Login

हरवलेली बाजू भाग३

Every Coin Has Two Faces
जलद कथा लेखन स्पर्धा फेब्रुवारी २०२६

थोडावेळ शांततेत गेला आणि तो वयस्क माणूस म्हणाला

‘काय झालं? काही अघटीत घडलंय का ? माणूस
ती काहीच बोलत नाही. शांत बसून असते पण डोळ्यातून अश्रू ओघळतात. पुन्हा थोडा वेळ शांततेत जातो, त्या माणसाला राहवत नाही, तो पुन्हा विचारतो, ‘ इतकं रडण्यासारखं काय झालं ?इतकं सुंदर आयुष्य रडण्यात वाया नको घालूस” तो कुठेतरी शून्यात बघत हे सगळं तिला म्हणत असतो.. त्या तरुणीने अजून पर्यंत त्याच्याकडे पाहिलेले नसतं, थोड्याशा रागामध्ये आणि वैतागून ती उत्तर देते, “ तुम्हाला काय माहित माझं दुःख? उगीच नाही रडतं…इतकी मेहनत घेऊन जेव्हा फक्त अपयश येत तेव्हा काहीच सुचत नाही…कोणाचा आपल्यावर विश्वास नाही, कोणासाठी आपण महत्वाचे नाही हा विचारच आयुष्य जगण्याची उमेद घेऊन जातो…माझ्या इतकं दुःख कोणी सोसलं नसेल, सगळ्यांना त्रास देते मी आणि माझ्या आयुष्यही असंच आहे ..खूप काही करायचंआहे पण नेहमी अपयशआणि अर्धेकाम…”ती अचानक पणे खूप मोठ्याने रडू लागते. तिला हुंदका आवरत नाही आणि डोळ्यातून घळघळ पाणी यायला लागतं .आपल्या हातांमध्ये आपला चेहरा लपवते.
ती व्यक्ती तिच्याकडे बघते आणि तिला म्हणते, “ आपल्याला आपलेच दुःख जास्त वाटत असतं. माझ्याकडे आज कोणीही नाही. एक बायको होती ती सुद्धा गेली. माझ्यासोबत माझी मुलगी नाही .एकटा हा रिकामा वेळ जात नाही ,बोलायला कोणी नाही एकटेपणा आहे माझ्या आयुष्यात पण तुझं आयुष्य तसं दिसत नाही. अजून खूप जगायचे तुला ते तू असं रडत रडत जगणार आहेस का?”
ती मुलगी आपल्या चेहरा वर करते आणि त्या व्यक्तीकडे बघते तिला काय वाटतं काय माहित पण ती बोलते, “ माझ्याकडे सगळं आहे .घर, माणसं, नोकरी पण मी अपयशी आहे .मला यश मिळत नाही. माझ्यामध्ये कमतरता आहेत .”
“कोण म्हणतं असं तुला..” तो व्यक्ती..
“ माझ्या आजूबाजूचे सहकारी ,माझा बॉस, माझा होणारा नवरा सगळेच म्हणतात. गेल्या सहा महिन्यापासून एका प्रोजेक्ट वरती काम करते आणि आज तो माझ्या हातातून प्रोजेक्ट गेला सुद्धा ..शिक्षण घेऊन जेव्हा नोकरी शोधण्यासाठी बाहेर पडली तेव्हा सुद्धा असंच झालं जिथे मला नोकरी करायची होती तिथे मुलाखतीमध्ये फेल झाले घरामध्ये आई-बाबांच्या अपेक्षा पूर्ण करू शकत नाही. माझ्या इतकी कम नशिबी कोणीच नसेल ..
ते गृहस्थ हलकच हसतात ..पुन्हा शून्यात नजर लावून म्हणतो “कमनशिबी …एकदा नक्की विचार कर.. कम नशिबी ची व्याख्या काय आहे हे एकदाच पडताळून बघ..
तुझ्याकडे शिक्षण आहे एक संधी गेली तर दुसरी येऊ शकते.. तुझ्याकडे तुझी माणसं आहेत जी तुला जीव लावतात..तू अपयशी आहेस असं तुज्या आईवडील नि नाही सांगितलं तुला..तुला हे त्यां लोकानी सांगितलं जे तुला ओळखत नाही,जे तुज्या आयुष्यात आज आहे उद्या नाही.. मनातला गोंधळ जेव्हा संपवशील तेव्हाच प्रगती करशील..
ती मुलगी विचार करू लागते. तिचं रडणं सध्या थांबलेलं असतं..
तू गृहस्थ जे काही म्हणत होता त्यामध्ये अर्थ होता खरच आपण नेहमी एकच बाजू बघतो आपल्या आजूबाजूच्या लोकांचा आपल्यावरती खूप प्रभाव पडतो पण सत्य परिस्थिती तशी नसते.
क्रमशः


0

🎭 Series Post

View all