हरवून रात्र गेली....भाग-२अंतीम
काल दिवसभर आमची मनू, नयनचे चार सहा मित्र मिळून 'बेडरूम' सजवणे चालु होते.त्यातल्या दोन मित्रांचे अजून लग्नही झाले नव्हते.
महागडे फुलांचे डेकोरेशन ऑर्डर केलेले होते. ऑर्डरचा केक आला होता.अजून काय काय मागवले होते तेच जाणोत. दर दहा मिनिटाला एक पार्सलवाला पार्सल घेऊन येत होता.
घरात नाही म्हटलं तरी जवळच्या नात्यातली चार दोन पावणेमंडळी होतीच.
दिवसभर हसणे ,खिदळणे,चिडवणे करत त्यांचे काम चालु होते.लहान लहान पोरं टोरंही मधातच जाऊन बघत होती. तिथे काय काय स्टिकर्स चिकटवले ते मोठमोठ्याने वाचत होती.कुणी हाकललं की एकच गलका करत धावत खाली येत होती.
त्यात आमच्या मनुचं कार्टून खूपच हुशार .ते माझ्याकडे आलं अन् माझ्या कानात सांगते, ' आज्जी,आज्जी आज मामाची 'फर्स्ट नाईट' आहे.वर चलना बघ बेड फुलांनी कसा सजवला.
मी त्याला म्हटले ,'तुला कसे माहीत फर्स्ट नाईट वगैरे ?'
तर बोबडकांदा म्हणतो कसा त्या....सिरियलमधे नाही का दाखवले...तो....आणि ती....चे लग्न होते मग सुहागरात.
मी तर कपाळावरच हात मारून घेतला.
आताच्याच पिढीचे नवीन थेर आपण बघतोय ही त्यापुढची पिढी...ती तर त्याच्याही चार पावलं पुढे आहेत.

सगळ्या घराला गाजावाजा.त्यात त्यांना काहीच गैर वाटत नाही.
ती दोघं रुममधे गेली तर ताटावर वाटीने वाजवणे काय,
कहर तर त्यापुढेच बेडवर खाली फुगे ठेवलेत त्यांना माहित होणार नाहीत असे.ते बेडवर आडवे होताच धडधड फुटलेत.
मलाही थोडं ऑकवर्डच झालं.पण आजची पिढी काय ऐकते.
घरात सगळ्यांनाच वर्दी पोहोचली.
म्हणजे जे काम चुपचाप करायचे त्याचा इव्हेंट झाला.
किती रात्रीपर्यंत त्यांना या पोरांनी सळो की पळो करून सोडले. शेवटी मला हस्तक्षेप करावाच लागला .अरे पुरे आता .या खाली .म्हणत जबरदस्ती सगळ्यांना खाली बोलावले.
आता आपला काळ गेला .तिला कसे सांगू सकाळी लवकर उठून येशील म्हणून. मग काहीच बोलले नाही.

आता सासुबाईंचे सुरु किती वाजले गं विणा...
म्हणजे मीच मधे भरडल्या जाणार.
मी नेहाला म्हणू शकत नव्हते लवकर उठून ये अन् सासुबाईंनाही उत्तर देवू शकत नव्हते.
पण परिस्थिती तर निवळावी लागणार होती.
मी चहा घेऊन सासुबाईंकडे गेली,त्यांच्याजवळच बसली.थोडं इकडचं तिकडचं बोलायचा प्रयत्न केला तर त्या मला म्हणाल्या,'विणा तू विषय बदलवू नको.तुलाही कळतय. पण तुला आता सावध व्हावं लागेल.
तू थोडी कडक हो.तू जर अशीच लेचीपेची राहिलीस तर उद्या हे पोरं मिरी वाटतील डोक्यावर. कधी ढील द्यायची कधी ताण द्यायचा हे पतंग उडविणारा कळायला हवे नाहीतर पतंग कटते. पुढे जाऊन काहीच ऐकणार नाहीत. मनमानी करतील ते.

मला समजतेय तुलाही वाटतेय किती उशीर झालाय अजून उठून आली नाही.चार पाव्हण्यांसमोर बरं दिसत नाही.पण तू बोलु शकत नाही.
तू माझं बघितलस. तुला रागावली तरी परत जवळ घेऊन समजूत घातली.तुला व्यवहार ज्ञान व्हावे म्हणून.
अगं हे वयच असं असतं.पोरकटपणा असतो.विवेक नसतो.मग बाजारुपणा येतो त्या प्रेमाला.मग त्यांना काळ,वेळ,स्थळ कशाचेच भान उरत नाही.मग त्यांना चार लोकांसमोरही एकमेकांच्या गळ्यात हात टाकायला काहीच गैर वाटत नाही.
विणा - आई अहो काळाचा महिमा.जाऊ देत त्यांचे दिवस आहेत मारु देत मजा.
पण मनात मात्र ती म्हणत होती,मी आजवर भिऊनच वागले.कोणतीच मौजमजा करता आली नाही.आता त्या पोरांना घेऊ देत सहजीवनाचा आनंद.
तिला एकदम आठवले.तरुणपण. आज तिच्या विणेच्या अबोल तारा झंकृत झाल्या होत्या.त्या वयात तारुण्यसुलभ भावना कधी उफाळून यायच्या.कधी तर नवराही नाराज व्हायचा तिच्यावर.अगं किती भिऊन भिऊन राहशील ?मलाही उपाशी ठेवशील का ?
कधी एखादी रात्र...फसवूनच जायची.
हरवून जायची मला.
कधी पहाट होई कळायचेच नाही.
हळूच रेशमी मिठी सैल व्हायची.
कधी मोठ्यांची नजर चुकवून संधी साधून घ्यायची.अहोंच्या हातून गजरा माळून घेण्यातले सुख...अजूनही सुगंध दरवळतो त्या मोगर्याचा.दुलईही सुगंधी होते.

पण त्या चोरट्या,झाकल्या श्रृंगारात वेगळीच नजाकत होती.आताचा तो उघडा श्रृंगार नजर खाली घालायला लावतो.
पण आम्हीही हरवलो होतो त्या रात्रीत,संपूच नये अशा वाटणार्या.
मी हळूच आईंना म्हटले,' अहो आई,आजवर नाही झाली हिंमत त्या विषयावर बोलायची.आतातर मामंजींना जाऊन पाच वर्ष उलटलीत.
पण मनात जिज्ञासा आहे तुमच्यावेळी कशी होती पहिली रात्र ?
या वयातही त्या लाजल्या.काय तरी बाई प्रश्न तुझा .
पण सांगुच का असा उथळपणा नव्हता.पण तेव्हासारखा श्रृंगार ही आज नाही.
आम्हीही मौजमस्ती केली पण मर्यादेत राहून. सगळी हौसमौज केली पण या कानाची खबर त्या कानाला न लागु देता.आम्हीही रात्री जागवल्या पण पहाटेचे भान ठेवून.
सगळं तेच आहे गं.भावना तेव्हाही होत्या आजही आहेत पण व्यक्त होण्याची पद्धत बदलली.
ती चुक की बरोबर आपण कोण ठरवणारे?ज्याचे त्याला कळायला हवे नाही का ?
समाप्त
©®शरयू महाजन
©®शरयू महाजन
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा