गुण्यागोविंदाने 3

तिला घटस्फोट हवाय
हे झालंच, आता दुसरीकडे त्याच्या आई आणि बहिणीसोबत माझी तुलना करत असतो. आई किंवा बहिणीचा फोन आला की याच्या अंगातच येतं. सगळं सोडून क्षुल्लक कारणासाठी लगेच त्यांच्याकडे पळतो, इथे घरात काय हवं काय नको याच्याशी काही घेणं नाही...बरं मी त्याला म्हणते की पैसे देऊन जा मी बघून घेईल इथलं..तर तेही नाही, "तूला फक्त पैसा उधळता येतो.." एवढंच म्हणतो. घरात सडलेले टमाटे आणेल पण बहिणीच्या मुलांना हजारोच्या खेळण्या घेऊन जाईल...इकडे एक रुमाल घ्यायला नखरे करेल पण आईसाठी ती कधीही वापरणार नाही असे गॅजेट्स घेऊन देईल...या दुतोंडी स्वभावाचा कंटाळा आलाय मला...पुढे पूर्ण आयुष्य काढायचं आहे, नाही जमणार मला...

आई हे सगळं ऐकून सुन्न झाली...तिला तिचे दिवस आठवले. साक्षीच्या वडिलांनी असेच हाल केले होते आईचे. आपली लेकसुद्धा अश्या माणसाच्या पिंजऱ्यात अडकतेय हे बघून आईला प्रचंड वेदना होत होत्या. आईने सगळा धीर एकटवला आणि म्हणाली,

"हे बघ, उद्या तुला तुझा निर्णय सर्वांना सांगायचा आहे...तुझ्या मताशी ठाम रहा, मी आहे तुझ्यासोबत.."

दुसऱ्या दिवशी परत सगळे नातेवाईक जमले. साक्षीची काकू, मामी, बहिणी सगळ्याजणी होत्या. सर्वजण साक्षीच्या निर्णयाची वाट बघत होते.

साक्षी समोर आली. सर्वांनी कान टवकारले..

"मला घटस्फोट हवाय.."

साक्षीचे वडील ताडकन उभे राहिले आणि तिच्या अंगावर धावून गेले..

"घटस्फोट घेऊन आमच्या डोक्यावर बसणार का? इतका पैसा ओतून लग्न लावून दिलं ते मोडण्यासाठी?? आम्ही सर्वांनी इतकी वर्षे गुण्यागोविंदाने संसार केला...पण असली थेरं आमच्या बायकांनी कधी केली नाही..."

साक्षीची आई आज न घाबरता मुलीच्या पुढ्यात आली आणि आज पहिल्यांदा आईचा आवाज चढला होता...
*****

🎭 Series Post

View all