आपण किती सुखी आहोत, आणि त्याआधी खरच सुखी आहोत का हेच समजत नाही. तुम्ही सुखी आहात का? यासारखा अवघड प्रश्न कोणता नसावा- कारण त्याच उत्तर वेळेवर अवलंबून आहे. वेळ बदलली कि सुखाची व्याख्या बदलते.
सुख हे बाह्य गोष्टींवर अवलंबून नसून स्वतःच्या अंतःकरणाची स्तिथी आहे. मग जर का हे सुख दुसर्यावर थोडं देखील अवलंबून नसेल तर त्यात निखळ सुखाची व्याख्या येते- आणि ते सुखं म्हणजे नेमके काय हे कोणी ही सांगणार नाही. फक्त जे सुख बाह्य गोष्टींपासून प्राप्त होतंय ते म्हणजे – ‘भौतिक सुख’ ..
आपण वस्तुस्तिथी पासून पाठ फिरवतो आणि हे सुख सोडून जे सुख काय आहे तेच माहित नाही अशा सुखाकडे पळतो. का आपण भौतिक सुखाला आपलस करून त्यात निखळता कशी आणता येईल याचा शोध घेत नाही.
‘भौतिक सुख’ कळायला पण सोप्प आहे आणि बहुतेक मिळवायलाही. पण आपण हे मान्य करत नाही.
खरंच म्हणतात ना सुखाचं मोजमाप करता च येत नाही...
नमस्कार. सौ. सोनल गुरुनाथ शिंदे ( देवरुख - रत्नागिरी )
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा