हरवलेल्या वाटा
चॅम्पियन ट्रॉफी 2025
लघुकथा फेरी
-------------------_---
चॅम्पियन ट्रॉफी 2025
लघुकथा फेरी
-------------------_---
नील हा एकवीस वर्षाचा इतिहासाचा विद्यार्थी.वय जरी तरुण होतं पण नीलच्या नजरेत मात्र जुन्या काळाची धुंदी होती.त्याला नेहमी वाटायचं की दगड, भिंती,झाडं ही फक्त निर्जीव वस्तू नाहीत.तर त्यांनी काळ अनुभवला आहे.त्यांच्याच स्मृती दडलेल्या आहेत हीच स्मृती लोकांसमोर आणायची.विस्मृतीत गेलेल्या ठिकाणांना पुन्हा जिवंत करायचं हा त्याचा हट्ट होता.
याच हट्टापायी त्याने एक यूट्यूब चॅनल सुरू केलं होतं. नीलचं यूट्यूब चॅनल होतं 'हरवलेल्या वाटा'. जसं त्याच्या चैनल नाव होतं तशीच त्याची धडपड देखील.जुन्या किल्ल्यांच्या भग्न भिंती, वाड्यांच्या खिडक्या, शिळांच्या रेषा,मंदिरांच्या शिल्पकथा या सगळ्याला नेल च्या व्हिडिओमध्ये एक वेगळंच आयुष्य मिळायचं.त्याचे हजारो सबस्क्रायबर्स होते.विव्हर साठी ते फक्त व्हिडिओ होते पण नील साठी ते व्हिडिओ म्हणजे इतिहासाच्या पुनर्जन्माचं माध्यम.
एकदा असंच जुन्या वाचनालयात नील पुस्तक चाळत बसला होता.भिंतींचा ओलसरपणा, शेल्फ वरील धूळ, खिडक्यांमधून येणारा मंद वारा आणि पुस्तकांच्या रांगा जणू मूक साक्षीदार होत्या.नील हातातली पुस्तक चालत होता त्याचवेळी त्याला एक पिवळसर चुरगळलेलं ग्रंथ दिसलं.पान स्पर्शली की धुळीचा वास दरवळायचा. ते ग्रंथ जेव्हा तो चाळू लागला तेव्हा त्याच्या बोटाखाली त्या पानात एक नकाशा त्याच्या हाती लागला.नकाशात एका गावाचं नाव होतं 'कातळवाडी'.
नील ने लगेच फोन काढून गुगल मॅप वर सर्च केलं तर तिथे कातळवाडी या नावाचं एकही ठिकाण त्याला मिळालं नाही. अजून थोडे सर्च केलं त्याने तरीदेखील त्याला एखादा चिन्ह एखादं निशान किंवा ऐतिहासिक वारसा असं काहीच त्याला मिळालं नाही जणू त्या गावाचा अस्तित्वच नव्हतं.
पुस्तक बंद करून निर्णय आपला कॅमेरा ऑन केला आणि व्हिडिओ रेकॉर्ड केलं यूट्यूब वर "मित्रांनो,हरवलेल्या वाटावर लवकरच मी तुम्हाला एका अशा गावात घेऊन जाणार आहे जे कोणत्याही नकाशावर नाही पण ते आहे तयारीत रहा"

त्याचवेळी वाचनालयात एक वृद्ध आजी होत्या ज्या त्याच्याकडे आल्या.त्यांच्या डोळ्यात काळाच्या सुरकुत्या होत्या त्या हलक्या आवाजात म्हणाल्या, "बाळा कातळवाडी अजूनही आहे पण तिथली वेळ थांबलेली आहे एकदा आत गेलास परतणं तुझ्या हातात राहणार नाही"
नील च्या अंगावर शहारे आले. पण त्याच्या डोळ्यात वेगळाच हट्ट होता तो स्वतःशी पुटपुटला "मग तर पाहिलंच पाहिजे"
दुसऱ्याच दिवशी नील सकाळी निघाला.खांद्यावर बॅग,कॅमेरा,ड्रोन आणि त्या जुन्या पुस्तकातील नकाशा.डोंगर उतार,दऱ्या,झाडांच्या रांगा ओलांडत तो चालत होता.कुठेही माणसांचा आवाज नव्हता.
संध्याकाळ होत आली दिवस मावळतीला आला होता तेव्हा अचानक त्याला एक गाव दिसलं.झाडांच्या फटीतून प्रकट झालेलं दृश्य श्वास रोखून ठेवणारा होता.
गाव जिवंत होतं,घर होती,चुली पेटल्या होत्या,माणसे देखील होती. एक गोष्ट त्याच्या निदर्शनास आली जी तिथे नव्हती ते म्हणजे आधुनिक जग.सर्वांचे कपडे,हालचाल सगळेजणू शंभर वर्ष मागचं होतं.नील न जसा गावात प्रवेश केला लोकांनी त्याच्याकडे पाहिलं त्यांची नजर गंभीर रिकामी पण थंड. त्यांच्या नजरेत उत्सुकता नव्हती.
नील ने कॅमेरा ऑन केला लाइव्ह सुरू केलं. पण स्क्रीनवर फक्त गावाची धुसर छाया दिसत होती.जणू सिग्नल दुसऱ्याच जगातून येत होता.पाहता पाहता रात्र झाली. नील ने तेथेच मुक्काम करण्याचे ठरवले.रात्री नील ला एका घरात थांबायला जागा दिली गेली.पण त्याला झोप येत नव्हती.अंधाराच्या काळोखात ढोल ताशांचा आवाज ऐकू येऊ लागला. तू खिडकी जवळ गेला तर काय पाहतो गावकरी एखाद्या प्राचीन विधीमध्ये सामील झालेले होते.मशाली पेटलेल्या मंत्रोच्चार सुरू होते.
मग अचानक सावल्या हलायला लागल्या.माणसांच्या नव्हे,तर जमिनीवरच्या,भिंतींवरच्या.त्या सावल्या स्वतंत्रपणे जिवंत होऊन नीलच्या खोलीत शिरल्या.त्यांच्या कुजबुजणाऱ्या आवाजात एक वाक्य वारंवार घुमत होतं "जो येथे आला तो परतला नाही"
नील घाबरून दरवाजे उघडू लागला.सगळे बंद होते.शेवटी एका दाराने चर्रकन् आवाज केला. तो धावत बाहेर पडला.जंगल काटेरी झाडं, दगडं हे सर्व तो पार करत होता पण सावल्या त्याच्या मागे होत्या. तो कसाबसा बाहेर आला.गाडी जवळ गेला पण ती गाडी झुरळलेली,धुळीने माखलेली.जणू वर्षानुवर्ष तिथेच उभे होती.
नील कसाबसा करून शहरात पोहोचला.पण सगळं बदललेलं होतं.मोबाईल, बिलबोर्ड, आणि लोक देखील.त्याला समजलं काहीतरी चुकतंय.

'सई ' नीलची जिवलग मैत्रीण मैत्रिणी पेक्षाही त्याची प्रेमिकाच !ती दररोज वाचनालयात यायची.वाचनालय तसं फार जुनं झालं होतं.आता कोणी जास्त तेथे येत देखील नव्हतं.सय मात्र न चुकता दररोज येत होती.यामुळे वाचनालयाचे थोडीफार जबाबदारी देखील तिला देण्यात आली होती.याच कारणामुळे तिच्याकडे वाचनालयाची एक चावी देखील होती. सई दररोज वाचनालयात यायची धुळेने झाकलेल्या खुर्चीत बसून ती वाट पाहायची.कोणालाही सांगितलं नाही पण तिच्या हृदयात नील च नाव होतं. आज तरी एखादा व्हिडिओ चॅनलवर अपलोड होईल या आशेत ती दररोज हरवलेल्या वाटा तपासायची.पण स्क्रीन रिकामीच राहायची.
लोक म्हणायचे"तो परतणार नाही" पण सईच्या डोळ्यात मात्र अजूनही विश्वास जिवंत होता.याच विश्वासात पंधरा वर्ष उलटली आणि मग एका रात्री 'हरवलेल्या वाटा' या चैनल वर एक नवा व्हिडिओ अपलोड झाला. फ्रेम धुसर, श्वास घाई घाईचा त्यातून नीलचा कापरा आवाज ऐकू आला. "मी परत आलोय पण सावल्या माझ्या मागे आहेत वाचनालयात ये"
सईच्या हृदयाचा ठोका चुकला. ती पळत वाचनालयाकडे निघाली.रात्रीचा काळोख रस्त्यांवर शांतता आणि त्यातून वाट काढत वाचनालयाकडे जाणारी सई.
नील कसाबसा करत वाचनालयाजवळ पोहोचला होता.त्या वाचनालयाला अजून एक गुप्त दरवाजा होता तो आज देखील तसाच होता. नीलला तो दरवाजा माहीत असल्याने त्या दरवाजातून नील आत गेला.धुळीचा वास जुन्या पुस्तकांचा सुगंध आणि अंधार. तो तिथेच बसला पण सावल्या त्याचा पाठलाग करत वाचनालयापर्यंत आल्या.पहाट होणारच होती. सईदेखील वाचनालय उघडून दरवाजातून आत आली.पुस्तकांच्या रांगांमधून चालत ती शोधत होती " नील !" तिचा आवाज हलका तुटलेला होता.
अचानक तिला नील दिसतो.पण काहीसा वेगळा. सूर्यकिरणांनी वाचनालय उजळलं होतं.त्या भयान सावल्या वितळल्या होत्या.आणि नील सईच्या समोर उभा होता.दोघांनी एकमेकांकडे पाहिलं.पंधरा वर्षाचा विरह,ओलसर डोळे, थरथरते हात ,कापणारा थोडासा घाबरलेला नीलचा आवाज "सई मी परत आलोय" पण जणू वेळ आणि अंधाराने त्यांचा जीव घेतला होता. दोघांनी एकमेकांचा हात हातात घेतला. बाहेर सूर्याचा प्रकाश वाढत होता मात्र त्यांची छाया हळूहळू नाहीशी होऊ लागली.दोघांच्या श्वासांची धडपड थांबली.
बाहेर सूर्य उगवला दिवस उजाडला आणि वाचनालयात नील आणि सईचा प्रवास थांबला.
'हरवलेल्या वाटा' या नावासारखंच त्यांची कहाणी देखील कायमची हरवून गेली.

समाप्त
©® लेखिका : अहाना
©® लेखिका : अहाना
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा