Login

हत्या एक तपास भाग २

“ही केस घेण्याआधी मी आधीच सांगतोय की मी माझ्या पध्दतीने काम करणार.” इन्स्पेक्टर चेतन कडक आवाजात बोलले. “कोणी आडकाठी केली तर तो ही या केसमध्ये गोवला जाईल नंतरच्या परिणामाला मी जबाबदार असणार नाही.”
मागील भागात.

“काही गरज नाहीये इतक वाईट वाटून घ्यायची.” कल्पेश तूसड्यात बोलला.

“काही झाल तरी तूमचे वडील आणि माझा नवरा होते.” त्यांची आई चिडून बोलायला लागल्या. “त्यामुळे तोंड सांभाळून.”

“हममम” काव्या तिच्या मानेला झटका देत बोलली. “काय सांभाळत आहे माहीती आहे आम्हाला.”

तशी त्यांची आई रागातच त्या दोघांना बघू लागली आणि घरी जायची तयारी करू लागली. तस दोघांनीही एकमेकांकडे बघून नकारार्थी मान हलवली. मग ते देखील त्यांच आवरायला लागले.

आता पूढे.

त्यांच्या घराला आज छावणीच रूप आल होत. खूप सारा फौजफाटा त्यांच्या घराच्या अवतीभोवती लावण्यात आला आणि आतमध्ये पोलीस त्यांचा तपास करत होते. पण पुरावा काही मिळत नव्हता. त्यांच्या घराचा सीसीटीव्ही देखील एकदम क्लिअर होता. त्यात कोणीही आगंतुक येताना अथवा जाताना दिसला नव्हता.

पोलीसांनी पहीले त्या घरात असणाऱ्या सर्वांनाच चौकशीच्या कक्षेत घेतले. त्यांच्याकडे कसून चौकशी करण्यात आली. पण कोणीही काहीही पाहीले नव्हते. नाही त्यांना कसले आवाज आला होते. मग शेवटी ते कांताकडे वळाले. कारण बेडरूममध्ये जायची परवानगी फक्त कांताला होती. पण कालपासून ती देखील वरच्या खोल्यांकडे गेली नव्हती. ती आज सकाळीच गेली होती.

मग त्यांना कुठेही बाहेर जायला बंदी घालत घरातली काम करायला मोकळ सोडलं. तेवढ्यातच तिथला एक सुरक्षा रक्षक काहीतरी विचार करत परत मागे फिरला आणि चौकशी करणा-या पोलीस ऑफिसर जवळ गेला.

“साहेब, एक सांगायच राहील.” सुरक्षा रक्षक

“हा, बोल लवकर.” पोलीस अधिकारी

“काल मागच्या गार्डनच्या भिंतीला असणारी झाडांची पान खूपच हलत होती.” सूरक्षा रक्षक जरा घाबरतच बोलला.

“मग त्यात काय?” पोलीस अधिकारी आठ्या पाडून बोलले. “ते तर नॉर्मल आहे.”

“हो, पहीले मी पण हाच विचार केला होता.” सुरक्षा रक्षक परत विचारात हरवला. “पण नंतर मी एक उडी मारल्यासारखा आवाज ऐकला. तसा त्या बाजूला मी गेलो होतो. पण तिथे सगळेच शांत वाटलं. मग मी परतलो.”

तसा तो पोलीस अधिकारी विचार करू लागला. “बरं बघतो मी. अजून काही आठवल तर नक्की सांग.”

इकडे पोलीस तपास चालू झाला होता. तर दुसरीकडे कारखानीस ज्या पक्षाशी संबंधीत होते. त्यांनी पत्रकार परिषद घेत, यात विरोधी पक्षाचा हात असल्याचा आरोप करायला सुरवात केली आणि त्यांनी सरळ सरळ या केससाठी सीबीआई चौकशीची मागणी केली.

तर दुसरीकडे विरोधी पक्षावाले आपल्यावर केलेले आरोप खोडून काढत उलट सत्ताधारी पक्षावर आरोप करायला लागले. आता एवढी मोठी हस्ती ज्यांची हत्या झाली. त्याच्यावर राजकारणी तर आपली पोळी भाजणारच होते. पण त्यातून प्रेशर मात्र पोलिसांवर येत होत.

जागेचा पंचनामा करून कारखानीस यांचा मृतदेह शव विच्छेदनासाठी सरकारी इस्पितळात पाठवून देण्यात आला. त्यांच पुर्ण घर सील करण्यात आल. तर त्यांच्या बेडरूममध्ये जाण्यास कोणालाही मनाई करण्यात आली.

संध्याकाळपर्यंत कारखानीस यांची बायको आणि मूलही घरी येऊन पोहोचले. तोपर्यंत घराभोवती खूप सारी गर्दी झाली होती. त्यात पत्रकार, राजकारणी, नातेवाईक, मित्र अशी बरीच मंडळी होती.

संध्याकाळी हे तिघे आल्यावर पोलीसांनी परत त्यांच्याजवळ चौकशी केली. कारखानीस यांची बायको तर संशयाच्या नजरेतून सुटली. पण त्यांची दोन्ही मूल पोलीसांच्या संशयीत नजरेत भरली गेली. कारण त्यांच्या बोलण्यातून त्यांच्या वडिलांसाठी फक्त तिरस्कार बाहेर पडत होता. बरं त्याच कारण विचारलं तर ते देखील दोघेजण सांगायला तयार नव्हते. त्यांनी फक्त त्यांच्या या मूलांना त्यांनी निट सांभाळले नाही. एवढचं काय ते पोलीसांना सांगीतले होते. म्हणून त्या पोलीस अधिकाऱ्याने त्यांच्या माणासांना या मुलांवर पण लक्ष ठेवायला सांगीतले.

दोन दिवस झाले सगळ्या बाजूने तपास करूनही हाती मात्र काहीच लागत नव्हतं. मग सीबीआय चौकशीसाठी जोर पडू लागला. या मागणीच्या आलेल्या प्रेशरने पोलीस मुख्यालयात त्या पोलीस जिल्हा प्रमूखांची आणि त्या संबंधीत पोलीस अधिकाऱ्यांची मिटींग भरवण्यात आली. त्यांना केसची प्रगती विचारण्यात आली. पण त्यांच्या हाती काहीच लागल नाही म्हणुन ती केस सीबीआयकडे द्यायची का? हा प्रश्न तिथे उपस्थित केला जाऊ लागला.

“सर प्रश्न हा नाही की आम्ही ही केस सोडवू शकत नाही.” तपास अधिकारी बोलू लागला. “पण काही वेळेस चौकशीसाठी गेल्यावर वरून प्रेशर आणल जात. काही वेळेस राजकारणी माणस आडकाठी करत आहेत. तपासच पूर्ण करून देत नाहीयेत.”

यावर पोलीस मुख्यालयाचे मूख्य आयुक्त विचार करत लागले.

“आमच्यावरच प्रेशर कमी केल आणि आमच्या तपासात जास्त अडथळा आला नाही तर ही केस लवकर सोडवण्याचा प्रयत्न करू.” जिल्हा प्रमुखांनी त्यांच मत मांडलं

“पण तेवढ तपासातही काही दिसतही नाहीयेना.” मूख्य आयुक्त जरा चिडून बोलले.

“मग आपल्यातलाच एक हूशार ऑफीसरला ही केस देऊयात.” जिल्हा प्रमुख “लगेच सीबीआयला दिली याचा अर्थ आपल्या कार्यक्षमतेवर प्रश्न उठतील.”

“ठिक आहे.” मूख्य आयुक्त “बघा असा एखादा ऑफीसर आणि लवकर आरोपी सापडेल यावर लक्ष ठेवा.”

एवढं बोलून ती मिटींग संपवण्यात आली. मिटींग तर संपली होती, पण असा ऑफीसर शोधायचा कसा? हा प्रश्न पडला होता. कारण आता प्रश्न पोलीसांच्या इभ्रतीचा झाला होता. ज्यावर सगळेच आपापली पोळी भाजून घेत होते. पैश्यांचा व्यवहार होऊन तपास फिरवला जाऊ शकत होता. मग त्याचा निष्पक्षपाती तपास होणे गरजेचे होते.

मग तिथल्या जिल्हा प्रमूखांच लक्ष गेल ते नुकतीच बदली होऊन आलेल्या इन्स्पेक्टर चेतन यांच्याकडे. अतिशय तल्लख बूध्दीमत्ता, नेहमीपेक्षा जरा वेगळी विचारप्रणाली वापरणारा, त्यामुळे वेळेआधीच सतत बदली होणारा. त्याच आणि बाकीच्यांच जास्त पटायच नाही. म्हणून तो भला आणि त्याच काम भलं. या तत्वावर चालणारा.

मग त्या जिल्हाप्रमुखांनी सरळ मूख्य आयुक्तांना इन्स्पेक्टर चेतन यांच नाव सूचवल. कारण त्याला विचारत बसले असते. तर त्याने सरळ नकार दिला असता. कारण त्याच्या पध्दतीने त्याला काम करू दिल जात नव्हतं. मग त्यापेक्षा आहे तेच काम तो करायचा. पण वरून आदेश आल्यावर मात्र त्याला ते करावे लागणार होत. म्हणून जिल्हाप्रमुख यांनी थेट मुख्यालयातून त्याच्या नावाच पत्र पाठवायला लावलं.

सकाळी नेहमीप्रमाणे इन्स्पेक्टर चेतन त्यांच्या ड्युटीवर पोहोचले. कालच एका मारामारीच्या केसमध्ये त्याच्या तावडीत सापडलेले माणस त्यांना आज न्यायालयात घेऊन जायचे होते. त्याची तयारी चालूच होती, तेवढ्यातच त्यांना या हत्येच्या केसवर नियुक्त करत असल्याच पत्र त्यांना मिळाल. इन्स्पेक्टर चेतन यांनी ते पत्र पाहील आणि न्यायालयात हवालदाराला पाठवून ते सरळ जिल्हाप्रमुखाच्या ऑफिसवर जाऊन पोहोचले.

“ही केस घेण्याआधी मी आधीच सांगतोय की मी माझ्या पध्दतीने काम करणार.” इन्स्पेक्टर चेतन कडक आवाजात बोलले. “कोणी आडकाठी केली तर तो ही या केसमध्ये गोवला जाईल नंतरच्या परिणामाला मी जबाबदार असणार नाही.”

चेतन यांच्या या वाक्याची जिल्हा प्रमूखांना अपेक्षा होतीच आणि तेच त्यांना ऐकायला आल होत. मग त्यांनी एक दिर्घ श्वास घेतला आणि बोलू लागले.

क्रमशः

अष्टपैलू लेखन स्पर्धा

कसा वाटला भेग? कमेंट करुन सांगायला विसरू नका.

🎭 Series Post

View all