भाग २
जलद कथा लेखन स्पर्धा फेब्रुवारी २०२६
जलद कथा लेखन स्पर्धा फेब्रुवारी २०२६
झालं रोजची सकाळ सुरू झाली ,धावपळ झाली सुरू ….माझ्यासाठी ही सकाळ सुंदरच असते काय होतं ना मी अशा जागी आहे की जिथे ही धावपळ मला बघता येते .सकाळी सकाळी शाळा कॉलेजची पोरं पोरी इथे येऊन बसतात .त्यांचं स्वप्नमय आयुष्य असतं, रोजचे नवे नवे प्लॅन्स ,योजना असतात त्यांच्यामध्ये नवी ऊर्जा नवी उमेद असते जग जिंकण्याची धडपड असते आणि मग मी सुद्धा त्यांच्यासोबत अतिशय वेगवान गतीने नवी स्वप्न बांधतो आणि मग काय होतं ते उठून निघून जातात.. कोणाची बस येते, कोणाचा मित्र येतो ,कोणाची मैत्रीण येते .. मी हसतो आणि तिथेच असतो…मला मात्र हे सगळं ऐकून फार गंमत वाटते. नंतर थोडासा तणावाचा वेळ पण येतो..
“ अरे ,अरे थांब रे थांब मानवा…. खाली तर बघ कपडे खराब होतील …”आता हेच बघा ना हा माणूस येऊन बसला फोनवर बोलत बोलत हा म्हणजे कोण माहित आहे का?
नऊ ते अकराची वेळ ऑफिसला जाणाऱ्यांची घाई महिला, पुरुष फोनवर बोलता बोलता इथे बसतात ,दोन मिनिटे विसावतात आपला सगळा ताण तणाव, मॅनेजर वरचा राग, बॉस वरचा राग इथेच इथेच माझ्या डोक्यावर ठेवून जातात ..इतकं डोकं ठणकत ना माझं रोज सकाळ पासून, काय सांगू तुम्हाला.. पण त्यांना कुठे कळतं की आम्हालाही वेदना असतात ,आम्हालाही जखमा होतात मी बाकडा आहे म्हणून काय झालं पण मला कळतात हो या गोष्टी… मला कळतात तुमच्या सगळ्या गोष्टी तुमच्या सगळ्या भावना आता हाच माणूस फोनवर बोलत होता प्रोजेक्ट सबमिट करायचंय ,डेडलाईन संपली आहे आणि म्हणून आपल्या सहकार्याशी चिडून बोलण्यात काय अर्थ आहे.. बर त्यात नुकसान ते ह्याचाच आहे ना.. थोड्या वेळापूर्वी बसलेली जी कार्टी होती त्यांनी आपल्या ग्लास मधला तो सरबत सांडून ठेवलाय इथे..आता या ऑफिसला जाणाऱ्या व्यक्तीचे कपडे खराब नाही का झाले त्यात पुन्हा चिडचिड आणि ती बॅग माझ्यावरती आपटून गेला …असो.. चालायचं थकलो बाबा मी हा तणाव बघून…
थोडा वेळ असा शांततेत निघून जातो…
जेव्हा दुपार उलटून गेलेली असते
तिथे साधारण 45/ 50 वयाचा माणूस येऊन बसतो.. हताशपणे वाकड्यावरती हात ठेवतो आणि आरामात बसतो. शांत गंभीर अतिशय उदास भाव त्याच्या चेहऱ्यावर असतात,दुसऱ्या टोकाला दहा मिनिटानंतर एक साधारण पंचवीस ते तीस वर्ष वय असेल अशी मुलगी येऊन बसते. डोळ्यात अश्रू घेऊन …काय करावं काय नाही अशा गोंधळात असलेली ..
क्रमशः
कोण आहेत ही दोघे..?काय संबंध त्यांचा आणि ह्या जागेचा…पाहूया पुढच्या भागात..
पण तोपर्यंत तुम्ही प्रतिक्रिया द्यायला विसरू नका…
कोण आहेत ही दोघे..?काय संबंध त्यांचा आणि ह्या जागेचा…पाहूया पुढच्या भागात..
पण तोपर्यंत तुम्ही प्रतिक्रिया द्यायला विसरू नका…
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा