अंकुर पुन्हा भूतकाळात गेला. तेव्हा गोव्यात ट्रिपवर असताना अचानक रुद्रला घरी काहीतरी काम निघाले म्हणून त्याला गोवा ट्रीप सोडून माघारी जावे लागले. रुद्र अंकुरचा मोठा भाऊ होता. तो अंकुरची खूप काळजी घ्यायचा. मार्गदर्शन करायचा. आता रुद्र नसल्यामुळे अंकुरची गाडी सुसाट वेगाने धावत होती. एकेरात्री सर्वजण खूप थकले होते. पण अंकुरला अजूनही बाहेर फिरायचे होते. म्हणून तो रेंटने गाडी घेऊन बाहेर फिरायला निघाला. त्याला एक इसम रस्त्यात भेटला.
" सर , मसाज हवीय का ?" तो इसम म्हणाला.
" चांगली प्लेस असेल तरच येईल. " अंकुर जुन्या अनुभवाने शहाणा होऊन म्हणाला.
" हो सर. तुम्ही फोटोज चेक करून घ्या. मुली पण खूप सुंदर आहेत. तुमचे पैसे वसुल होतील. " तो व्यक्ती म्हणाला.
त्या माणसाने सुंदर सुंदर स्त्रियांच्या फोटो दाखवल्या.
त्या स्त्रियांना पाहून अंकुरची कामभावना जागृत झाली. तो मसाज घेण्यासाठी तयार झाला. तो व्यक्ती अंकुरला एका घरात घेऊन गेला. तिथे एक सुंदर सजवलेली खोली होती. सोफ्यावर एक सुंदर स्त्री बसली होती. अंकुरने एक नजर तिच्या देहावर फिरवली. स्वर्गातील अप्सरा भूतलावर अवतरली आहे असाच त्याला भास झाला. कधी एक त्या सुंदरीला कुस्करून टाकतो असे अंकुरला झाले. अंकुरला इथपर्यंत आणले तो इसम पैसे घेऊन दोघांना एकटे सोडून निघून गेला. अंकुर त्या स्त्रीच्या जवळ जाऊन बसला.

तिच्या गुडघ्यावर हात फिरवला. तिने मात्र लगेच तो हात झटकून त्याला धक्का दिला. मग तिने स्वतःचेच कपडे फाडले. खोलीतल्या वस्तू फेकल्या. ती आरडाओरडा करू लागली.
" काय झाले ?" अंकुरने विचारले.
" लाज नाही वाटत माझा रेप करतोय ?" ती स्त्री म्हणाली.
" आर यु आउट ऑफ युअर माईंड ?" अंकुर म्हणाला.
" जेवढे पैसे आहेत तेवढे दे. नाही तर मी पोलिसांकडे तुझी तक्रार करेल. " ती स्त्री म्हणाली.
" एक छदामही नाही भेटणार तुला. " अंकुर म्हणाला.
अंकुर तिथून रागात निघू लागला तेवढ्यात तिने त्याचा हात धरला.
" खिडकीतून खाली बघ. " ती स्त्री म्हणाली.
अंकुरने खिडकीखाली बघितले. काही गुंडे हातात हॉकी स्टिक घेऊन उभे होते.
" खूप मारतील हे. पोलिसांसोबत आमची सेटिंग आहे. आम्ही इथले लोक आहोत. तू बाहेरचा आहेस. बाकी तुझी इच्छा. " ती स्त्री म्हणाली.
अंकुरला घाम फुटला. त्याच्यापुढे कसलाच पर्याय नव्हता. त्याने सर्व रक्कम जमा केली.
" वेलकम टू गोवा बेबी. " ती स्त्री अंकुर जाताना हसत म्हणाली.
क्रमश..
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा