भाग - 10
आई कीर्ती आणि विकास च बोलणं शांतपणे ऐकत होत्या.
विकास " प्लीज मला तुझी गरज नाही !"
कीर्ती " का रे असं करतोयस !" आणि कीर्ती रडु लागते.
तरी ही आई काही बोलत नाही.
आणि विकास ऑफिस ला निघुन जातो.
कीर्ती आई कडे पाहते, आई बघून न बघितल्या सारखं करतात. कीर्ती सर्व आवरून रूम मध्ये जाते.
मंद आवाजात गाणी लावून ति शांतपणे ऐकत असते.
काही वेळाने कीर्तीचा फोन वाजतो. कीर्ती खडबडून जागी होते.
कीर्ती " डॉक्टर..!" ति स्वतःशीच बोलते.
कीर्ती फोन उचलते.
कीर्ती " हॅल्लो डॉक्टर , बोला मॅडम !"
डॉक्टर " हाय कीर्ती, अगं आहेस कुठे. येणार होतीस ना हॉस्पिटल ला ? "
कीर्ती " हो डॉक्टर, ते..!"
डॉक्टर " काय झालं कीर्ती ऑल ओके ना ? "
कीर्ती " हो !, म्हणजे नाही डॉक्टर !" कीर्ती अडखळत बोलते.
डॉक्टर " काय झालंय, मला नीट सांग बघू ? "
कीर्ती " खरं तर ! तर त्या दिवशी कळल्या पासून विकास माझ्याशी नीट बोलत नाही आहे ! सतत वाकड्यात बोलतो आणि भांडण्याच्या मुड मध्ये असतो.!"
डॉक्टर " अगं तु नको टेन्शन घेऊस, मी बोलु का त्याच्याशी ? "
कीर्ती " नाही डॉक्टर सध्या नको, उगाच तोह अजुन काही बोलेल तुम्हाला . "
डॉक्टर " हे बघ तोह शिकलेला आहे. मी त्याला नीट समजावेल कदाचित तोह ऐकेल.!"
कीर्ती " ह्म्म्म!"
डॉक्टर " आता मेडिकल खुप पुढे गेल आहे. ट्रीटमेंट केल्यावर मुलं होऊ शकत. "
कीर्ती " पण तोह ऐकण्याच्या आणि समजण्याच्या मुड मध्ये नाही तोह. "
डॉक्टर " हवं तर त्याला वेळ घेऊ दे, मना विरुद्ध जाऊन मुलं कधीच होऊ शकत नाही !"
कीर्ती " पण दोष त्याच्यात आहे. माझ्यात नाही हे तोह समजुनच घेत नाही.!" आणि कीर्ती रडु लागते.
डॉक्टर " तु रडु नकोस! आपण भेटू नि सविस्तर बोलु. "
कीर्ती " थँक्स डॉक्टर !"
आणि कीर्ती फोन ठेवते. ति बाहेर येते रूम च्या आईंना पहायला जाते.
कीर्ती " आई , रागवला आहात का ? "
आई " तुझ्यावर वर काय म्हणुन रागवू ? इथे माझं च नान खोटंय तर तुला काय बोलुन फायदा !"
कीर्ती " अहो आई असं काय बोलताय ? "
आई " विकास पियुन येईल असं मला कधीच वाटलं नव्हत !"
कीर्ती " आई इतकी वर्ष झाली लग्नाला, कधी ते पियुन आले नव्हते. पण आताच ते असे वागले, कारण ते खुप टेन्शन मध्ये आहे.!"
आई " ठीक आहे सगळं, पण मग तुझं काय ? "
कीर्ती " समजली नाही आई मी ? "
कीर्ती ला आईच्या बोलण्याचं आश्चर्य वाटत. तिला कळत नसत नक्की आई ना काय बोलायचंय.
आई " मी सतत नेहमी तुझा इतकी वर्ष तिरस्कार केला ? तुझं मन नाही समजुन घेतलं मी कधी ! नेहमी सासु होऊन वागली. आई म्हणुन तुला समजण्याचा प्रयत्न केला नाही मी !"
आणि आई डोळे पुसतात पदराने.
कीर्ती " आई प्लीज रडु नका !"
कीर्ती आईला शांत करत बोलते.
आई " विकास चा काही फोन आला का ? "
कीर्ती " नाही आई ! मी करते त्यांना कॉल. "
असं बोलुन कीर्ती बाहेर जाते. विकास ला कॉल लावते. विकास तिचे कॉल उचलत नाही.
कीर्ती " आई ते कॉल घेत नाही आहे. तुम्ही काळ्जी करू नका येतील ते !"
काही वेळा नंतर संध्याकाळ होते. कीर्ती खडबडून जागी होते. ति फोन उचलते. विकास ला पुन्हा कॉल लावते.
विकास कॉल उचलतो.
विकास " काय चाललंय कीर्ती, किती कॉल करतेस ? "
विकास कॉल वर कीर्ती वर चिडतो.
कीर्ती " अरे चिडू नकोस ! इतके कॉल केले एक तरी उचलायचा ना ? "
विकास " का उचलायचे ? आणि काळ्जी आहे असं दाखवू नकोस !"
कीर्ती " मला माहित आहे तु चिडलायस माझ्यावर ? पण आईनं साठी मी कॉल करत होती. त्या काळ्जी करत होत्या तुझा कॉल नाही म्हणुन !"
विकास " ह्म्म्म!" आणि विकास कॉल कट करतो.
कीर्ती विकास च मन समजत होती. तिला माहित होतं, जे समजलं त्या मुळे तोह असं अचानक वागतोय.
त्याला मुळे त्याला हवा तितका वेळ आपण दिला पाहिजे. कारण कीर्ती च खुप प्रेम होत विकास वर.
..... क्रमश....
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा