हमसे बढकर कौन भाग ३
म्हण:- कानामागून आली आणि तिखट झाली.
©® सौ.हेमा पाटील.
मागील भागात आपण पाहिले, सुमनताईंना टिव्ही पाहता येत नाही म्हणून मनिषाचा खूप राग आला आहे. आता पुढे...
सुमनताईंच्या मनातील विचार तर मनिषाला वाचता आले नाहीत, पण त्यावेळी तिच्याही मनात विचार आला,
'या सासुबाई आता इतके वय झाले तरी देव देव करायचे सोडून टिव्हीच्या मागे पडलेल्या असतात. आता तरी देवाचे नाव घेतले तर मुक्ती तरी मिळेल, पण यांना कोण सांगणार? मांजराच्या गळ्यात घंटा कोण बांधणार?'
'या सासुबाई आता इतके वय झाले तरी देव देव करायचे सोडून टिव्हीच्या मागे पडलेल्या असतात. आता तरी देवाचे नाव घेतले तर मुक्ती तरी मिळेल, पण यांना कोण सांगणार? मांजराच्या गळ्यात घंटा कोण बांधणार?'
अगदी मजेशीर प्रसंग होता. दोघीही सासवा सुना एकमेकींकडे पाहत, एकमेकींना मनातल्या मनात दुषणे देत एकाच वस्तूचा विचार करत होत्या. ती वस्तू मात्र आतल्या खोलीत बासनात गुंडाळून ठेवली होती. दोघींनी थोडावेळ उगाचच इकडेतिकडे केले. त्यानंतर मनिषाला वाटले,
'यांच्या मालिका चालू असल्या, तरी थोडे का होईना आपले मनोरंजन होतेच. भलेही त्या सासू सुनेच्या का असेनात! घरात जाग तर असते. आता कामे आवरल्यावर दोघींनी काय माश्या मारत बसायचे?'
सासुबाईंनी आपली जुनी ट्रंक खोलली व त्यातील क्रोशाच्या सुया व लोकरीचा गुंडा काढून त्यांनी विणायला सुरवात केली. ते पाहून मनिषाला आठवले,
'अरे, आपण किती दिवस झाले, काही लिहिलेच नाही. चला, आज अर्धवट राहिलेली कथा, कविता पूर्ण करण्याचा प्रयत्न करुया.'
तिने आपली वही उघडली आणि क्षणात ती लेखनात गुंगून गेली.
'अरे, आपण किती दिवस झाले, काही लिहिलेच नाही. चला, आज अर्धवट राहिलेली कथा, कविता पूर्ण करण्याचा प्रयत्न करुया.'
तिने आपली वही उघडली आणि क्षणात ती लेखनात गुंगून गेली.
दोघीही एकाच खोलीत बसल्या होत्या, पण आता दोघीही आपापल्या विश्वात रमून गेल्या होत्या. दोघींचे एकमेकींकडे अजिबात लक्ष नव्हते, ना दोघींच्या मनात एकमेकींबद्दल विचार सुरू होते.
मंदिरात चारचे टोल पडले तेव्हा सुमनताई मनिषाला म्हणाल्या,
"अगं, चार वाजले. चहा टाकतेस ना? मला चालायला जायचे आहे, वेळ होईल." आपली वही बंद करुन मनिषा उठली व स्वयंपाकघराकडे गेली. दोघींनी शांतपणे चहा घेतला. सुमनताईंनी विणलेला रुमाल पाहून मनिषाने कौतुक केले.
" अय्या आई, किती छान विणलाय तुम्ही रुमाल! मला शिकवाल का विणायला? मला फक्त सुई चालवता येते." मनिषाने विचारले.
"सुई हातात धरता येणेच महत्वाचे असते. ते आले की विणकाम करणे अवघड नाही. शिकवेन मी तुला. रुमाल, स्वेटर, पायमोजे, शाल, सगळे शिकवेन. मला बरेच प्रकार येतात. क्रोशाच्या सुईवर लोकरीची खेळणी पण बनवता येतात मला."
"काय सांगता? मला कसे माहित नाही आजवर?" मनिषा म्हणाली.
"ते अडगळीच्या खोलीत ट्रंकेत टाकले होते. अलिकडे कंटाळा येत होता विणायचा. आज वेळ जाईना म्हणून काढले." सुमनताई म्हणाल्या.
"तुम्हाला माहित आहे का, या विणलेल्या खेळण्यांना आजकाल खूप मागणी आहे. कारमध्ये मागच्या बाजूला शोपीस म्हणून ठेवतात, तसेच छोटी खेळणी गाडीत पुढे टांगतात. मुलांनाही इजा होत नाही, तसेच प्लास्टिकच्या खेळण्यांना पर्याय म्हणून अशा खेळण्यांना खूप मागणी आहे. आपण घरात बसून याचा बिझनेस करू शकतो." मनिषा म्हणाली.
"खरंच? मला क्रोशाची सुई वापरुन खूप काही बनवायला येते. थांब, माझी वही काढते. त्यात बऱ्याच वेगवेगळ्या डिझाईन आणि खेळण्यांची माहिती अगदी सविस्तर लिहिली आहे. खरंच आपण बिझनेस सुरू करू शकतो?" सुमनताईंनी अविश्वासाने विचारले.
"हो आई, नक्कीच करू शकतो. सुरवातीला तुम्ही मला शिकवत शिकवत काही वस्तू विणा. मी सोशल मिडियावर त्याची जाहिरात करते. माझ्या मैत्रिणींच्या ग्रुपवर पण फाॅरवर्ड करेन. एकदा मागणी यायला सुरवात झाली की, मग आणखी मोठ्या स्वरुपात जाहिरात करता येईल. तसेच शहरात जेव्हा स्टाॅल लागतात, तेव्हा आपणही स्टाॅल लावायचा. एकदा आपल्या ब्रॅण्डचे नाव झाले की, परत कुठे जायची आवश्यकता भासणार नाही." मनिषा म्हणाली.
"चल, तर मग शुभस्य शीघ्रम! तुझ्या सोबतीने मी पण आता माझे पाऊल पुढे टाकते. सकाळी मला वाटले होते, ही कानामागून आली आणि तिखट झाली. आता मात्र माझे मत बदलले आहे." सुमनताई हसत म्हणाल्या.
"मग आता तुमचे माझ्याबद्दल काय मत आहे तेही सांगा." मनिषा म्हणाली.
"ते आत्ता नाही, पहिला स्टाॅल लागल्यावर सांगेन. आता ये इकडे विणकामाचा पाया समजून घ्यायला." सुमनताईंनी विणायला सुरुवात केली. त्या कसे विणतात ते पाहत मनिषानेही दुसऱ्या सुईवर विणण्याचा प्रयत्न सुरू केला. विणकाम सुरू असताना सहा कधी वाजून गेले दोघींना पत्ताही लागला नाही.
दारात उभ्या असलेल्या विकासला घरातील शांतता व त्या दोघींना एकत्र बसलेले पाहून आपण आपल्याच घरी आलो आहोत की स्वप्नात आहोत असे वाटले. त्याने स्वतःलाच चिमटा काढला व समोर पाहतोय ते सत्य आहे हे त्याला समजले.
काल आपण घेतलेला निर्णय अमानुष वाटला, पण तोच योग्य होता हे आजचे घरातील वातावरण पाहून त्याला वाटले. समाधानाने त्याने आत जाऊन स्वतःच स्वतःसाठी चहा ठेवला. दोघीही त्यांच्या विश्वात गढून गेल्या होत्या. त्यांच्या हातून काहीतरी क्रिएटिव्ह घडतेय याचे त्याला समाधान वाटले. जवळच पडलेली मनिषाची वही उघडून तो कविता वाचू लागला.
काल आपण घेतलेला निर्णय अमानुष वाटला, पण तोच योग्य होता हे आजचे घरातील वातावरण पाहून त्याला वाटले. समाधानाने त्याने आत जाऊन स्वतःच स्वतःसाठी चहा ठेवला. दोघीही त्यांच्या विश्वात गढून गेल्या होत्या. त्यांच्या हातून काहीतरी क्रिएटिव्ह घडतेय याचे त्याला समाधान वाटले. जवळच पडलेली मनिषाची वही उघडून तो कविता वाचू लागला.
सय दाटली मनात, सख्या तुजवीण राहवेना |
होते काहिली जीवाची, दुरावा हा साहवेना ||
होते काहिली जीवाची, दुरावा हा साहवेना ||
समाप्त ©® सौ.हेमा पाटील.
दूरदर्शन आपल्यासाठी आहे, आपण दूरदर्शनसाठी नाही. आमच्या मॅडम त्याला इडियट बॉक्स म्हणायच्या. तो इडियट बॉक्स नाही, पण काय आणि किती पाहायचे, त्यावर त्याचे स्वरुप अवलंबून आहे.
कथा कशी वाटली नक्की सांगा.
ही कथा काल्पनिक असून हिचा कुणाही जिवित वा मृत व्यक्तीशी संबंध नाही.
तसेच या कथेचे सर्व हक्क लेखिकेच्या स्वाधीन आहेत, याची नोंद घ्यावी.
तसेच या कथेचे सर्व हक्क लेखिकेच्या स्वाधीन आहेत, याची नोंद घ्यावी.
