Login

हॅपी एंडिंग ! पार्ट 4

.
तिथून अंकुर सरळ घरी आला. त्याच्या आईवडिलांपर्यंत प्रकरण पोहोचले.

" तुला एक लॅविश लाईफस्टाईल जगता यावी म्हणून हवे तेवढे पैसे देतो ना. तुझ्या अकाउंटमध्ये झिरो बॅलन्स ?" अंकुरचे वडील म्हणाले.

" सो सॅड ना डॅड. वर्षातून तुम्ही दोघेही आपापल्या पार्टनरला सोडून आले मुलाला भेटायला पण फक्त पैश्यासाठी. " अंकुर म्हणाला.

" शट अप. स्वतः कमवशील तेव्हा कळेल. " अंकुरची आई म्हणाली.

" मॉम , तुम्ही दोघांनी मला पैसे सोडून काय दिले आहे आयुष्यात ? लहानपणीपासून तुमची भांडणे बघतोय. कमीत कमी माझ्या एकाही वाढदिवसाला तरी हॅपी फॅमिलीसारख राहता नाही आलं तुम्हाला. " अंकुर म्हणाला.

" तुझ्यासोबत काही फ्रॉड झाला असेल तर सांग. आपण पोलिसांची मदत घेऊ. " अंकुरचे वडील म्हणाले.

" फ्रॉड तर लहानपणीपासून होतोय. पिकनिकला जायचं म्हणतात आणि घरी नशेत येऊन धिंगाणा करतात. दोघेही पार्टीला जात होते तेव्हा विचार केलाय मला किती भीती वाटत होती रात्री झोपताना ? मी नेहमी एकटा राहिलो आयुष्यात. मला जेव्हा आईवडिलांच्या प्रेमाची सर्वात जास्त गरज होती तेव्हा तुम्ही दोघेही जवळ नव्हते. हे फ्रॉडमध्ये गेलेले पैसे परत भेटतील पण बालपणीचे ते क्षण कसे परत मिळवणार ?" अंकुर म्हणाला.

अंकुर इतके बोलून निघून गेला. तेवढ्यात तिथे रुद्र आला. तो अंकुरच्या बेडरूममध्ये गेला. अंकुर रुद्रच्या कंठाला लागून रडू लागला.

***

" अंकुर कोण आहे इथे ? त्याचा भाऊ आलाय. " हवालदार म्हणाला.

अंकुर चटकन उभा राहिला आणि बाहेर गेला. त्याला रुद्र आणि अमृता सोबत दिसले. सोबत एक वकीलही होता.

" भाई , तुझी बेल झाली आहे. तू फोन कट केल्यावर आम्ही पुन्हा त्या नंबरवर ट्राय केला. मग सर्व प्रकरण समजले. चल बाहेर. " रुद्र म्हणाला.

तिघेजण बाहेर गेले. जवळच एका कॉफीशॉपमध्ये तिघेही बसले.

" माझ्या मैत्रिणीच्या लग्नात मला रुद्र भेटला. मग आम्ही डेटिंग करू लागलो. तुला खरच हर्ट करायचं नव्हतं. आम्हाला वाटलं तू मूव्ह ऑन केलं असशील." अमृता शांतता भंग करत म्हणाली.

" मला जशी समजूतदार मुलगी हवी होती तशीच आहे अमृता. आम्ही खरच एकमेकांवर खूप प्रेम करतो. " रुद्र म्हणाला.

" प्रेम " शब्द ऐकताच अंकुर पुन्हा भूतकाळात गेला.

क्रमश...
0

🎭 Series Post

View all