रुद्रने अंकुरला शहरात जिथे देहविक्री चालते अश्या मसाज सेंटर विषयी सांगितले.
" हे बघ , आधी त्या मसाज पार्लरमध्ये जा. जी सर्वात सुंदर असेल तिच्याशी मैत्री कर. ओळख वाढव. मग एकेदिवशी तिला विचार की " हॅपी एंडिंग " आहे का ? तिने होकार दिला तर लॉटरी तुझी. पहिल्याच दिवशी नको विचारू हॅपी एंडिंग आहे का म्हणून ? माझ्या एका मित्राने लगेच पहिल्या दिवशी विचारले आणि त्याला थोबाडीत मारली त्या मसाजरने. " रुद्र म्हणाला.
" हो रे. " अंकुर म्हणाला.
अंकुर त्या मसाज पार्लरमध्ये गेला. तिथे उपस्थित सर्व मसाजरपैकी त्याला " निमा " सर्वात जास्त आवडली. निमा मणिपूरची होती. प्रथमदर्शनी तर अंकुरला ती चायनिजच वाटली. वडिलांच्या मृत्यूनंतर लहान भावाच्या शिक्षणासाठी आणि आईच्या आजारावर उपचारासाठी निमा गाव सोडून शहरात आली. तिच्या काकांनीच तिला या व्यवसायात खोटेनाटे सांगून आणले. सुरुवातीला देहविक्री करायला ती तयार नव्हती. पण आईच्या आजारपणासाठी लागणारा पैसा , भावाच्या भविष्यासाठी लागणारा पैसा , काकांचा दबाव या सर्वांमुळे ती तयार झाली. ती मसाज खूप सुंदर करायची. खूप ग्राहक तिच्यासोबत समागम करायला उत्सुक असत. निमा यंत्रवत सर्वकाही करत. तिच्या आईची तब्येत सुधारत होती. अंकुरला ती पाहताच पसंत पडली. तिच्या नाजूक स्पर्शाने अंकुरचा सर्व ताण हलका होत. हळूहळू अंकुर आणि तिच्यात समागम होऊ लागला. दोघांमध्ये प्रेमाचा " अंकुर " कधी फुटला त्यांनाही कळले नाही.
***
" भावा , निमालापण सोडवावे लागेल. पोलिसांनी छापा टाकला तेव्हा तिलाही आत टाकले असेल. " अंकुर म्हणाला.
पोलिसांनी सर्व महिलांची रवानगी सुधारगृहाकडे केली होती. रुद्र , अमृता , अंकुर महिला सुधारगृहाकडे गेले. तिथे त्यांना निमा भेटली. अंकुरला पाहताच ती धावत त्याच्याकडे गेली.
" मला वाटलंच तू येशील मला सोडवायला. " निमा रडू लागली.
" निमा , माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे. मी आजपर्यंत कधी कुणावर प्रेम केलेच नाही. अमृता माझ्यावर खूप प्रेम करायची पण मी तिला नेहमीच वासनांध नजरेने पाहिले. लहानपणीपासून कधी कुणाचे प्रेम भेटले नाही. आईवडिलांना प्रेमापेक्षा भांडताना , शारीरिक वासनेची पूर्तता करतानाच जास्त पाहिले.
पैसे फेकून देह कुस्करुन घेऊ शकतो पण मने जिंकू शकत नाही. वासनेच्या दलदलीत प्रेमाचे कमळ तुझ्यामुळे खुलले. मी तुला लवकरात लवकर सोडवेल. मग आपण लग्न करू. तुला काही दिवस इथेच रहावे लागतील. " अंकुर म्हणाला.
पैसे फेकून देह कुस्करुन घेऊ शकतो पण मने जिंकू शकत नाही. वासनेच्या दलदलीत प्रेमाचे कमळ तुझ्यामुळे खुलले. मी तुला लवकरात लवकर सोडवेल. मग आपण लग्न करू. तुला काही दिवस इथेच रहावे लागतील. " अंकुर म्हणाला.
" साहेब , माझ्या भावाचे , माझ्या आईचे काय होईल ?" निमा रडू लागली.
" मी काळजी घेईल त्यांची. पैसे पाठवत जाईल. तू अजिबात चिंता नको करुस. " अंकुर म्हणाला.
" पण पोलिसांना टीप कुणी दिली असेल ?" रुद्र म्हणाला.
" सुधाच्या सवतीने. हर्षद पाटील सुधावर प्रेम करू लागला होता. त्याची बायको वसुंधरा तमाशा करून गेली होती. नक्कीच तिनेच हा घोळ केला असेल. " निमा म्हणाली.
क्रमश...
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा