Login

हॅपी एंडिंग ! पार्ट 1

.
प्रतिबिंब

उन्हाळाचे दिवस होते. दुपारचा प्रहर होता. क्रांतिचौक पोलिसस्टेशनमध्ये भलतीच गर्दी होती. नवीनच जॉईन झालेले पोलीस ऑफिसर घनश्याम पांडेजी यांनी प्रेस कॉन्फरन्स बोलावली होती. ते स्वतः मीडियासमोर जाण्यासाठी खूप उत्सुक होते. सोबतच सहकारीही टीव्हीवर येणार म्हणून खूप आनंदी होते. काहीजण दहा वेळा तोंड धुवून चेहऱ्यावर क्रीम पावडर लावत होते. तर काहीजण घरी फोन करून टिव्हीवर येणार असल्याचे सांगत होते. मीडियावाले वेळेवर पोहोचले होते. त्यांच्या जलपानाची व्यवस्था करण्यात आली होती. एका मसाज पार्लर सेंटरवर पांडेजींनी छापा टाकला होता. मसाजसोबतच तिथे देहविक्रीचा प्रकारही चालला होती. अखेरीस प्रेस कॉन्फरन्स सुरू झाली. पत्रकारांनी फोटो काढल्या. घनश्याम पांडेजी मध्यभागी आणि इतर सहकारी त्यांच्या आजूबाजूला बसले होते. पिवळे टीशर्ट घातलेल्या एका तरुणाला समोर आणण्यात आले. त्याने तोंडावर रूमाल बांधला होता.

" बोल. काय करायला गेला होता तिथे ?" घनश्याम पांडेंजी यांनी विचारले.

" सर , मसाज करायला गेलो होतो. " तो मुलगा घाबरतच म्हणाला.

" कंडोम काय मग फुगे फुगवायला नेले होते का ?" घनश्याम पांडेंजी म्हणाले.

पांडेजी असे बोलताच सर्वत्र हास्याचा फवारा उडाला. पत्रकारांनी विविध प्रश्न विचारले. पांडेजी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी योग्य उत्तरे दिली. थोड्या वेळाने पत्रकार निघून गेले. पकडले गेलेले सर्व तरुण
भेदरलेल्या अवस्थेत होते. सर्वजण आपापल्या घरी फोन लावत होते. कुणी सोडून द्या म्हणून विनवणी करत होते. तर कुणाला रडू कोसळत होते. कुणी पैश्यांचे आमिष दाखवून सोडायला सांगत होते. पण पांडेजी प्रामाणिक पोलीस अधिकारी होते. ते या आमिषाला बळी पडले नाहीत. पकडल्या गेलेल्या तरूणांपैकी एक तरुण अंकुर भलताच शांत होता. कुरळे केस , दिसायला सुंदर असलेला अंकुर कपड्यांवरून चांगल्या घरचा वाटत होता.

" ए मुला , तुला कुणाला फोन नाही करायचा का ?" एका हवालदाराने विचारले.

अंकुर गप्पच होता. तो क्षणभर भूतकाळात गेला.

***

तेव्हा अंकुर जवळपास वीस वर्षाचा होता. त्याचे अभियांत्रिकीचे द्वितीय वर्ष चालू होते.

" तू अजूनही व्हर्जिन आहेस ?" संदिप म्हणाला.

" हो. " अंकुर म्हणाला.

संदीप जोरजोरात हसला.

" काय झाले ?" अंकुरने विचारले.

" तू करन जौहर टाईप तर नाहीस ना ?" संदिप म्हणाला.

" गप रे. " अंकुर म्हणाला.

" मी तर म्हणतो , अमृताला गर्लफ्रेंड बनव. मग कार्यक्रम आटपून टाक. " संदिप म्हणाला.

अंकुरने अमृताला आपल्या प्रेमाच्या जाळ्यात अडकवले. दोघेही रिलेशनशिपमध्ये गेले. एकेदिवशी अंकुरने अमृताला घरी बोलवले. अंकुरने पूर्ण घर सुंदरपणे सजवले होते. अमृता येताच अंकुरने तिला मागून मिठी मारली. दोघेही बेडरूममध्ये गेले. अंकुरने अमृतासोबत जवळीक साधण्याचा प्रयत्न केला. शेवटी त्याने खिश्यातून कंडोमचे पाकीट काढले.

" हे काय आहे अंकुर ?" अमृताने रागात विचारले.

" डोन्ट ट्राय टू ऍक्ट लाईक अ इडियट ? गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड एकांतात याच गोष्टी करत असतात ओके. " अंकुर म्हणाला.

" मला नाही आवडत लग्नापूर्वी हे सर्व केलेलं. " अमृता म्हणाली.

" यार , प्लिज आता संस्कारी बहू नको बनू ओके. लेट्स हाव अ सेक्स. " अंकुर म्हणाला.

अंकुर अमृताला जवळ करत होता. पण अमृता त्याला ढकलत होती आणि अखेरीस नकळतपणे तिने अंकुरला थोबाडीत मारली.

" मला वाटलं तू माझ्यावर प्रेम करतोस म्हणून माझ्यासोबत रिलेशनशिपमध्ये आलास. पण तू तर फक्त " हवस का पुजारी " आहेस. " अमृता म्हणाली.

" मग तूही माझे लुक्स पाहूनच प्रेमात पडलीस ना. सती सावित्रीचे ढोंग दुसऱ्यासमोर कर. स्वतःची गर्लफ्रेंड असताना दुसऱ्या ठिकाणी तोंड मारत फिरू का ?" अंकुर म्हणाला.

" गर्लफ्रेंड ? सर्व संपलंय अंकुर. बाय. " अमृता म्हणाली.

अमृता रडत रडत अंकुरच्या घराबाहेर पडली.

क्रमश...
0

🎭 Series Post

View all