भाग- 4
डॉक्टरांनी सांगितलं होतं काळजी करण्याचं कारण नाही. 'तीच्या आजाराच टेन्शन तीने घेऊ नये' हा मोलाचा सल्ला मात्र आवर्जून दिला होता. त्यामुळे स्ट्रेस वाढून अश्या विचित्र गोष्टी तीच्या बाबतीत घडू शकतात. हॉस्पीटल मधून आई बाबा आणि प्रणू घरी निघाले होते. भर दुपारी चांगलच झाकोळून आलं होतं. एक प्रकारचं अमंगल मळभ वातावरणात दाटून आलं होतं. विषेश म्हणजे रहदारी असलेल्या त्या रस्त्यावर आज चिटपाखरू देखील नव्हतं. मोटारसायकलच्या आवाजाखेरीज तिथं कसलाच आवाज नव्हता. शांतता भंग करत अरुणा म्हणाली, "अहो, आता आलोयच तर पंडित गुरूजींकडे जाऊन येऊयात का? मला तर खूपच अस्वस्थ झालंय. शेवटी आपल्या प्रणूचा प्रश्न आहे. काही फरक पडला तर देव पावलाच म्हणायचं." तीची काळजी लक्षांत घेता प्रणूच्या बाबांनी मोटासायकल वेशीच्या वाटेवर वळवली. अचानक भर भर वारा सुटू लागला. हु हु करत वारा भुतासारखा त्यांचा पाठलाग करू लागला. प्रणू मात्र घाबरलेल्या डोळ्यांनी मोटासायकलच्या आरशात बघत होती. काळ्या धुराचा एक वेडा विचित्र आकार त्यांचा पाठलाग करत होता. प्रणूने झटकन मान वळवून पाठीमागे पाहिलं पण तिला धूळ अन् पाचोळ्या शिवाय काहीच दिसलं नाही. मनात आपसूकच भीतीने प्रवेश केला.
"आई आपणं कूठे चाललोय?" थरथरत्या आवाजात प्रणूने आईला विचारलं.
"पंडित गुरूजींकडं" दोन हात जोडत पुटपुटत आई म्हणाली. गाडी संथ गतीने जातच होती की अचानक करकचून ब्रेक लागला म्हणून दोघींनी पूढे वाकून पाहिलं तर वाटेत भलं मोठं झाडं आडव पडलं होतं. वेशीकडं जाणाऱ्या त्या एकुलत्या एका वाटेवर हा अडसर निर्माण झाला होता.
"आता काय करायचं?" तिघांच्या मनात हाच प्रश्न उभा राहिला. "अहो मी काय म्हणतेय आता थोडच तर अंतर आहे आपणं चालत जाऊया का. इतक्या जवळ येऊन परत जाणं म्हणजे... त्यात हिला परत त्रास झाला तर काय करायचं? निदान बुवा काहीतरी तोडगा देतीलच." आईचं म्हणण बरोबर होतं. गाडी बाजूला लावून तिघेही ते झाड ओलांडत त्यांनी पुढची वाट धरली.

"तो भट स्वतः माझा बळी झाला होता... तो काय तुला वाचवणार... हा ss हा sss हा ssss " तीच विचित्र हसू प्रणूच्या कानावर पडलं. नाही हे शक्य नाही...म.. मला तर ऐकू येत नाही... मग हा आवाज?...हे फक्तं तीच मायाजाळ आहे... हो ती मला फसवतेय... पण मी नाही आता फसणार...मनाची समजूत काढत प्रणू चालत राहिली.
हळुहळु गावाची हद्द संपत आली आणि त्यांच्या नजरेला एक भव्य तटबंदी दगडी कमानीची भिंत पडली. तीच होती गावाची वेस. त्या अलीकड आमराई पसरली होती. त्या आमराईतून एक पायवाट होती जी सरळ पंडित बुवांच्या झोपडीकडे जातं होती. तिघांनी ती पायवाट हेरली अन् त्यावरून चालू लागले. वातावरणात कमालीचा बदल घडून आला. आतापर्यंत बेभान सुटलेला वारा अचानक शांत झाला. त्याठिकाणी वातावरण प्रसन्न जाणवत होते. थोड्याच अंतरावर ती गोलाकार झोपडी उभी होती. अंगणात हिरवीगार तुळस त्या भोवतालची रांगोळी लक्ष वेधून घेतं होती, नारळाच्या गगनचुंबी झाडात झोपडी खुजी दिसत होती. हवेत धुपाचा सुगंध पसरला होता. एकंदरीत आल्हादायक आणि मन प्रसन्न करणारं ते ठिकाण होतं. तिघेही झोपडी जवळ आले तेव्हां तिघांची नजर दारात बसलेल्या कुत्र्यावर पडली. कुत्रा आळीपाळीने तिघांना बघु लागला. अचानक त्यानं भुंकायला सुरुवात केली पण आश्चर्य म्हणजे तो त्यांना भुंकत नव्हता पाठीमागच्या मोठया रस्त्याला बघून कुत्रा मोठमोठ्यानं भुंकत होता.
"भैरू... आत येऊ दे त्यांना." झोपडीच्या आतून एक भारदस्त आवाज आला तसा भैरु भुंकायचा थांबला. "आत या". तिघेही चालत आत गेले. समोरचा देखावा अद्भुत होता. मधोमध एक हवन कुंड होतं. ज्यात चंदनाच्या लाकडांचा धूर पसरला होता. त्या पलीकडे पंडित बुवा मांडी घालून डोळे बंद करून बसले होते. तेजस्वी चेहरा, अंगात पांढऱ्या रंगाचे धोतर आणि सदरा, चंदनाचा टिळा, केसांवर हलकी चांदी चढलेली. हातात गळ्यात रुद्राक्ष माळ होती. त्यांना आधीही कुठेतरी पाहिल्याची तीव्र जाणीव प्रणूला झाली.
"बसा..." समोर तीन आसन होती त्यावर गुरूजींनी तिघांनाही बसायला सांगितले.
"या बालिकेशी माझी याआधीही भेट झालीय पण ती या जन्मी नव्हे. असो... वाटेत अडथळा निर्माण केला तीने पण ईश्वराच्या कृपेने तुम्ही इथवर पोहोचलात." गुरुजींच्या बोलण्याचा अर्थ कळत नव्हता पण आश्चर्य दोन्ही दाम्पत्यांना वाटलं कारण वाटेतला अडथळा म्हणजे ते झाडं... पण बुवांना कसं माहित? पंडित गुरूजींनी हळुवार डोळे उघडले. डोळ्यात एक प्रकारचं विलक्षण तेज होतं.
"मला माहितीय तुम्ही ईथे का? कशासाठी आला आहात. या बालिकेच्या स्वप्नांचा अर्थ खोटा नाही. तीचा त्या चांडाळनीचा पूर्व जन्मीचा सुड आहे. आणि बालिकेला ऐकू न येण्याचा हा डाव परमेश्वराचा आहे. पुष्य नक्षत्रात जन्मलेली ही बालिकाच तीचा नायनाट करेल." आधीतर त्या दाम्पत्यांना बुवांचा एकही शब्द खरा वाटला नाही. दोघेही एकमेकांच्या तोंडाकडे बघू लागले. पण जेव्हा पंडित गुरूजींनी दोघांच्या माथ्यावर हात ठेवून भूतकाळ दर्शवला तेव्हा मात्र दोघेही घाबरले होते आणि खात्री देखिल पटली होती.

"गुरूजी... पण यात माझ्या लेकीला काही इजा, बरवाईट तर?" बजरंगला मधेच अडवत गुरूजी म्हणाले. "काळजी नको करू तीच्या रक्षणाला संपूर्ण ब्रम्हांड आहे."
तिथे बसलेली प्रणू मात्र एकमेकांच्या तोंडाकडे बघत होती. गुरूजींनी तीला हातानेच इशारा केला आणि जवळ बोलवले.
तिच्या कपाळावर अंगठा टेकवत त्यांनी मंत्र पुटपुटले. हळुहळु प्रणूने डोळे मिटले. पापण्याच्या पडद्याआड एक दृश्य उमटले.
घाबरलेली मीरा.... तीला आवाज देणारी हडळ.... बळी साठी सज्ज झालेली मीरा..... तीला वाचवणारा तो दिव्य पुरुष.... बेशुद्ध पडलेली मीरा.... सरते शेवटी तीच्या डोक्यावर जाणवलेला ऊर्जा भार.... आणि एका मंदिरात जागी झालेली ती...
"आठवतं आहे का बालिके?" तीच्या अंतर्मनात गुरुजींचा आवाज घुमत होता.
"हो आठवतंय गुरूजी." प्रणूच्या डोळ्यातून घळघळ अश्रू वाहत होते.
"म्हणजे ती मीरा मीच?... पण तुम्ही मला का वाचवलत? हा प्रश्न मला आजतागायत अनुत्तरित आहे." प्रणूचे आई बाबा भरल्या डोळ्यांनी तिच्याकडे बघत होते कारण निदान अंतर्मनात तरी गुरुजींचा आवाज ती ऐकू शकत होती.

"होय बालिके तूच आहेस मीरा. हा तुझा पुनर्जन्म आहे. गेल्या जन्मी अपूर्ण राहिलेलं कार्य या जन्मी तुला पार पाडायचं आहे. त्या चांडाळनीला कायमचं नष्ट करायच आहे."
"पण गुरूजी हे कार्य तर गेल्या जन्मी सुद्धा पार पडलं असतं. "
"तू तिच्या प्रलोभनाला आधीच बळी पडली होती. म्हणूनच हे शक्य झालं नाही. प्रत्येक गोष्टीला ठराविक काळ वेळ असतो. त्या त्या कालावधीत ती गोष्ट घडतच असते. तूला ऐकू न येण्याचा हाच खरा उद्देश आहे की तीच्या मायाजाळात तू फसू नये. यावेळी ती तुला अनेक प्रकारे भुलवेल पण तुला तुझं धैर्य सोडायचं नाही. तीच्या मायावी आवाजाला फसला तोच तीच सावज. तीचा फसवा आवाज तीच हत्यार आहे. उद्या अमावस्या आहे. ती तुला न्यायला येईल आणि तेव्हाच तुला तीचा प्रतिकार करायचा आहे. मी तूझ्या सोबत असेनच" गुरूजींनी तीला समजावून सांगितलं. आंतरिक संवाद संपला आणि दोघांनी डोळे उघडले. या सवांदानंतर प्रणूच्यात विलक्षण बदल झाला होता. तीच्या चेहऱ्यावर विश्वासाची छटा उमटली होती.
"उद्या अमावस्या आहे. काळ फार वाईट आहे. ती ब्याद बालिकेला नेण्यासाठी येईल. त्याचवेळी आपल्याला एक हवन करायचा आहे. तो हवन तुमच्याच घरात होईल. कारण बालिकेची नाळ त्या घराशी जोडली गेलीय." बुवांनी सांगितलं तसे दोघेही तयार झाले आणि परतीच्या वाटेवर निघाले. बाहेर भैरुला तीला धुडकावून लावण्यात केव्हाच यश आलं होतं.

क्रमशः...
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा