#सामाजिककथा#स्पर्धा
हॅपी बर्थडे-भाग 1
बरोबर संध्याकाळचे 6 वाजले आणि कारखान्याचा भोंगा वाजला. सगळ्या कामगारांनी आपापले काम आवरते घेतले. श्रीपती सुद्धा आपली थैली घेऊन निघाला.
"थांब श्रीपतीकाका," श्रीपती थबकला आणि वळून बघितले. दौलत त्याच्या मागोमाग आला होता.
"काका, अजूनबी येळ गेली न्हाई. माह्या युनियन मदे या तुम्ही. कामगारांचे भले करायलेचं संघटना हाय आपली."
"दौलत, मी तुला कितीदाव सांगितलं, तुमचं युनियन बिनीयन पटत न्हाय मले मनून. तू तं हात धून मागेच लागला गड्या."
दौलतला समजावून सांगणे दिवसेंदिवस कठीण होत होते. तरुण रक्त, पोरगेलेसा दौलत. नुकताच कारखान्यात कामाला लागला आणि नवीनच वारं त्याच्या डोक्यात घुसलं होतं.
"काका तुम्ही नाय म्हणता मनून बाकी कामगार बी तयार होत न्हाई. तुमी समजा अन समजावा की त्यायले. कामगार संघटना अशिन ना तं आपले सारे हक्क मियते. नाही मियाले तं लढता बी येते."
"आरं पोरा, पन मी मनतो लढायचे कायले हाय तुले? आपला कारखाना छोटुसा, कामगार बी थोडेच. नि त्यातल्या त्यात मॅनेजर साहेब नि मालक दोघेबी लय चांगले हायेत. साऱ्याचे हक्क देतात ते, न मागताच. अडलंनडलं, दुखलंखुपलं तं धावून येतात. विचारपूस करतात, मदत करतात. देवमाणूस आहे मालक, कायले लढा लागते मंग. सरळ सरक्या रस्त्यानं जायाचं सोडून तुय भलतंच हाय हे. बह्याळपणा सोड अन कामाकडे लक्ष दे जरा बाबू."
श्रीपती ऐकत नाही बघून दौलत,"ठीक हाय, बघुन घेईन म्या काय करायचं ते,"असं म्हणत खुन्नसभऱ्या नजरेने बघत निघून गेला.
श्रीपती एकटा जीव सदाशिव. कारखान्यातला सर्वांत प्रामाणिक आणि जुना जाणकार कामगार. अतिशय चोख आणि प्रामाणिक काम होते त्याचे.
मॅनेजर आणि कारखान्याचे मालक सुद्धा त्याच्यावर खुश होते. त्यांच्या मर्जीतला होता श्रीपती पण त्याने त्याचा कधीच गैरफायदा घेतला नाही. त्याला मान देणारे खूप होते आणि काही सिनिअर कामगारांना ते खटकू लागले होते.
त्याची लोकप्रियता, त्याला मिळणारा सन्मान त्यांना सहन व्हायचे नाही.
अश्या काही कामगारांनीच दौलतला भडकवले होते.
त्याच्या खांद्यावर बंदूक ठेवून गोळी चालवणारे दूसरेच आहेत हे श्रीपती चांगलंच ओळखून होता. पण स्वतःहून उगाच कुणाच्या नादी लागायचे नाही हे त्याचे तत्त्व होते.
चालता चालता अचानक गरम वारा त्याला झोंबू लागला. भर उन्हाळ्याचे दिवस.
श्रीपतीच्या मनात आले,"काही वर्षांत ऊन जरा जास्तच जाणवू लागले आहे. पाणीटंचाई पण दरवर्षी वाढते आहे."

मालकाचे शब्द त्याला आठवू लागले,"ऊस मिळायला अडचण जाऊ लागली आहे श्रीपती, काय होणार काय माहिती, अशीच टंचाई वाढत राहिली तर कारखाना सुरू ठेवू शकणार नाही," मालक काळजीने बोलत होते.
सध्याची पर्यावरण परिस्थिती, बिकट होत असणाऱ्या पर्यावरण समस्या याची जाणीव श्रीपतीला नक्कीच होती.
सामाजिक भान त्याला होतं.
सामाजिक भान त्याला होतं.
बुलढाणा जिल्ह्यातील छोटेसे गाव 'दुसरबीड.'
साखर कारखान्यामुळे वस्ती वाढलेली. बऱ्याच लोकांनी पूरक असे व्यवसाय थाटून संसार मांडलेला त्यामुळे गाव छोटं असलं तरी गजबलेलं.
गावातली फेमस जागा म्हणजे बाजारगल्ली. गल्लीच्या दोन्ही बाजूंनी दुकानांच्या रांगा म्हणून तिचं नाव बाजारगल्ली.
टेलर चाचा, सायकल दुकानवाले दादा, मिठाईवाले, किराणावाले सगळे गुण्यागोविंदाने बाजारगल्लीत नांदणारे, खाली दुकानं आणि वरती राहणे. या सगळ्यांसोबत श्रीपतीची मैत्री होती.
बाजारगल्ली संपली आणि डाव्या हाताने वळलं की श्रीपतीचं छोटंसं घर होतं. एकटाच असल्यामुळे त्याला घरी जायची घाई नसायची. गप्पा मारत बाजारगल्लीत तो रमायचा.
बरेचदा त्याचे मित्र त्याच्यावर दुकान सोपवून त्यांची कामं आटोपून येत. श्रीपतीचा जीव होता तिथल्या लोकांवर, त्या आळीवर, त्याच्या गावावर.

त्यादिवशी दौलतच्या बोलण्याचा विचार करत त्याला कसे समजवावे ह्या विचारात तो चालला होता तोच टेलरचाचाने आवाज दिला.
"अरे ओ श्रीपती, क्या हुवा, आज सिद्धा घरपे जा रहा है क्या? किधर खोया है भाई? आजाओ जरा चाय पिते है."
"नही भाई, चाय नही पीनी आज. गरमी बहोतही ज्यादा है."
तोपर्यंत गल्लीतले त्यांचे मित्रमंडळ जमले होते. इकडच्या तिकडच्या गप्पा सुरु झाल्या. वाढती गरमी, पाणीटंचाई, कारखाना यावरून हळूहळू विषय सरकार, राजकारण याकडे वळले.
गावातले असले तरी अडाणी नाही तर सुशिक्षित होते सगळे. प्रत्येक विषयावर चर्चा व्हायच्या आणि प्रत्येकाचे आपले असे ठाम मत असायचे.
गावातले असले तरी अडाणी नाही तर सुशिक्षित होते सगळे. प्रत्येक विषयावर चर्चा व्हायच्या आणि प्रत्येकाचे आपले असे ठाम मत असायचे.
चर्चेच्या जोशात एखादेवेळी वाद निर्माण होतोय अशी परिस्थिती निर्माण झाली तरी श्रीपती सांभाळून घेई. त्याचा शब्द गावकरी मानायचे.
त्यादिवशी बोलता बोलता चर्चा पर्यावरण रक्षणावर येऊन पोचली होती.
चर्चेतून मित्रमंडळाने ठरवले की कारखान्याच्या मागे जी मोकळी, ओसाड जागा आहे तिथे वृक्षारोपण करूया. समाजकार्यही होईल आणि पर्यावरण संवर्धन देखील होईल.
"आपल्यासोबत आपल्या पुढल्या पिढीचा बी फायदा होईल," मिठाईवाले काका म्हणाले.
"ठरलं तर मंग, श्रीपती, झाडं कोंती आणाची, कुटं लावायची, ह्यो कार्यकरम कसा कराचा, समदं तुवा ठरवाचं. तू नेता हायेस बरं आमचा,"टेलरचाचा म्हणाले आणि सगळ्यांनी त्याला समर्थन दिलं.
"उद्याच्याला मालकासनी बोलतो अन मंग ठरवू काय ते," श्रीपती बोलत होता पण मनात त्याच्या वेगळेच विचार सुरू होते.
क्रमशः
(काय विचार करीत असेल श्रीपती? कोणाचा असेल हॅपी बर्थडे? पुढील दोन भागांत नक्की वाचा)
© डॉ समृद्धी अनंत रायबागकर
#अष्टपैलूस्पर्धा2025
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा