*नवीन वर्ष २०२६ म्हणजेच शब्दांमधील नात्यांचा उत्सव, सुनिल पुणेTM*
नवीन वर्ष केवळ दिनदर्शिकेतील एक नवे पान नसते, तर ते मनातील आशा, नात्यांतील विश्वास आणि विचारांतील नवचैतन्य घेऊन येते. या नव्या वर्षाच्या उंबरठ्यावर उभा राहून मागे वळून पाहताना एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते, मी जे काही आहे, जे काही लिहितो, आणि जे काही वाचकांपर्यंत पोहोचते, त्यामागे इरा आणि तुम्ही सर्व वाचक आहात.
माझ्या सर्व वाचकवर्गाला, हितचिंतकांना आणि मित्रपरिवाराला नवीन वर्ष २०२६ च्या मनःपूर्वक शुभेच्छा!

आजपर्यंत मी जे काही लेखन केले, त्याचे संपूर्ण श्रेय मी कधीच स्वतःकडे घेत नाही. कारण लेखन हे एकाकी नसते; ते वाचकांच्या भावना, प्रतिसाद, टीका, प्रेम आणि पाठबळातून घडत असते. तुम्ही दिलेले प्रत्येक कौतुकाचे शब्द, प्रत्येक सकारात्मक प्रतिक्रिया आणि कधी कधी दिलेली परखड सूचना, या साऱ्यांनीच मला अधिक प्रामाणिकपणे लिहायला शिकवले आहे.
मी सामाजिक विषयांवर लिहितो, कारण समाजातील वास्तव मला अस्वस्थ करते.
मी कौटुंबिक नात्यांवर लिहितो, कारण तिथेच माणूस घडतो आणि कधी कधी मोडतो.
मी भावनिक लेख लिहितो, कारण प्रत्येकाच्या मनात न सांगता येणाऱ्या कथा असतात.
मी सत्य घटनांवर लिहितो, कारण वास्तवाकडे डोळे झाकून चालताच येत नाही.
या सर्व लेखनप्रवासात तुमचे मार्गदर्शन, तुमची साथ आणि तुमचा विश्वास माझ्यासाठी दीपस्तंभासारखा राहिला आहे. “हे आमच्याच मनातलं आहे, सुनिल सर, खुपच छान” असे जेव्हा कुणी म्हणते, आणि त्यातील काही लेख माननिय अभिवाचक सौ निलिमा पटवर्धन, श्री राजीव जोशी, सौ. राधिका मुधोलकर हे बडोदे शहरातुन अभिवाचन करतात तेव्हा, माझ्या लेखनाला खऱ्या अर्थाने यश मिळते.

नवीन वर्ष २०२६ मध्येही मी हाच प्रामाणिक प्रयत्न करणार आहे,
समाज जागृत करणारे शब्द लिहिण्याचा,
नात्यांना आरसा दाखवणाऱ्या ओळी मांडण्याचा,
आणि माणूस म्हणून अंतर्मुख व्हायला लावणारे विचार तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा.
हे लेखन माझे असले, तरी त्याचा आत्मा तुमचा आहे.
म्हणूनच पुन्हा एकदा सांगतो आज पर्यंतच्या प्रत्येक लेखामागे तुमचेच श्रेय आहे आणि पुढेही ते तितकेच राहील.

नवीन वर्ष २०२६ तुमच्यासाठी आरोग्य, समाधान, प्रेम आणि सकारात्मकतेने परिपूर्ण जावो, हीच मनापासून शुभेच्छा!

सुनिल पुणे TM 9359850065.
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा