भाग 3
स्वरदा झोपल्यानन्तर रामने बघितलेलं सगळं लताला सांगितलं. बऱ्याचवेळ चर्चा केल्यावर राम आणि लताने एक बेत आखला. दुसऱ्या दिवशी सकाळी राम लवकरच घरातून बाहेर पडला. तिथून तो पलीकडच्या काठावर गेला. आज संध्याकाळसाठी त्याने एक नाव ठरवली. त्याला आणि लताला त्यांच्या घरी घेऊन जाण्यासाठी ‘तो’ येणार होता, त्याची ‘रमा’ घेऊन.
आज स्वरदा काहीशी अवस्थ होती. आजही ती नेहमीप्रमाणे संध्याकाळी खिडकीत येऊन थांबली होती. पण आज वेळ उलटून गेली तरीही ते सूर कानी पडले नव्हते. सगळीकडे शांतता होती. तिचं काहीतरी निसटून खूप दूर चाललंय असं तिला वाटत होतं. राम आणि लताही अजून घरी आले नव्हते. तिला खूप एकटं वाटत होतं.
इकडे ठरल्याप्रमाणे राम आणि लता पलीकडल्या काठावर जाऊन थांबले होते. ठरल्या वेळेला तो त्याची नाव घेऊन तिथे आला. दोघेही जण काहीही न बोलता नावेत बसले. नाव नदीच्या मध्यापर्यंत आली, आणि रामने नाव थांबवायला सांगितली. अशी मध्येच नाव थांबवायला सांगितल्यामुळे तो गोंधळून गेला. राम बोलायला लागला, “तूच गातोस ना रोज, नाव घेऊन घरी जाताना?” “हो साहेब, मीच असतो. गायला आवडत मला. माझ्या खूप जवळच्या एका व्यक्तीबरोबर गायचो मी. ती सोडून गेली, आता एकटाच अंधारात गातो. कधीतरी ती भेटेल ह्या आशेने गातो.” त्याचं ते बोलणं ऐकून राम आणि लता गंभीर झाले. “तुझी ती हरवलेली व्यक्ती, ही तर नाहीये ना?” रामने एक फोटो त्याच्यासमोर धरला. त्याचा हात थरथरत होता. नावाड्याने तो फोटो हातात घेतला. नावेवरचा कंदील अगदी त्या फोटोच्या जवळ नेला त्याने. अंधारात फक्त त्या फोटोवर आणि त्याच्या चेहऱ्यावर प्रकाश होता. फोटो बघून त्याच्या डोळ्यात पाणी जमा झालं. “ही तर माझी रमा आहे”, असं म्हणून त्याने तो फोटो घट्ट हृदयाशी कवटळला.
राम आणि लता परत येईपर्यंत स्वरदाने जेवणाची तयारी करून ठेवली होती. त्यांना यायला बराच उशीर झाल्यामुळे ती चिंतेत होती. राम आणि लता आल्यावर शांततेतच जेवणं झाली. दोघांनी स्वरदाला आपल्या खोलीत नेलं. “बस जरा स्वरदा. “आम्हाला तुझ्याशी थोडं बोलायचंय.” “काय झालं बाबा? काही चिंतेचा विषय तर नाहीये ना? तुमच्या दोघांचे चेहरे असे का झालेत?” “स्वरदा, शांतपणे ऐक. तीन वर्षांपूर्वी प्रचंड पूर आला होता. आपलं नंदी धरण फुटलं होतं, आणि ते साऱ्या शहराला घेऊन वाहवलं. शहरातली बर्याचश्या इमारती, दुकाने वाहून गेली. आपलं गाव शहराच्या खाली असल्यामुळे, सगळी माणसं, राडारोडा वाहून आपल्या आपल्या गावापर्यंत आला. अनेक माणसं वाहून आली होती. आम्ही दोघेही नदीकाठीच होतो, जेव्हा तू त्या नदीच्या प्रवाहातून वाहत आलीस.
क्रमशः

Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा