Login

हंडाभर पाणी ( भाग १)

पाण्याची बचत काळाची गरज.....
मलकापूरच्या गावाबाहेर मंगल आणि सखाराम यांनी एका लहान झोपडीत आपला संसार थाटलेला असतो. झोपडीच्या बाजूलाच एक विशाल असे कडुलिंबाचे झाड असते. त्या कडूनिंबाच्या झाडाच्या सावलीत यांनी आपल्या छोट्याशा झोपडीतून संसाराला सुरुवात केलेली असते.
मंगलला दोन मुलं असतात . एक मूल चार वर्षांचे असते तर दुसरी मुलगी ही तीन महिन्यांची असते.
उन्हाळ्याचा महिना चालू असतो. चारही बाजूने प्रचंड गरम उन्हाचे वारे वाहत असते.  वातावरणातील उष्णतेने मोठ्या माणसांच्या अंगाची इतकी लाहीलाही होत असते की तिथे हे तीन महिन्यांचे लहान बाळ उष्णता कसं काय सहन करणार.....
बाळाचा रडण्याचा आवाज ऐकून मंगल झोपडीत जाते.
सूर्याच्या प्रखर उष्णतेमुळे झोपडीचा पत्रा खूप तापला असतो व याचा त्रास त्या बाळाला होत असतो. म्हणून मंगल ने झोपडीतील खांबाला बांधलेला पाळणा सोडून तिने तो  बाहेर कडुलिंबाच्या झाडाला बांधला.
उष्णतेची झळ कमी बसावी म्हणून मंगल पाळण्यावर  एक ओला  कपडा टाकते.
घरात पाणी नसल्यामुळे घरातील कोणीही चार-पाच दिवसांपासून आंघोळ केली नव्हती. आणि या उष्णतेमुळे बाळाच्या अंगाला पुरळ देखील उठले होते. बाळाला थोडे थंड वाटावे म्हणून तिने ओला कपडा घेऊन त्याचे पूर्ण अंग पुसून काढले व त्याला कडुनिंबाच्या झाडाखाली बांधलेल्या पाळण्यामध्ये झोपविले. पाळण्यावर पाण्यात भिजवलेला कपडा टाकल्यामुळे पाळण्याच्या आतील जागा थोडी थंड झाली होती . त्यामुळे बाळाला शांत झोप लागली.
मंगल सखाराम ला बोलते.
काय हो आठ दिवस झाल पाणी आलं नाय.
सरपंच काय म्हणलं उद्या भेटल नव्ह पाणी आपल्याला...
सखाराम हो हो भेटल की, सरपंच म्हणल्याती समदयास्नी चार चार हांड पाणी भेटल.
चारच हंंड पाणी..!
आंघोळीला आणि बाकीच्या खर्चाला पाणी.... म्हणजे परत पाण्यासाठी सावकाराच्या हातापाया पडाव्या लागणार. आपल्या गावात एवढ्या विहिरी आहेत पण एका पण विहिरीला पाणी नाही समद्या विहिरी ओसाड पडलेल्या आहेत. सावकाराच्या विहिरीला तेवढं पाणी लय हाय....
अग ती विहीर सावकाराची नव्हतीच ती विहीर आपल्या गावातल्या सोपान्याची होती पण ह्या सावकाराने ती विहीर त्याच्या नावावर करून घेतली....
अन आता तो पाण्यासाठी अख्या गावाला त्याच्या शेतात राबवून घेतोय बघ....
सावकाराच्या शेतात जेवढं जास्त काम करणार तेवढे जास्त पाणी देण्याचं सावकाराने ठरवलं होतं... आधी हे पाणी सर्व  गावाला फुकट मिळायचं पण आता एक हंडा पाण्यासाठी त्या सावकाराच्या शेतात काम करावं लागतं...
बर आता लय भुक लागली, गप्पा मारू तेवढ्याच कमीच. आता काहीतरी जेवणाचं बघ.
सरपंचांनी उद्या समद्यांना चार चार हांड पाणी मिळेल याची तजबीज करून ठेवली आहे...
आठ दिवसांनी गावात टँकर येतो सर्वांची पाणी घेण्यासाठी धावपळ सुरू होते......
(पुढच्या भागांमध्ये खरंच मंगलला पाणी मिळेल का? यासाठी पुढील भाग नक्की वाचा.)


🎭 Series Post

View all