Login

हरवलेली बाजू

Two Different Side Of Situations
हरवलेली बाजू
जलद कथा लेखन स्पर्धा फेब्रुवारी २०२६

भाग १

सकाळ सकाळ रस्त्यावर आवाज सुरु झाला आहे. इकडून तिकडे गाड्या धावत होती.माणसे ए जा करत होती. वारा वाहत होता, सूर्यदेव सकाळीच उठले होते आणि सगळ्यांना जाग करून निवांतपणे मजा बघत होते .त्यांचे रोजच काम,आपण म्हणतो सूर्योदय झाला आपण म्हणतो, सूर्य अस्त झाला पण तो अस्त होतच नसतो तो फक्त कधी एका बाजूला प्रकाश देतो तर कधी दुसऱ्या जगाला.. असो.. त्याने त्याचं काम केलं. सुंदर रवी किरणे सगळीकडे पसरलेली होती. माणसांची जा ये वाढली होती . दिवसवर चढत होता आणि दिवस जसा जसा वर चढतो तसं तसं शहर धावू लागतं तसेच काहीसं चालू होतं. एका बाजूने इतकी इतकी इतकी धावपळ ,इतका गोंगाट, इतके सारे शब्द ,श्वास आणि तणाव तर दुसऱ्या बाजूने शांत अस, गहिर असं पाणी आणि त्याच्यावरती निळ आकाश दोन्हीही खूप खोल आणि अथांग.. समुद्राचा तळ गाठता येत नाही आणि आकाशाची उंची मोजता येत नाही, मी रोज हेच बघतो. एकीकडे धावपळ दुसरीकडे संथपणा, एकीकडे गोंगाट दुसरीकडे शांतता,एकीकडे उथळपणा तर दुसरीकडे खोल गहिरं पाणी, एकीकडे भरभर जगण्याची शर्यत दुसरीकडे थोडासा निवांत वेळ, विसावा खूप खोल कुठेतरी दडलेल्या काही कथा ,काही अनुभव आणि सूर्य मात्र तोच .. तसं हे रविकिरण सगळ्यांवरती सारखे पडतात ..आधी सुरवात, मग मध्यान मध्ये थोडासा विसावा आणि हळूहळू शांत समुद्रामध्ये अस्त म्हणजे आपल्याला अंधारात ठेवून दुसऱ्याचा जग प्रकाशमाय करतो..
तर माझं आपलं हे रोजच आहे. रोजच मी या गोष्टीतून जातो रोजच मी हे सगळं अनुभवतो पण मी…. मी म्हणजे कोण ?

मी म्हणजे बऱ्याच गोष्टींचा साक्षीदार, नकळतपणे सर्वांच्या सुखदुःखातून जाणारा त्यांच्यासोबत असणारा पण त्यांना न जाणवणारा असा त्यांचा साथीदार म्हणजे “ एक बाकडा (बेंच)”
ज्यावर लोक क्षणभर थांबतात, बसतात, बोलतात आणि विचार करतात,क्षणभर विसावतात तो…..
माझ्यासाठी नेहमीसारखाच दिवस आहे पण आजच्या दिवसात कदाचित काही लोकांना काही वेगळं वाटत असेल किंवा काही वेगळे अनुभवही येणार असतील काय सांगावं कोण कुठे कोणाला कसा भेटेल बघूया मी तर प्रतीक्षा करतोय ,आज नवीन काय अनुभवायला मिळेल याची .चला तर मग बघूया आजचा दिवस कसा जातो…
क्रमशः

बाचकहो, कथेची सुरुवात कशी वाटली नक्की कळवा .ह्या बाकड्याच्या आयुष्यात पुढे कोण येणार आहे आणि आपल्याला कोणती बाजू दाखवणार आहे हे नक्की वाचत रहा.


0

🎭 Series Post

View all