Login

हत्या एक तपास अंतिम भाग

ज्यामुळे तीन महिन्यापूर्वी ह्या तुमच्या शहरावर बोंबस्फोट घडवून आणला होता. त्यांना त्यांची शिक्षा मिळाली आहे. आशा करतो तुम्ही तुमच पुढच काम कराल आणि हो यात बिभीषणानेही मला मदत केली.”
मागील भागात.

जस जशी पैसे पाठवलेल्या माणसांची खाती आणि माहिती मिळायला सुरवात झाली. तस तस चेतन यांना त्या दोन्ही हत्या झालेल्या माणसांचा राग येऊ लागला. एकवेळ तर त्यांना अस वाटल्क की बर झाल कोणीतरी मारलं ते. पण कोणी मारलं? ते तर शोधाव लागणार होत? म्हणून त्यांनी तो तपास सुरु ठेवला.

आता पूढे.

मग चेतन यांनी पुन्हा सीसीटीव्ही फुटेज बघायला सुरवात केली. जिथून उडी मारण्याचा आवाज आला. त्याबाजूने त्यांनी तपास करायाला सुरवात केली. बराच वेळ त्या फुटेज खंगाळल्या नंतर एक माणूस चेतन यांच्या नजरेस पडला. जो त्या भिंतीच्या दिशेने येत आणि जात होता. त्याला बघून तो कोणत्या दिशेने गेला हे तपासले आणि त्यांना मुख्य सुगावा मिळाला.

तपास सुरु करून हा चौथा दिवस होता. त्य दिवशी सकाळीच चेतन एका विरोधी पक्षनेते असलेल्या राजकारणी माणसाकडे जाऊन बसले आणि त्यांनी सोबत धरून आणलेला माणूस त्यांच्यासमोर ठेवला. तसे तो राजकरणी माणूस घाबरून गेला आणि सरळ पोलीस आयुक्तांना फोन लावू लागला. पण चेतन यांच्या कारवाईत त्यांनी देखील हस्तक्षेप करण्यास मनाई केली.

काल रात्रीच चेतन यांनी त्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसणाऱ्या माणसाला अटक केली होती. कारखानीस यांच्या घराला कॅमेरे कुठे नाहीयेत हे तर त्याला माहिती होते. म्हणून तो बिनधास्त गेला होता. पण त्या चौकात असणाऱ्या दुकानातल्या कॅमेराकडे त्याच लक्षच गेल नाही आणि तो सापडला गेला.

मग काय? चेतन यांच्या हाताला आधीच खूप खाज येत होती, जी त्यांनी त्याचावर हात साफ करून मिटवली होती. ज्याचा परिणाम म्हणजे त्याने मुख्य आरोपीच नाव घेतलं होत. तसच त्याने लपवलेल हत्यार म्हणजे ती बंदुकही चेतन यांच्या ताब्यात दिली. मग ते आज त्या विरोधी पक्षाच्या राजकारणी माणसाला अटक करायला आले होते.

त्यांना अटक होताना बघून त्यांचे कार्यकते चिडून चेतन यांना आडवे झाले. तसा त्यांनी त्यांच्या कपाळावर हात घासला आणि त्यांना एक वार्निंग दिली. तरी ते बाजूला होत नाही म्हटल्यावर चेतन यांनी सरळ समोर उभा असलेल्या एका माणसाच्या पायाशी गोळी चालवली. तस त्या माणसाची जागीच पँन्ट ओली झाली आणि बाकीचे आपोआप बाजूला झाले.

लगेच न्यूज चनलवर बातम्या झळकू लागल्या.

“राजकीय वैमनस्यातून कारखानीस आणि त्यांचे मित्र यांची हत्या.”

सगळ्या स्तरावून चेतन यांच कौतुक व्हायला लागल. कारण त्यांनी हत्या झाल्याच्या पाच दिवसातच खरा गुन्हेगार शोधून काढला होता. पण चेतन यांचा शोध अजूनही संपला नव्हता. त्यांना काही धागे दोरे असे मिळाले होते की ते अजून काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करत होते.

दोघा जणांना ज्या गोळ्या लागल्या. त्या तर सर्वांनाच दिसल्या होत्या. पण त्यातली एक गोळी चेतन याचं डोक खात होती. ती म्हणजे त्यांच्या कपाळावर असणाऱ्या भुवयांच्या मध्यभागी लागलेली गोळी. तशी गोळी कोणी सामान्य गुन्हेगार मारूच शकत नव्हता. एकतर ती प्रोफेशनल किलरकडून किंवा ज्याने बंदूक चालवायच ट्रेनिंग घेतलं आहे त्यांच्याकडून मारली जाते. आता ज्या माणसाला गोळी मारली म्हणून पकडल तो ह्या दोघांमध्ये बसतच नव्हता. भलेही बाकी चार गोळ्या त्याने मारल्या. पण एक गोळी त्याने मारलीच नव्हती आणि शरीरातून फक्त चारच गोळ्या मिळाल्या होत्या.

पाचवी गोळी ही डोक्याच्या आरपार गेली होती. जी अजूनही सापडली नव्हती. मग चेतन परत घटना घडलेल्या जागेवर देले. तिथे कारखानीस खाली पडण्याआधी ते जिथे उभे होते त्याच्या मागची जागा चेतन यांनी तपासली. तर त्यांच्या मागे असणाऱ्या एका फोटोफ्रेमच्या फ्रेममध्ये एक गोळी अडकलेली त्यांना दिसली. जी बारीक असल्याने त्या फ्रेममध्ये सहज लपली गेली होती. चेतन यांनी ती गोळी काढली आणि तिला निरखून पाहू लागले. तसा त्यांना जरा धक्काच बसला. कारण ती गोळी साधारण गोळी नव्हती. तश्या प्रकारच्या गोळ्या चेतन यांनी भारतीय लष्कर खात्यातील स्नाईपर विभागात वापरत असल्याचे पहिले होते. ती गोळी चेतन यांनी कोणालाही न सांगता स्वतःजवळच ठेवली.

आता चेतन यांना दोन्ही माणसांनी त्यांच्या अकाउंटटला सांगून ज्या लोकांच्या खात्यावर पैसे पाठवले होते ती माणसं आठवली. मग चेतन हे पुन्हा घरच्या त्या भिंतीजवळ गेले आणि त्याच्या विरुद्ध बाजूला पाहू लागले. तर तिथेही इमारत होती. गोळीच्या अँगलचा अंदाज बांधत चेतन त्या इमारतीमध्ये गेले. त्यांच्या सोबतचे हवालदार तर त्यांच्यासोबत चालून चालून वैतागून गेले होते. पण ड्यूटी म्हणून त्यांना जाव लागत होत.

चेतन यांनी त्या इमारतीमध्ये त्यांच्यासोबत आलेल्या हवालदारांना बाकीच्या लोकांकडे चौकशी करायला लावली आणि ते स्वतः वरच्या मजल्यापासून ते दुसऱ्या मजल्यापर्यंत तपासत राहिले. ते दुसऱ्या मजल्यावरून पहिल्या मजल्यावर येणार तोच त्याचं लक्ष पाय-यांना लागून असलेल्या रेलींगकडे गेल. जिथे गोळीच एक शेळ अडकलेलं होत. चेतनने ते लगेच त्याच्या ताब्यात घेतलं आणि तसेच त्या राजकारणी माणसाच्या घराच्या बाजूला गेले. तिथल्याही इमारतीमध्ये त्यांनी तपासून पाहिलं. पण इथे काही तसा शेल मिळाला नाही.

मग चेतन यांच्या विचारांचे घोडे अजून धावायला लागले. त्या दोन्ही इमारतीचे सीसीटीव्ही फुटेज मागवले आणि ते तपासायला सुरवात केली. बराच वेळ तपासून झाल्यांनतर एका सेकंदासाठी एका माणसाची झलक त्यांना दिसली. मग त्या माणसाचा मागोवा घ्यायला चेतन यांनी सुरवात केली. तोपर्यंत सील केलेली जागा अजूनही मोकळी करण्याची परवानगी चेतन यांनी दिली नव्हती.

त्या माणसाचा मागोवा घ्यायला ही चेतन यांना बरेच कष्ट घ्यावे लागले होते. त्यांच्यासोबत असणारे हवालदारही गुन्हेगार सापडला तरी त्यांचे हे साहेब काय शोधात होते? तेच त्यांना समजत नव्हत. मग ते मनातच चेतन यांना भांडत होते. पण ड्यूटीमूळे ते शांत होते.

बराच वेळ मागोवा घेतल्यानंतर त्यांना एक जागा सापाडली. तसे ते उठून थेट तिकडे जाऊ लगले. पण तिथे पोहोचल्यावर त्यांच्या हाती निराशाच आली. कारण तिथे आता कोणीही नव्हत. फक्त एक रिकामा कागद एका खिडकीजवळ फडफडत होता. तो चेतन यांनी हलकेच पकडला आणि तोही रिकामा बघून तो फेकणारच तेवढ्यात त्यांना त्या कागदावर एक केमिकल असल्याचे जाणवले. तस त्यांनी त्यांच्या खिशातल लायटर काढल आणि त्या कागदासमोर धरल. जसा तो कागद गरम होऊ लागला तसा त्याच्यावर एक मेसेज लिहिलेला दिसू लागला.

“ऑफिसर, तुमची ह्या केसवर नियुक्ती झाल्या झाल्या तुम्ही माझ्यापर्यंत येऊन पोहोचाणार हे मला समजल होत. कारण तुम्ही वेगळे विचार करणारे ऑफिसर आहात. पण ज्यांची हत्या झाली ते कोणी साधी माणसं नसून त्यांनी दहशतवाद्यांना पैसे पुरवायच आणि शहरात घेऊन यायचं काम केल होत. ज्यामुळे तीन महिन्यापूर्वी ह्या तुमच्या शहरावर बोंबस्फोट घडवून आणला होता. त्यांना त्यांची शिक्षा मिळाली आहे. आशा करतो तुम्ही तुमच पुढच काम कराल आणि हो यात बिभीषणानेही मला मदत केली.”

हा मेसेज वाचून झाल्या झाल्या तो कागद जळून गेला. तर तो मेसेज वाचून चेतन यांच्या चेहऱ्यावर एक स्मित झळकल. चेतन यांचा संशय खरा ठरला होता. ह्या दोघांची हत्या भारतीय गुप्त विभागाच्या एजंट यांनी केली होती. कारखानीस यांच्या मुलांच त्यांच्या वडिलांच्या तिरस्काराच कारण आता चेतन यांना समजल होत. पण त्यांनी देशाला स्वतःच्या कुटुंबाच्या आधी समजल यामुळे त्यांचा चेतनला अभिमान वाटला.
तेवढ्यातच चेतन यांचा मोबाईल वाजाला. त्यांनी पहिला तर तो आयुक्तांचा होता.

“जय हिंद सर.” चेतन

“केस बंद झाली तरी त्या खोल्या का सील ठेवल्या आहेत अजून?” आयुक्त “अजून काही मिळाल आहे का?”


त्यांचा प्रश्न ऐकून चेतन यांनी त्यांना मिळालेलं त्या गोळीच शेल त्यांच्या हातात घेतल आणि त्याला बघू लागले. बराच वेळ आवाज येत नाही म्हणून आयुक्तांनी त्यांना परत आवाज दिला. तसे चेतन त्यांच्या विचारातून बाहेर आले.

“नो सर, अजून काही मिळाल नाहीये.” चेतन हलकच स्मित करत बोलले. “केस क्लोजड. अटक झालेल्या माणसांविरूध्द पूढची कारवाई करण्याची परवानगी द्या, मुख्य गून्हेगार तेच आहेत.”

“वेलडन ऑफिसर. लवकरात लवकर चार्जशिट फाईल करा.” आयुक्त खुश होऊन बोलले. “ह्यावेळेस पुरस्कारासाठी तुमच नाव नक्कीच पुढे केल जाईल.”

“थँक्यू सर,” चेतन “जय हिंद.” एवढ बोलून चेतन यांनी फोन ठेवून दिला.

त्या जागेतून बाहेर पडल्यावर त्यांच्या पोलीस स्टेशनकडे जाताना एक नदी लागत होती. त्यात सापडलेली गोळी आणि त्या दूस-या गोळीचा शेल त्यांनी त्या नदीत टाकून दिला आणि त्यांच्या पुढच्या केसच्या तपासासाठी निघून गेले.


देशाच्या सेवेसाठी फौजेला सामील व्हायचं अस नसत. अश्या प्रकारेही त्यांना मदत करून देशसेवा करता येते. हे वाक्य चेतन यांना त्यांना पोलीस ट्रेनिंग दरम्यान आलेल्या एका मिलिट्री ऑफीसरकडून ऐकायला मिळाल होत.

हा तपास पूर्ण करूनही तो अर्धवट ठेवल्याचा अभिमान त्यांच्या चेहर्‍यावर साफ झळकत होता.

समाप्त.

अष्टपैलू लेखन स्पर्धा.

कशी वाटली कथा? कमेंट करुन नक्की सांगा.

🎭 Series Post

View all