Login

हरवलेली बाजू भाग४

Everyone's Shoes Is Different They Need To Face Battle..
भाग ४
जलद कथा लेखन स्पर्धा फेब्रुवारी २०२६

तो माणूस पुन्हा बोलू लागतो, “मी दुःखी आहे कारण मी एकटा आहे .माझ्याकडे कोणीच नाही माणसं ,पोरं ,बाळ पैसा काहीच नाही. तू दुःखी आहेस कारण तुला यश मिळत नाही चार लोक तुला काहीतरी म्हणाली आणि तुझा आत्मविश्वास डगमगला या चार लोकांवरती आपलं जग चालत नसतं ते चालत असतं आपल्या लोकांच्यामुळे आपल्या प्रेमामुळे आणि आपल्या आत्मविश्वासामुळे.. तू समोर बघितला तर तिथे तुला धावपळ दिसते आहे, ह्या गर्दीत तू हरवली आहेस आणि याच तुला दुःख आहे . तुज्या दुःखाचं कारण खूप ताण तणाव ,रोजची गडबड नात्यांना वेळ देऊ शकत नाही अस आहे, कारण तू त्या दिशेने बघतेस आणि मी जिकडे बघतोय तिकडे अथांग समुद्र आहे, खोल काहीतरी दडलय पण वरून खूप शांत आहे . हा समुद्र सुंदर आहे पण तो एकटाच आहे आता सांग दुःख कोणाचा मोठा आहे ?

तुम्ही सांगा कोणाचं दुःख मोठ आहे?

दोघेही स्तब्ध होतात आणि उठून आपापल्या मार्गाला निघून जातात.. मी मात्र तसाच तिथेच प्रश्नात पडलेला तुम्हीच सांगा कोणाचे दुःख मोठे होतं ?आपण जेव्हा एक बाजू बघतो तेव्हा दुसरी बाजू आपल्याला कळतच नाही त्या मुलीला तणाव सहन होत नव्हता, व्यस्त जीवन होतं, धावपळ होती आणि ती शांतता शोधत होती. तिला वाटायचं की ज्या व्यक्तींमध्ये शांतता आहे ज्यांना काही काम करायची गरज नाही ती किती सुखी आहेत आणि हिला इतकं काम करून सुद्धा अपयश मिळतं त्यामुळे किती दुःखी आहे पण तिला हे कळलं नाही की त्यातून सावरण्यासाठी तिच्या घरी तिची माणसं आहेत ,काहीही झालं तरी ती पुन्हा उभी राहू शकते या दुसऱ्या बाजूचा तिने कधी विचार केला नाही आणि तिथेच तो माणूस ज्याच्या आयुष्यामध्ये रिकामपण आहे आपल्या लोकांसाठी तरसणारा, प्रेमाचा भुकेला…शांत दिसणाऱ्या समुद्रासारखा…एकटा..
ह्या दोन भिन्न बाजू…दोन वेगळे दृष्टिकोन…
मला मात्र दोन्ही बाजू दिसतायेत आणि मी पुन्हा एकदा ह्याच विचारांमध्ये डोळे लावून बसलोय की त्यांना त्यांची हरवलेली दुसरी बाजू कदाचित इथेच सापडली असेल..
उद्या पुन्हा सूर्योदय होणार.. पुन्हा नवीन लोक येणार नवीन अनुभव सांगणार.. एकच बाजू बघणार आणि काही लोक दुसरी बाजू बघून आनंद साजरा करणार.. काय वाटतं तुम्हाला मला नक्की सांगा तुमचा अनुभव आणि या कथेला प्रतिक्रिया नक्की नक्की कळवा..
ही कथा कशी वाटली ते नक्की कळवा…तुमच्या प्रतिक्रिया आणि लाईक मुळेच आम्हला लिहण्यासाठी उत्साह येतो….
तुमच्या आयुष्यात असा कधी प्रसंग आला होता का ?तुम्ही त्याला कसे सामोरे गेले नक्की कळवा कदाचित त्यातून कोणाला तरी प्रेरणा मिळेल..