Login

हवास मज तू! भाग -७४

वाचा एक अनोखी प्रेमकथा
हवास मज तू!
भाग -७४

मागील भागात :-
हॉटेल मध्ये सक्सेस पार्टी सुरु असताना सर्व शौर्याचे अभिनंदन आणि कौतुक करत असतात. नव्याच्या डोक्यात मात्र वेगळाच कट शिजत असतो. शौर्याला कसेही करून आपल्या मार्गातून बाजूला करायचे याचा प्लॅन ती आखत असते.

नव्या यात यशस्वी होईल का? वाचा आजच्या भागात.


"नो मॅम, आम्ही तशी वेळ येऊ देणार नाही." विनीतने तिला आश्वस्त केले.


"द्याट्स गुड. नाऊ एंजॉय द पार्टी." शौर्या म्हणाली.


हलके संगीत, सोबतीला असलेले सॉफ्ट ड्रिंक्स.. सर्व पार्टीत मग्न झाले होते. इतर सहकाऱ्यांच्या गराड्यात म्युझिकवर थिरकत असलेली नव्या विनीत आणि कीर्तीला शौर्यापासून दूर गेल्याचे पाहताच तिच्याकडे जायला निघाली.


"वेटर.." ड्रिंक्स सर्व्ह करत असलेल्या वेटरला तिने हाक दिली.


"कॅन यू ब्रिन्ग टू ऑरेंज ज्यूस?"


"मॅम, हे ऑरेंज ज्यूसच आहे. तुम्ही घेऊ शकता." तिच्यापुढे ट्रे करत तो म्हणाला.

"थँक यू." तिने ओठ रुंदावून त्याच्या हातातील ट्रे घेतला आणि समोरच्या टेबलवर ठेवला. त्यात दोनच ग्लास उरले होते.

ग्लासवरची नजर बाजूला केली आणि शौर्याकडे तिने एकवार पाहिले. काही सहकारी तिला शुभेच्छा देत होते. तीही हसून त्यांचा स्वीकार करत होती.

अंगावर ल्यालेला काळा रंग आणि त्यात उजळलेला तिचा गव्हाळ वर्ण. ओठावरच्या गोड हास्यामुळे चेहऱ्यावर झळकणारी तकाकी.. क्षणभर नव्या तिच्यात हरवून गेली.

'दी, किती भारी दिसते आहेस यार! एवढया गोड मुलीशी असं वागायला मलाही बरं वाटत नाहीये, पण इलाज नाहीये गं. सॉरी.'

मनात तिची माफी मागत इतका वेळ हातात असलेली एक गोळी सर्वांच्या नकळत तिने एका ग्लासमध्ये टाकली. दोन मिनिटात ती गोळी ज्यूसमध्ये अलगद विरघळून गेली.


"काँग्रॅच्यूलेशन्स! दी." ती एकटी असल्याचे बघून नव्या तिच्या पुढयात उभी राहत म्हणाली.


'दी..' इतक्या दिवसानंतर ही हाक कानावर येताच शौर्याने समोर पाहिले. तिच्यासमोर तिची निवी उभी होती. तिला समोर बघताच काही क्षणासाठी आपण इथे एक बॉस आहोत हे ती विसरून गेली.


"निवी..?" आपसूकच तिच्या तोंडून बाहेर पडले. तिच्या काळ्या डोळ्यात जणू तिला हरवायला होत होते.

'फारशी नटली नसतानाही किती गोड दिसतेय ही? नाजूक चणीची माझी गोडुली. किती निरागस आहे ही आणि मी हिला किती टॉर्चर करतेय? सॉरी निवी.. रिअली सॉरी.' ती मनात नव्याची माफी मागत होती.


"हृदयापासून अभिनंदन. या तीन दिवसामध्ये तू खूप काही अचिव्ह केले आहेस. त्या आनंदात हे आपल्यासाठी. चिअर्स!" हातातील ट्रे टेबलवर ठेवत त्यातील एक कप तिच्या हातात देत ती म्हणाली.


नव्या अगदी सहजतेने बोलत होती. इतक्या दिवसात तिच्या डोळ्यात शौर्याबद्दल असलेला राग आणि घृणा आज नाहीसा झाला होता. त्याजागी तिचे पूर्वीचे प्रेम परतल्यासारखे वाटत होते. 'काकाने हिला सगळं सांगितले तर नाही ना?' नकळत तिच्या मनात हा प्रश्न येऊन गेला.

"थँक यू अँड चिअर्स टू यू अल्सो!" तिच्या हातातील ग्लास घेत शौर्या म्हणाली.

तिच्या हातातील तो ग्लास बघून नव्या मनात हसली. आता समोर काय घडणार? याचे चित्र तिच्या नजरेसमोर स्पष्ट दिसत होते. शौर्याच्या हातातील ग्लास रिकामा झाला की थोड्याच वेळाने तिला चक्कर येईल आणि मग काही क्षणात तिचे काम तमाम! ती मनात इमले रचण्यात मग्न झाली होती.


"हॅलो ब्युटीफूल गर्ल्स! मे आय जॉईन विथ यू?" नव्या विचारात असताना एक अनोळखी आवाज तिच्या कानावर आला.


"यश? तू इथे? पण तू तर कालच गेला होतास ना?" त्याला अनपेक्षितपणे तिथे बघून शौर्याच्या चेहऱ्यावर आनंदाने गुलाब फुलले होते.

तिला आणि यशला असे एकत्र बघून नव्या मात्र गोंधळली होती.

"गेलो तर होतो, बट मॅडम तुमची पहिली सक्सेस पार्टी मिस करायला नको, म्हणून परतसुद्धा आलो." तिला स्पष्टीकरण देत तो म्हणाला.

"बाय द वे काँग्रॅच्यूलेशन्स टू यू." तिचा हात हातात घेण्यासाठी त्याने त्याचा हात समोर केला.


"थँक यू." म्हणत हातातील ग्लास खाली ठेवत तिने त्याच्या हातात हात दिला.


"थँक्स फॉर द ड्रिंक." शौर्याने खाली ठेवलेला ग्लास यशने हातात घेतला.


"एक्सक्युज मी सर, ते शौर्या मॅडमचे ड्रिंक आहे." तो ग्लास तोंडाला लावणार तेच त्याला रोखत नव्या म्हणाली.

त्याने तिच्याकडे अनोळखी नजरेने पाहिले.

"अरे, मी तुमची ओळख करून द्यायलाच विसरले. मीट माय ब्रिलियंट स्टॉफ मेंबर मिस नव्या अँड मिस नव्या, इट्स मिस्टर यश पाटील.."


"यश पाटील? म्हणजे आत्ता आपली डील ज्यांच्याशी फायनल झाली त्या कंपनीचे सीईओ?" शौर्या ओळख करून देत असताना नव्याने आश्चर्याने विचारले.

"एक्झ्याक्टली." तो हसून म्हणाला.


"ग्लाड टू मीट यू सर." तिने तिचा ग्लास खाली ठेवत हात समोर केला.


यशने एकवार शौर्याकडे नजर टाकली आणि मग नव्याकडे बघून स्मित केले.

"सेम हिअर." तिच्या हातात हात मिळवत तो म्हणाला.

हात मिळवण्यापूर्वी त्याने त्याचा ग्लास खाली ठेवला होता आणि ते बघून नव्याने सुटकेचा निःश्वास टाकला.

"चला तर पार्टी एंजॉय करूयात?" त्याने परत ग्लास yहातात घेतला.

"सर, अहो हे साधे ऑरेंज ज्युस आहे. तुमच्यासाठी मी दुसरं काही मागवते ना." त्याच्या हातातील ग्लास घेण्याचा प्रयत्न करत नव्या म्हणाली.


"इट्स ओके. तसेही मी फारसे ड्रिंक करत नाही तेव्हा हे ऑरेंज ज्युस मला चालेल." तो स्मित करत नव्याला म्हणाला.


"ओके, मग मी तुमच्यासाठी दुसरे ऑरेंज ज्युस आणायला सांगते. ॲक्च्युली शौर्या मॅम आणि माझ्यासाठी मी हे आणले होते." ती म्हणाली.


"मिस नव्या, काय हे? कसला बालिशपणा सुरु आहे?" यशपुढे नव्याचे वागणे शौर्याला काहीसे विचित्र वाटत होते.

"यू बोथ एंजॉय धिस. मी माझ्यासाठी दुसरे मागवते." यशकडे बघत ती म्हणाली.

"सर.." त्याने ओठाजवळ ग्लास नेताच नव्या जवळजवळ ओरडलीच.

"हा माझा ग्लास आहे. मी मघाशी यातला एक घोट प्यायले होते, तेव्हा तुम्ही हा ग्लास घ्या." टेबलवरचा तिचा ग्लास त्याला देत ती म्हणाली.


"नो, मला चांगल्याने आठवतेय की हा शौर्या मॅमच्या हातातील ग्लास आहे तुमच्या नाही." तिला पटवून देण्याचा प्रयत्न करत यश म्हणाला.
"तसे तर दोन्ही ग्लासमध्ये सारखेच ज्युस दिसते आहे, यात काही स्पेशल आहे का? ज्यामुळे तुम्ही त्याच्या मागे लागला आहात?" तो मिश्किलपणे म्हणाला.

"हो, स्पेशल आहे. माझे उष्टे आहे." त्याच्या हातातील ग्लास खेचत तिने गटागटा ते घशात रिचवले. घाईघाईत पिताना त्यातले काही घोट तिच्या ड्रेसवर सांडले.

"निवी, हळू अगं. का अशी वागते आहेस?" शौर्या तिला गोंधळून म्हणाली.


"एक्सक्युज मी, मी हे साफ करून येते." नव्या वॉशरूमकडे जात म्हणाली.


"यश, सॉरी. ॲक्च्युली निवी जराशी वेंधळी आहे. तिने हे जाणूनबुजून केले नसावे. ग्लास खरंच एक्सचेंज झाला असावा." तिच्या वतीने त्याला माफी मागत शौर्या म्हणाली.


"निवी? म्हणजे हीच तुझी बहीण आहे? जिच्याबद्दल तू मला सांगत असतेस?" यश डोळे विस्फारून म्हणाला.


"हो. का?" तिने भुवई उंचावत विचारले.


"शौर्या, असे एसेल तर ती संकटात सापडली आहे. तू तिला लगेच बघून ये." तो तिला घाईत म्हणाला.


"यश, तू काय बोलतोहेस?" तिला काहीच कळत नव्हते.


"शौर्या, प्लीज वेळ वाया घालवू नकोस. तिला बघ. मी तुला नंतर समजवतो." यश तिला काळजीने म्हणाला.


"ओके, डोन्ट पॅनिक. मी बघतेय." त्याच्या बोलण्यावर कसे रिऍक्ट व्हावे हे शौर्याला कळत नव्हते. तो म्हणाला म्हणून ती वॉशरूमकडे जायला निघाली.


"नव्याऽऽ" वॉशरूमजवळ पोहचातच शौर्याच्या कानावर कीर्तीचा मोठ्याने आवाज ऐकू आला.


"कीर्ती? काय झालेय? तू का ओरडलीस?" धावत आत जात शौर्या म्हणाली.


"मॅम, नव्या इथे बेशुद्ध पडलीय. मी वॉशरूमला आले होते. बाहेर निघत असताना मला ही इथे दिसली." कीर्तीच्या डोळ्यात पाणी होते.


"हेय निवी, तुला काय झालेय? डोळे उघड बाळा, प्लीज." तिच्या गालावर हलके चापटी मारत ती काळजीने म्हणाली.


"मॅम, डॉक्टरांना कॉल करायला हवा." कीर्ती घाबरून म्हणाली.


"अं? हो, हो. मी कॉल करते." एका हाताने नव्याला सावरण्याचा प्रयत्न करत शौर्याने डॉक्टर अमितचा नंबर डायल केला.


"शौर्या बेटा, काय झाले? शशांक ठीक तर आहे ना?" तिचा नंबर बघून पलीकडून अमित विचारत होता.


"अमित अंकल, काका ठीक आहे. निवी.. निवी अचानक बेशुद्ध झालीये. कशालच रिस्पॉन्स देत नाही आहे." फोनवर रडत रडत शौर्या सांगू लागली.
:
क्रमशः
©®Dr. Vrunda F. (वसुंधरा..)
*साहित्यचोरी गुन्हा आहे. *
फोटो गुगल साभार.
******

0

🎭 Series Post

View all