्जना करत ओरडत होती तीचा अवतार आणखीच उग्र झाला होता हे बघून मीरा जागीच बेशुद्ध पडली. बेशुद्ध झालेल्या मीराकडं पाहून ती ब्याद दात ओठ खात त्या दिव्य पुरुषाकडं वळली...

"तुला माहितीये ना... माहितीये ना भटा... गावातला एक जरी बळी राहिला तर त्याच्या बदल्यात याच गावातला दुसरा बळी द्यावं लागतो... आता कोणीच उरला नाही...ह्या ह्या सगळ्यांनी माझ्या हाकेला प्रतिसाद दिला म्हणून ते माझे झालेत आता ही पोर बी माझी होणार..." धुसफूस करत ती ओरडू लागली.
"शांत... मला तुझा नियम माहित आहे... आणि मला तो मान्य आहे... तीच्या बदल्यात तू माझा बळी देऊ शकते. मी याच गावातला आहे...त्यापूर्वी मला एक कार्य करू दे." भटजींनी खाली बसून मीराच्या डोक्यावर हात ठेवला आणि डोळे मिटले. ओठातल्या ओठात पुटपुटत त्यांनी हात बाजूला घेतला तत्क्षणी मीराचा देह तिथून गायब झाला.
"माझं काम झालंय... आता तू हवं ते करु शकते." भटजींनी आपले डोळे मिटले. " देवा रक्षा" इतकाच शेवटचा शब्द त्यांच्या तोंडून निघाला. खांद्यावरच उपरन बाजूला जाऊन पडलं... रुद्राक्ष जमिनीवर विखुरले... चंदनाचा टिळा नाहीसा झाला... कमंडलू दूर जाऊन पडले... हात जोडून उभ्या भटजींच्या छातीत धारदार नखं रुतली गेली...ती हडळीच हसू सर्वत्र दुमदुमत राहिलं.

स्वतःचा प्राण देऊन भटजींनी मीराला का वाचवलं असेल? जाणून घेण्यासाठी वाचत रहा...
क्रमशः...