Login

हत्या एक तपास भाग १

कोण होता? कधी आला? कसा आला? आणि त्यांना केव्हा मारलं? याचा काही एक सुगावाही कोणालाही लागला नाही. जेव्हा सकाळी त्यांची मोलकरीण त्यांना उठवायला त्यांच्या खोलीत गेली. तेव्हा हा प्रकार तिच्या लक्षात आला.
हत्या एक तपास..

“आताची सर्वात मोठी बातमी.”

“राज्यातले चीर परीचीत नामाकिंत उद्योगपती कारखानीस यांची त्यांच्या राहत्या घरात हत्या.”

“त्यांच्याच घरात, त्यांच्याच बेडरूममध्ये त्यांची हत्या.”

“त्यांच्यावर जवळपास पाच गोळ्या झाडल्या गेल्या.”


“दोन त्यांच्या छातीवर, तर दोन पोटात आणि एक त्यांच्या कपाळाच्या बरोबर मध्यभागी.”

“घरात एवढी सुरक्षिततेची यंत्रणा असताना देखील त्यांचा प्राण वाचू शकलेला नाही.”

“पोलीस यंत्रणा नक्की काय करत होती?”

“त्यांचे सिक्युरिटी गार्ड कुठे होते?”

“कोण आहे तो? ज्याने इतक्या क्रूरपणे हा गुन्हा घडवून आणला?”

त्या दिवशीची सकाळची सुरुवातच ह्या अश्या अतिशय सनसनाटी बातम्यांनी झाली होती. अतिशय उच्च श्रेणीची सुरक्षितता असूनही त्या उद्योगपतीच्या राहत्या घरात बंदुकीने गोळ्या झाडून त्यांची हत्या झालेली होती. कोण होता? कधी आला? कसा आला? आणि त्यांना केव्हा मारलं? याचा काही एक सुगावाही कोणालाही लागला नाही. जेव्हा सकाळी त्यांची मोलकरीण त्यांना उठवायला त्यांच्या खोलीत गेली. तेव्हा तिच्या हा प्रकार लक्षात आला.


त्या दिवशी ते एकटेच घरी होते. त्यांची बायको आणि मुलं बाहेरगावी गेलेले होते. त्यामुळे कारखानीस यांनी आदल्या रात्री त्यांची पार्टी केली आणि उशीराच झोपायला गेले होते. आता उशिरा झोपले म्हणून त्यांना जागही उशिराच येणार होती. पण जवळपास सकाळचे अकरा वाजत आले होते. तरी ते उठले नाही म्हणून त्यांच्या कामवाल्या कांता ह्या जरा वैतागल्या होत्या.

“ह्या मोठ्या माणसांच ना, काही समजतच नाही.” कांता वैतागून बडबड करत होती. “बाईसाहेब नाही म्हणून एवढा वेळ झोपून रहायचं का? त्या घरात असल्या की बरोबर सगळच वेळेवर आटोपतात. आता त्या गावी गेल्या आहेत ना, तर हे आरामशीरच रहातील ना. मान्य आहे एवढा मोठा व्याप सांभाळता सांभाळता माणूस थकून जातो. पण आम्हालाही कामाला उशीर होतो ना. घर आवरा, चहा नाश्ता बघा. ते बघता बघता दुपार उलटून जाते. मग दूपारच्या जेवणाचा घोष सूरू होतो. आपण काय नोकर माणस. ते सांगतील ते ऐकाव लागेल.”

पण अजूनही ते उठले नाहीत म्हणून ती जरा विचारात पडली. पहिले बाईसाहेबांना फोन लावायचा की साहेबांना उठवायचं? हा प्रश्न तिला पडला. पण बाईसाहेब घरापासून लांब असल्याने त्यांना उगाच टेन्शन नको म्हणून कांता पहिले त्यांच्या साहेबांना उठवायला गेली.

तसे तर त्यांच्याकडे नोकर खूप होते. पण कांता ही त्यांच्या अगदीच विश्वासातली होती. म्हणून तिला घरतल्या बेडरूममध्येही जायची परवानगी होती. मग ती पटकन साहेबांच्या बेडरूमजवळ गेली. सुरवातीला तिने फक्त दार वाजवून पहिले. पण तरी त्यांचा काहीच प्रतिसाद आला नाही. मग त्यांनी साहेबांना आवाज दिला. तरी आतून कसलीच हालचाल ऐकू येत नव्हती. ते बघून आता कांता टेन्शनमध्ये आल्या. आता त्यांनी जोरजोरात दार वाजवायला सुरवात केली. तरीही आतून कुठल्याही प्रकारचा प्रतिसाद आला नव्हता.

तस कांताने लगेच तिच्या बाईसाहेबाना फोन लावून झालेली गोष्ट सांगितली आणि त्यांच्या बेडरूमची चावी घेण्याची परवानगी मागितली. तश्या तिकडे त्याही टेन्शनमध्येच आल्या. कारण आदल्यादिवशी कितीही दारू पिली तरी दुसऱ्या दिवशी ते सकाळी किमान आठ वाजेपर्यंत तरी उठत होते. पण आज काहीही आवाज येत नाही म्हटल्यावर त्यांनी कांताला त्यांच्या बेडरूमची चावी ठेवल्याची जागा सांगितली. ती जागा समजताच कांता पटकन त्या दिशेला धावली आणि त्यांच्या बेडरूमची चावी घेऊन आली. दार उघडताच त्यांचा तो मोठा बंगला कांताच्या किंचाळण्याने गुंजला गेला.


कांताचा आज ऐकून बाहेर असणारी सिक्युरिटीची माणस देखील पटकन धावत घरात आली. नंतर बेडरूमकडून आवाज आल्याचे समजतच ते लागलीच बेडरूमकडे धावली.

बेडरूममधला तो नजरा बघून त्या सगळ्यांनाच धक्का बसला. मिस्टर कारखानीस हे त्यांच्या बेडवर हात पसरून पडलेले होते. त्यांच्या शरीरासोबत त्यांच बेडही पूर्ण लाल झाल होत. त्यातल्या एकाने लगेच पोलीसांना फोन करून ह्या गोष्टीची माहीती दिली. तशी पोलीस यंत्रणाही खडबडून जागी झाली. पोलीसांची ती झालेली गडबड त्यांना लागलीच कारखानीस यांच्या घराकडे घेऊन गेली.

पोलीसांच्या सायरन वाजवत जाणाऱ्या गाड्या काहीतरी विपरीत घडल्याच रस्त्यावरच्या माणसांना सांगायला लागल्या. अशा वेळेस पत्रकार आणि न्यूज चॅनलवाले तर तयारच असतात. बघता बघता पूर्ण शहरात ती बातमी पसरली गेली आणि बातम्यांवर ती झळकू लागली.
तिकडे कांताही धक्क्यात असल्याने लगेच कोणाला फोन करावा? हे त्यांना सूचलच नाही.

मिस्टर कारखानीस यांच्या हत्येची खबर त्यांच्या बायकोला या धावणाऱ्या बातम्यांमधून मिळाली. तस त्यांनी लगेच घरी कांताला फोन लावायला सूरवात केली. पण कांता स्वतःच जाणिवेच्या पलीकडे जाऊन बसली होती. नाही तिला काही ऐकू येत होत आणि नाही काही समजून येत होत. सततच्या वाजणाऱ्या फोनने कांता जाणिवेत आली आणि तिच्या वाजणाऱ्या मोबाईलकडे बघू लागली.

मोबाईलवर तिच्या बाईसाहेबांचे नाव झळकत होते. आता त्यांना काय आणि कस सांगाव? हा प्रश्न तिला पडला. पण तो उचलावा तर लागणारच होता. शेवटी कसेतरी धैर्य एकवटून तिने तो फोन उचलला.

“अगं कांता,” बाईसाहेबांचा घाबरलेला आवाज कांताला ऐकू आला. “त.. ते .. त… ट.टिव्हीवर काय दाखवत आहेत?”

तस इकडे कांतांना त्यांचा हुंदका आवरता आला नाही. “ह… हो.. त.. ते.. म्हणजे… साहेब.. खरं…”

“कांता, बोल ना हे खोट आहे.” बाईसाहेब रडतच बोलू लागल्या.
तस कांताही रडू लागल्या. तर तिकडे बाईसाहेबांची खोटी आशाही धूळीला मिळाली. त्याही तिकडे रडू लागल्या.

पण त्यांच्या दोन्ही मूलांना, म्हणजे कल्पेश आणि काव्या यांना त्याच काहीही वाटल नव्हतं. उलट ही बातमी बघून त्यांनी सुटकेचा श्वास सोडला होता. त्यांच्या आईला ते बघून अजूनच वाईट वाटायला लागल.

“काही गरज नाहीये इतक वाईट वाटून घ्यायची.” कल्पेश तूसड्यात बोलला.

“काही झाल तरी तूमचे वडील आणि माझा नवरा होते.” त्यांची आई चिडून बोलायला लागल्या. “त्यामुळे तोंड सांभाळून.”

“हममम” काव्या तिच्या मानेला झटका देत बोलली. “काय सांभाळत आहे माहीती आहे आम्हाला.”

तशी त्यांची आई रागातच त्या दोघांना बघू लागली आणि घरी जायची तयारी करू लागली. तस दोघांनीही एकमेकांकडे बघून नकारार्थी मान हलवली. मग ते देखील त्यांच आवरायला लागले.

क्रमशः


अष्टपैलू लेखन स्पर्धा

कसा वाटला भाग? कमेंट करुन सांगायला विसरू नका.

🎭 Series Post

View all