विहिरीच्या तळाशी अगदी छोटासा पाझर फुटलेला असतो. विहिरीच्या तळाशी पाणी बघून मंगल व सखारामला खूप आनंद होतो. पण त्या विहिरीत पाणी इतक्या कमी प्रमाणात पाझरत असते , की एका दिवसात त्यातून एक किंवा दोन हंडे पाणी मिळण्याची शक्यता होती आणि विहिरी मधून पाणी काढणंही तसं कठीणच होतं . ती विहीर खूप खोल होती आणि विहिरीला खाली जाण्यासाठी पायऱ्या सुद्धा नव्हत्या. पण विहिरीच्या तळाशी साठलेले दोन हंडे पाणी जर आपल्याला मिळाले तर आपल्याला सावकाराकडे काम करण्याची गरज पडणार नाही. त्या वेळेत आपण इतर ठिकाणी काम करून पैसे देखील कमवू शकतो हा विचार सखाराम आणि मंगल करू लागले.
विहिरीत पडलेल्या पाण्याचा ठाव जर गावकऱ्यांना लागला तर आपल्याला हे पाणी मिळणार नाही. असा विचार करून सखाराम आजूबाजूच्या झाडाच्या फांद्या तोडून आणतो व त्या विहिरीमध्ये फेकतो. विहिरीत झाडाच्या फांद्या फेकल्यामुळे गावकऱ्यांना तळाशी जमलेले पाणी दिसणार नाही.
मंगल बोलते ,पाण्याच तर काम झालं. आता आपल्याला सावकाराच्या शेतात काम करण्याची कायबी गरज नाय.
सखाराम मंगला म्हणतो, मंगल असे करून चालणार नाय. आजचा दिवस आपण सावकाराच्या शेतात काम करून म्हणजे सावकाराला संशय येणार नायं.
दोघेही सावकाराच्या शेतात काम करण्यासाठी जातात. दोघे एकत्र काम करत असल्यामुळे ज्वारीचे कणंस कापण्याचे काम लवकरच पूर्ण होते. दोघांनाही एक हंडाभर पाणी मिळते ते पाणी घेऊन दोघेही घरी जातात. आज रात्री आपण विहिरीतील पाणी काढण्यासाठी जाऊया सखाराम बोलतो रात्रीचे गेल्यामुळे कोणालाही समजणार नाही.
मंगल आणि सखाराम रात्री पाणी काढण्यासाठी जे काही सामान लागणार आहे त्याची जमवाजमव करतात. मंगल घरातील एक मोठे प्लास्टिकचे कॅन घेऊन त्याला दोरी बांधते .
तिच्या जुन्या ८ ते १० साड्या एकमेकांना गाठ मारून जोडते. जेणेकरून विहिरीत उतरताना त्याला पकडून उतरणे सोपे जाईल. सारा गाव झोपल्यानंतर दोघेही उठतात . हातामध्ये कंदील घेऊन ते विहिरीच्या दिशेने जाण्यासाठी निघतात. विहीरीजवळ पोहोचल्यानंतर सखाराम त्याच्या पाठीला प्लास्टिकचे कॅन अडकवतो. साडीच्या मदतीने तो विहिरीत उतरतो. मंगल साडीचा एक भाग विहीरी जवळच्या झाडाला घट्ट बांधते व ती साडी आपल्या हातात पकडून ठेवते सखाराम साडीच्या साह्याने विहिरीत उतरतो विहिरीत टाकलेल्या झाडांच्या फांद्या बाजूला करतो व तांब्याच्या सहाय्याने विहिरीच्या तळाशी साठलेले पाणी आपल्या कॅन मध्ये भरून घेतो पुन्हा साडीच्या साह्याने तो विहिरीतून बाहेर निघतो. कोणीही बघण्याआधी दोघेही पटापट घरचा रस्ता पकडतात. मंगल कॅन मधील पाणी एका कपड्याच्या सहाय्याने हंड्यामध्ये गाळून घेते.
दुसऱ्या दिवशी मंगल मुलांना स्वच्छ आंघोळ घालते.
घरात एवढं पाणी बघून मंगला खूप आनंद होतो. आज जेवणामध्ये ती खीर देखील बनवते. आता आपली पाण्याची वनवन थांबली या विचाराने ते दोघेही खूप आनंदी होतात.
असे करता करता एक महिना जातो. एक महिन्यापासून सकाराम आणि मंगल रोज भैरव नाथाच्या मंदिरा मागील विहिरीतून रात्रीचे गपचूप पाणी भरू लागले. पण एक दिवस त्यांना हे करताना गावातील एका माणसाने पाहिले.
(सखाराम आणि मंगलला पाणी भरताना पाहून,हा गावातील माणूस पुढे काय करेल ? हे जाणून घेण्यासाठी पुढील भाग नक्की वाचा.)

Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा