हर्षद टीव्हीवर न्यूज बघत होता. टीव्हीवर घनश्याम पांडेजी यांची प्रेस कॉन्फरन्स झळकत होती.
" ओ फक. मला सुधाला वाचवायला जावेच लागेल." हर्षद म्हणाला.
हर्षद उठला. तो जाणार तेवढ्यात त्याचा मित्र म्हणजेच अनुरागने त्याचा हात धरला.
" भाई , नको जाऊ. तू या शहराचा सर्वात मोठा बिजनेसमॅन आहेस. जर तू तिथे गेलास तर मीडियाला नवीन विषय भेटेल. " अनुराग म्हणाला.
" मला सुधापाशी तूच घेऊन गेला होतास ना ?" हर्षद म्हणाला.
" हो. कारण तेव्हा तुझ्यात आणि वहिनीमध्ये प्रॉब्लेम चालू होता. तुझ्या शारीरिक गरजा पूर्ण व्हाव्यात म्हणून मी सुधाकडे घेऊन गेलो होतो. आपण या लोकांचा उपयोग करायचा असतो. उपभोग घ्यायचा असतो. टिशू पेपर वापरून एकदा फेकला तर पुन्हा उचलायचा नसतो. काही दिवस थांब. मग बघू सुधाला कस सोडवायचे ते. " अनुराग म्हणाला.
***
हर्षद चिडून बेडरूममध्ये आला. त्याची बायको वसुंधरा सिगरेट ओढत होती.
हर्षद चिडून बेडरूममध्ये आला. त्याची बायको वसुंधरा सिगरेट ओढत होती.
" शहरातला सर्वात श्रीमंत व्यक्ती आपल्या रखेलीला सोडवायला गेला नाही ?" वसुंधरा कुत्सितपणे म्हणाली.
" शट अप वसुंधरा. " हर्षद ओरडला.
" यु शट अप मिस्टर हर्षद. तू सुधाला सोडवून जरी आणलं तरी तिला बायको म्हणून चारचौघात मिरवू शकणार नाहीस. कारण ती तुझ्यासारख्या शंभर पुरुषांच्या अंगाखाली गेली आहे. रखेलीसोबत गादी गरम करू शकतो पण हातात हात धरून रस्त्यावर चालू शकत नाही. " वसुंधरा ओरडली.
हर्षद पाय आपटत निघून गेला.
***
काही दिवसांनी अंकुरमुळे निमा सुटली. पण सुधाची सुटका त्या आधीच मसाज पार्लरच्या मालकाने केली होती. निमाने सुधाला खूप शोधलं पण ती सापडली नाही. सर्वांचे लायसन्स रद्द झाले होते. काहीजण म्हणतात की निमा वेश्याव्यवसायात घुसली आहे. अंकुरने निमासोबत लग्न केले. हर्षदने स्वतःसाठी दुसऱ्या " सुधा " ची सोय केली आहे. ही कथा सत्य घटनेवर आधारित असून त्यामागे कोणत्याही राज्याला किंवा व्यवसायाला बदनाम करायचा हेतू नाही. आजकाल बऱ्याच शहरात " मसाज " च्या नावाखाली देहविक्रीचे प्रकार सर्रास चालतात. यामुळे काही प्रामाणिक मसाजर नाहकच बदनाम होतात. " आधुनिक " समाजाच्या वाढत्या वासनांध प्रवृत्तीचे हे कटू " प्रतिबिंब " आहे.
©® पार्थ
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा