"दादा, इथं का आणलंस? काय घ्यायचं आहे आईसाठी? अरे, सोनं किती महाग झालंय माहिती आहे ना?." सुबोध आणि मानस आपट्यांच्या सराफी दुकानात आले होते.
"सुबोध, आता तू लहान नाहीयस. नोकरी करतोस ना? मग जरा मोठे विचार करायला शिक. आईसाठी छानसे कानातले घेऊया. यावर्षी तिचा वाढदिवस जोरात साजरा झाला पाहिजे." दोघांना बघून आपट्यांची मुलगी पुढं आली.
" मानस, आज इकडे?" तिच्या चेहऱ्यावर आश्चर्य दिसत होतं. त्याला आलेलं पाहून ती चक्क लाजत होती आणि सुबोध दोघांकडे आळीपाळीने बघत उभा होता.
"काय हवं आहे?"
" मानस, आज इकडे?" तिच्या चेहऱ्यावर आश्चर्य दिसत होतं. त्याला आलेलं पाहून ती चक्क लाजत होती आणि सुबोध दोघांकडे आळीपाळीने बघत उभा होता.
"काय हवं आहे?"
"तू..आईसाठी छानसे कानातले दाखव." मानस.
"कसे हवेत? टॉप्स, झुबे, मिनावर्क?"
"आम्हाला त्यातलं फारसं कळत नाही. तू तुझ्या पसंतीचे दाखव. आम्हाला जे आवडतील ते घेऊ." सुबोध म्हणाला.
पण गौरीचं त्याच्याकडे लक्ष नव्हतं. ती एकटक मानसकडे बघत उभी होती. दोघांच्या चेहऱ्यावर निराळे भाव उमटले होते. लाजून गाल लाल झालेली गौरी घोळदार वनपीसमध्ये छान दिसत होती. दुकानात ओळीने लावलेले पिवळे लाईट्स तिच्या चेहऱ्यावर एक वेगळीच शोभा आणत होते.
सुबोधला याचा राग आला. त्याच्या मनात शंकेची पाल चुकचुकली. पण काही न बोलता तो गौरी जे दाखवेल ते बघत उभा राहिला. तिने तिच्या आवडीचे बरेचसे कानातले दाखवले. त्यातला एक निवडत ती म्हणाली, "काकूंसाठी हे घेऊन जा. छान दिसतील त्यांना." मानसने कोणतेही आढेवेढे न घेता ते विकत घेतले.

"दादा, किंमत तरी बघ." सुबोध जवळ जवळ ओरडलाच.
"मी पैसे देतोय ना? मग कशाला ओरडतोस? आणि आईसाठी गिफ्ट घ्यायला किंमत काय बघायची?" मानस हळू आवाजात म्हणाला.
"हो. अरे, बाबा काहीतरी डिस्काउंट देतील. सुबू, तू काळजी करू नकोस." गौरी त्याचे गाल ओढत म्हणाली.
मानस आणि गौरी शाळेपासूनचे मित्र होते. त्यांचं एकमेकांच्या घरी येणं -जाणं होतं त्यामुळे गौरीपेक्षा लहान असणारा सुबोध तिला भावासारखा वाटायचा. कधी ती त्याचे लाड करायची, कधी हक्काने रागवायची. जसं वय वाढत गेलं तसा सुबोधला गौरीचा हक्क म्हणजे जाच वाटायला लागला, तो तिला टाळायला लागला. त्याला गौरी आवडेनाशी झाली. केवळ हाय -हॅलो पुरतं तो तिच्यासमोर उभा राही अन् आता समोरचं चित्र वेगळंच दिसत होतं. याचा सुबोधला राग आला होता. मानस आणि ती मैत्रीचं नातं ओलांडून पुढं आले होते, हे दोघानांही नव्यानेच उमगलं होतं.
"मानस, आज इकडे!" गौरीचे बाबा, अभय काकांना मानसला दुकानात आलेलं पाहून आश्चर्य वाटलं. "सुबोध किती मोठा झाला रे! खूप दिवसांनी बघितलं ना त्याला."
"मग मी काय लहानच राहणार होतो का?" सुबोध वरकरणी हसत म्हणाला खरा. पण मनातून त्याला राग आला होता.
हे ऐकून मानसने त्याला कोपराने ढोसलं.
"दुकानात आज कामगार कमी दिसताहेत?" मानस विषय बदलत म्हणाला.
हे ऐकून मानसने त्याला कोपराने ढोसलं.
"दुकानात आज कामगार कमी दिसताहेत?" मानस विषय बदलत म्हणाला.
"नुकतीच दिवाळी संपली. कोणी घरी गेलंय तर कोणी ट्रीपला. म्हणून गर्दी सुद्धा कमी आहे. दिवाळीचे चार दिवस खूप काम असतं त्यामुळे आम्ही त्यांना सुट्टी घेऊ देतो." बोलत बोलत काकांनी बिल केलं. बराच डिस्काउंट दिला होता.
"चला, थँकयू. निघतो ग." मानस गौरीकडे वळून म्हणाला. ती नजरेनेच बाय म्हणाली.
"चला, थँकयू. निघतो ग." मानस गौरीकडे वळून म्हणाला. ती नजरेनेच बाय म्हणाली.
"काय चाललंय तुझं?" दुकानाच्या बाहेर आल्यावर सुबोधने मानसची वाट अडवत विचारलं.
"कुठं काय?" मानस बेफिकीरपणाचा आव आणत म्हणाला.
"मी काही मूर्ख नाहीय. मला दिसतंय सगळं. थांब, आईलाच सांगतो. मग.."
"नको. आत्ता काही बोलू नको बाबा. आमचं फायनल झालं की सगळ्यात आधी तुला सांगतो. मग तर झालं? आत्ता तोंड बंद ठेव." मानसने गाडी काढली.
"अजून फायनल झालं नाही! काय ते गौरीचे हावभाव? तू कसा काय तिच्या प्रेमात पडलास? मला अजिबात आवडत नाही ती."
"नाट लावलास? म्हणून तुला काही सांगत नव्हतो मी. मला काय माहीत ती आज दुकानात असणार आहे ते? नाहीतर तुला घेऊन आलोच नसतो मी." मानस चिडला.
"मी कोणाला काही सांगत नाही. पण आईला कळालं तर सगळचं अवघड होऊन बसेल." सुबोध मुद्दाम म्हणाला. त्याला हसू आवरत नव्हतं.
-----------------------------
-----------------------------
"स्मिता, मानस किंवा सुबूला पाठवून दे. मी स्टेशनवर पोहोचतोच आहे." जयंत फोनवर बोलत होते.
"अहो, ते दोघं बाहेर गेलेत. यायला किती वेळ लागेल सांगता येत नाही. तुम्ही रिक्षा करून या." स्मिताने फोन ठेवला आणि विमल ताई चिडल्या.
"जयंत थोडा वेळ थांबला असता ना? मानस आल्यावर गेला असता आणायला. आताशी रिक्षाला कित्ती पैसे घेतात! परवडत नाही ते. निदान तू गाडी शिकली असतीस तर गेली असतीस ना."
"जयंत थोडा वेळ थांबला असता ना? मानस आल्यावर गेला असता आणायला. आताशी रिक्षाला कित्ती पैसे घेतात! परवडत नाही ते. निदान तू गाडी शिकली असतीस तर गेली असतीस ना."
"इतक्या रात्री मी चार किलोमीटर गाडीवरून जाऊ? तेही स्टेशनच्या रस्त्याला? आई, किती सुनसान रस्ता आहे तो आणि मानस दिवसभर काम करून कंटाळला असेल. आल्या आल्या त्याला पुन्हा पाठवायचं म्हणजे.."
"नवऱ्याची काळजीच नाहीय तुम्हाला म्हणून तो सतत घराबाहेर असतो." ताई.
"म्हणजे? आई, काय बोलता हे? नक्की काय म्हणायचं आहे तुम्हाला? सततच्या ट्रीपचा खर्च परवडतो. पण रिक्षाचा खर्च परवडत नाही? हे कुठलं नवीन शास्त्र? आणि सगळं खापर माझ्यावर फुटायलाच हवं का? संसाराला लागून पंचवीस वर्षे होऊन गेली. निदान आता तरी सुनेचा स्वभाव ओळखा." स्मिता रागाने बोलत होती. तिचा उरला सुरला संयम आज गळून पडला.
"तुमच्या वयाचा मान राखून आजवर मी गप्प राहिले. त्याला तुम्ही माझी कमजोरी समजलात. सून, बायको म्हणून आणि एक आई म्हणून मी कुठं कमी पडले ते तरी सांगा. माझ्याबद्दल इतका राग का तुमच्या मनात? सतत माझा रागराग केलात, पाहुण्यांसमोर माझा पाणउतारा करत आलात. मी काय वाईट केलं होतं तुमचं?" तिचे डोळे गच्च भरून आले.

विमल ताई काहीच बोलल्या नाहीत. ती नेहमीच सवय होती त्यांची. आग लावायची आणि मजा बघत राहायची. नुकत्याच आलेल्या मानस आणि सुबोधच्या कानावर आईचं म्हणणं पडलं. तसे ते दोघं बाहेर थांबले. "दादा, आईला मोकळं होऊ दे." सुबोध मानसला अडवत म्हणाला.
"जयंत समोर चांगलं वागायचं नाटक करत राहिलात. मुलांना आई कशी वाईट आहे, हे सांगत राहिलात. तरी बरं, मुलांनी तुमच्यावर विश्वास ठेवला नाही. नाहीतर मी एकटी पडले असते.
लग्नानंतर मला माहेरी जायला बंदी घातलीत. माझ्या माहेरची एकही व्यक्ती कारणाशिवाय आजवर इथं आलेली नाही.
इतकंच काय तर साडीची सक्ती. नवऱ्यासोबत फिरायला, नोकरी करायला बंदी. तुमच्यासाठी मी माझ्या सगळ्या आवडीनिवडी बाजूला ठेवल्या. माझे छंद विसरले. शिवणकाम, कविता करण्याची इच्छा, आवड मी मारून टाकली. तोंड दाबून बुक्क्यांचा मार सहन केला." स्मिता रडत होती. तरीही ताई गप्प होत्या. ती काय बोलते याला किंमतही देत नव्हत्या. आता मात्र मानस आणि सुबोध आत आले.

"आई, शांत हो." मानस पाणी घेऊन आला.
"कशी शांत होऊ? इतक्या वर्षांत कधी मोकळी झालेच नाही. आता होतेय तर अडवू नका. जाऊ दे. तुम्ही जेवण करून घ्या. आधीच उशीर झालाय. भूक लागली असेल तुम्हाला." स्मिता डोळे पुसत आत निघून गेली.
मुलांनी तीन पानं वाढली. "आजी जेवली?" स्मिताने नुसती मान हलवली.
"तू जेवली नसशील. जेवून घे. बरं वाटेल." सुबोध आईला म्हणाला. जेवताना कोणी काही बोलत नव्हतं. शांतपणे जेवणं झाली आणि जयंत आले.
क्रमशः
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा