कौटुंबिक कथा लेखन
हरवून रात्र गेली....
''अगं वीणा, किती वाजलेत म्हणते मी ?''
ज्यांचा एक वर्षापूर्वीच सहस्र चंद्र दर्शन सोहळा संपन्न झाला
पण अजून मानेने ताठ असलेल्या कमला आज्जी सुनेला ठसक्यात विचारत होत्या.
वीणासाठी ते नवीन नव्हतंच मुळी.
आवाजावरून, वागण्यातून नारळासारखं टणक दिसणारं हे व्यक्तिमत्त्व आतून शहाळ्यासारखं गोड होतं.वीणाने गेल्या चाळीस वर्षाच्या अनुभवाने त्यांना पुरतं जाणलं होतं.
'त' वरून तपेलं अन् 'ब' वरून बुडालं.
खरे तर त्यांच्या बोलण्याच्या रोखावरुनच वीणाने ओळखले होते इशारा कुणीकडे आहे ते.पण वीणानेही वेड पांघरून पेडगावला गेल्याचे नाटक केले.न कळल्यासारखे दाखवत सहज सांगितले,''आई सात वाजलेत.तुमचा चहा टाकु का ?
आज या थकव्याने डोळा लागून गेला.लक्षच नाही घड्याळाकडे.
फक्त पाच मिनिट हं. एवढं पाणी गाळणं झालं की ठेवते चहा.झालंच आहे."
त्यांच्या हो ,नाहीची वाट न पहाताच ती बोलत राहिली.पण बोलता बोलता सासुचा चेहरा वाचत राहिली.
त्यांच्या चेहर्यावर नाराजी स्पष्ट झळकत होती.
वीणाने स्वतःच्या मनालाच समजावले ,'' वीणा, ही तर सुरवात आहे.'ये तो केवल झाकी है पिक्चर अभी बाकी है'
आपल्याला दोन टोकं सांधायची आहेत.एक उत्तर ध्रुव तर एक दक्षिण ध्रुव.
चहा मांडता मांडता तिचं विचारचक्र चालु होतं.ही माझीच कथा नाही तर माझ्यासारख्याच साठीच्या उंबरठ्यावर असलेल्या या वयोगटातील सगळ्याच स्त्रियांची ही कथा आहे व्यथा आहे. शेजारच्या निलावहिनी नाही का सांगत होत्या,"वीणा अगं तारेवरची कसरत करावी लागते बाई.आपण निभावलं गं आजची पिढी ?कठीण आहे सगळंच. सासुबाई सोवळं सोडायला तयार नाहीत...आणि ही आजची पिढी त्यांना तर हे सगळंच थोतांड वाटतं ती अॅडजेक्स करायला तयार नाहीत आपलंच मरण होतं बाई.

कारण या दहा वर्षांत केवढं परिवर्तन झालं. शिक्षणाचं वाढतं महत्व,जीवनात करीअरचं महत्त्व, त्यातून मुलामुलींच्या विचारात आलेले बदल सगळंच अनाकलनीय.विभक्त कुटुंब,नात्यांचा विसर. माझ्यासारख्या स्त्रीयांना या पिढीशी जुळवून घ्यावेच लागते आहे कारण जरी अंतर एक पिढीचे असले तरी विचारांची तफावत चार पिढ्यांची आहे.
तिचं विचारचक्र वेगात फिरत होतं.ती चाळीस वर्ष मागे गेली.
माझं लग्न झालं त्यावेळी जुन्या,कर्मठ विचारांचे सासुसासरे,आजे सासु, चुलत सासुसासरे ,मोठ्या दोन जावा असा खटला घरात.वास्तविक मी शिकलेली एम् .ए .इंग्लिश झालेलं.हातात नोकरीची ऑर्डर .आज प्रिंसिपल म्हणून रिटायर्ड झाली असती.पण या कर्मठ लोकांना कुठे ते मान्य व्हायला ? ना माहेरी ना सासरी.आपल्या घरी काय कमी आहे ?कशाला करायची नोकरी ?उगा भिकेचे डोहाळे म्हणत सगळ्यांनीच विरोध केलेला.आणि माझ्यात तरी कुठे तो विरोध डावलून नोकरी करण्याची धमक होती.
नाही म्हणतात तर ठीक आहे.कधी आपणही करीअर करावं,आपणही कमवावं,आपल्याही जवळ आपली काही शिल्लक असावी असं कधी मनात आलं नाही असं नाही पण...
रांधा वाढा ,उष्टी काढा स्विकारलं मी ते जीवन.कारण बालपणापासूनचे संस्कार माहेरीही खटल्याचेच घर .कामाचा धबडगा. सवय होतीच कामाची आणि त्यावेळी मुली इतक्या सहजासहजी नोकरीसाठी घराबाहेर पडतही नव्हत्या.मलाही तेच जीवन अंगवळणी पडलं .गरजाही फार नव्हत्याच.आजच्यासारखा तेव्हा शानशौकीवर खर्च नव्हताच. आवश्यक गरजा पुर्ण व्हायच्याच.त्यामुळेच आपल्याला नोकरी करायला मिळाली नाही ह्याचे शल्य कधी बोचलेही पण परत मनाची समजावणी.समाधानी जीवन होते म्हणून असेल कदाचित.
पण एवढी सुशिक्षित असूनही मी या सर्व जेष्ठ लोकांशी त्याच्या विचारांशी जुळवून घेतले.
त्रास गेला नाही असे नाही पण नंतर नंतर मी सहज बदलले .त्या लोकांशी जुळवून घेणे शिकले.कधी वादविवाद होतही,अबोलापण होई पण परत आपलीच समजूत घालायची कुत्र्याचं शेपूट नळकांड्यात घातले तरी वाकडे ते वाकडेच.आता या वयात काय त्यांचे विचार बदलणार ?बदल आपल्याला आपल्यातच करावा लागणार म्हणत,
'अंतर ' सांधायचे.
एवढं सगळं आठवण्याचं कारण म्हणजे परवाच मोठ्या मुलाचे नयनचे लग्न झाले.काल त्यांची सुहागरात.आजकाल सुहागरात म्हणजे एक कार्यक्रम झालाय.
आमच्यावेळी पोरासोरांना माहितही पडत नव्हते.
लग्नानंतर सगळी पाव्हणेमंडळी गेली की चार दिवसांनी सासुबाई म्हणाल्या,' गच्चीवरच्या खोलीत पलंग,अंथरुण पांघरूण नेऊन ठेवलंय संध्याकाळीच रघुच्या हातून. सगळ्यांची निजानिज झाल्यावर वर जाऊन झोपा.आणि हो सगळे उठायच्या आत उठून खाली या.'
मी हळूच दबकतच विचारले,' म्हणजे किती वाजता...'
सासुबाईंनी ताडकन सांगितले,'
तुझी आज्जेसासु पाचला उठते.त्याआधी उठून तयार होऊन यायचं.'
मी रात्री साडेअकरा बाराच्या सुमारास वर गेले.तिथे पलंग, पलंगावर मखमली चादर अंथरलेली बाजुला टी पाॅयवर मसाले दुधाचे दोन ग्लास .
मी जाऊन बसले.त्यानंतर जवळपास अर्धा एक तासांनी 'अहों'ची एन्ट्री झाली.म्हणजे घड्याळाचा काटा रात्रीचा एक वाजून गेलेला दाखवत होता.
सकाळी पाचच्या आधी तयार होऊन खाली जायचे म्हणजे चारलाच...
खरे सांगु कसली सुहागरात टेंशनमधेच...
केव्हा तरी पहाटे उलटून रात्र गेली...
पण आता ...

क्रमशः
(बाकी पुढील भागात भाग -2मधे वाचा)
©®शरयू महाजन
(बाकी पुढील भागात भाग -2मधे वाचा)
©®शरयू महाजन
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा