Login

अर्ध्यावरी डाव

Half Play Is Remaining
स्मर विव्हल
आर्त साद घालते
चिंतनात नित्य
तुला पाहते

केशरी आभाळ
पहाट रंगते
पुन्हा नव्याने
तुझी वाट पाहते

कोवळी सकाळ
तरुण भासते
तुझ्या चाहूलीचा
मन अंदाज घेते

तव वदनीचे हास्य
अजूनही स्मरणात
जरी तू भेटशी
फक्त स्वप्नात

ओलावल्या दिठीत
तुझीच प्रीत
वेड्या आशेचे
तेवतात दीप

अजूनही उरात
मोतीया रंग
अवघडल्या मनात
भावना अभंग

हळव्या शपथेची
हळवी ओढ
उसविली विण
त्वरेने जोड

दोघे एकत्र येऊ
सुखदुःखाच्या उंबऱ्यावरी
पुन्हा खेळ मांडू
जो राहिला अर्ध्यावरी