हवं असलेलं मातृत्व.. भाग - ९

आईला खुप वाईट वाटत.

भाग - ९


कीर्ती " आई मी ग्यान देत नाही आहे. आणि ग्यान द्यायला मी तुमच्या हुन मोठी ही नाही. तुम्ही मला सासु नज तर आई समान आहात. एक मुलगी म्हणुन हे जेवणाचं ताट घेऊन आली. " असं बोलुन कीर्ती जेवणाचं ताट आईनं समोर ठेऊन रूम मधुन निघुन जाते.

आई समोर ठेवलेल ताट, हळुच हातात घेतात. नि जेऊ लागतात. कीर्ती हळुच दरवाजा आडून आईंना पाहत असते. आई ने तिचं ऐकल्यामुळे तिला खुप बरं वाटत.

आईच्या डोळ्यात पाणी येत ते, अलगद हाताने पुसतात.

रात्रीचे बारा वाजतात. कीर्ती जागीच असते. पुढे कस करायचा हा सर्वात मोठा विचार तिला पडलेला असतो.

ति सारखी जाऊन विकास नि आईच्या रूम वर नजर देत असते.

सकाळ होते. कीर्ती उठुन चहा नि नाश्ता बनवते. तितक्यात आई उठतात. कीर्ती ला स्वयंपाक घरात पाहुन ते काही च बोलत नाही.

कीर्ती " आई चहा देते तुम्ही फ्रेश होऊन घ्या !"

आई " हो !"

कीर्ती ला आईच्या बोलण्यातली शांतता, खुप काही सांगुन जाते.

" विकास उठला का ? " आई विचारतात.

कीर्ती " नाही अजुन ! जाते उठवायला . "

आई काही न बोलता रूम मध्ये जातात.

कीर्ती विकास ला उठवायला रूम मध्ये जाते. विकास उठलेला असतो. जमिनीवर बसून एकटक नजरेने पाहत असतो.

कीर्ती " अरे उठलात ? बरं चहा केलाय. बाहेर वाट पाहते.!"

तरी विकास च्या तोंडून हू ना चु नसतो. पुन्हा कीर्ती त्याला विचारते.

विकास " सकाळी सकाळी तुझा चेहरा घेऊन इथे माझ्या समोर येत जाऊ नकोस.!"

कीर्ती " आता परत काय झालं ? " विकास च्या बोलण्याला कीर्ती शांतपणे घेते.

विकास " हे तु मला च विचार ? "

कीर्ती " तुम्ही कितीही भांडलात तरी मी शांतच राहणार ! सौंसार आहे कोणी एकाने माघार घेणं गरजेचं असत. नाही तर सौंसार तुटतो. "

विकास " मग चांगलाच आहे ! तुटूदे. "

कीर्ती स्वतःच्या रागावर खुप कंट्रोल करते. तिला माहित आहे विकास रागाच्या भारत बोलतोय.

कीर्ती " अरे ! असं कस तुटूदे. इतकं ही सोप्प नाही ते. "

आणि कीर्ती गालात हसते.

विकास ला तिचं हसन पाहुन अजुन राग येतो.

विकास " तुला असं नाही कळणार, अपमान काय असतो हे कळेल तुला.!"

आणि विकास फ्रेश व्हायला बाथरूम मध्ये जातो.

त्याला कल्पना ही नसते कि दारूच्या नशेत आपण आई समोर आलेलो ते.

विकास फ्रेश होऊन बाहेर येतो. कीर्ती त्याला चहा आणि नाश्ता पुढे करते.

विकास " नकोय मला, तुझ्या हात च न खाल्लेल बरं मी !"

कीर्ती " अरे असं काय करतोस ? ऑफिस ला जाताना उगाच नाश्ता वर राग काढु नकोस असा."


....... क्रमश...


🎭 Series Post

View all