Login

हवास मज तू!भाग -६७

वाचा एका प्रेमाची अनोखी कथा.
हवास मज तू!
भाग -६७

मागील भागात :-
विनीत आणि कीर्तीला सोबत घेऊन मिटिंगला गेलेली शौर्या तिथे यशला बघून शॉक होते. दोन दिवसापासून ज्या व्यक्तीसोबत ती राहत होती तोच यश तिच्यासमोर अपोझिट कंपनीचा सीईओ म्हणून तिच्यसमोर येतो तेव्हा तिचा त्यावर विश्वास बसत नाही.

आता पुढे.


"आणि सर, या मिस शौर्या केळकर, सीईओ ऑफ एसके इंटरप्रायझेस. मॅम, मीट अवर सीईओ मिस्टर यश पाटील." दोघांची ओळख करून देत मिस्टर दास म्हणाले.

यश आल्यापासून ती त्यालाच न्याहाळत होती. हा इथे कसा? या प्रश्नात अडकत असतानाच मिस्टर दासने त्याच्या कंपनीचा त्याची सीईओ म्हणून ओळख करून देताच तिचे डोळे आणखी विस्फारले.


तासाभरापूर्वीच तर त्याने तिला तिच्या ऑफिसला सोडून दिले होते आणि सायंकाळी घ्यायला येणार असेही सांगितले होते आणि काही वेळातच रिसेप्शनीस्टने तिला कारची चावी आणून दिली होती. काय तर म्हणे तिला ऑफिसच्या वॉचमनने ती दिलीय.

"ह्या कीज तुझ्याजवळ कशा?" रिसेप्शनीस्ट चावी घेऊन आत आली तेव्हा तिने विचारले होते.

"वॉचमन काकांनी आणून दिल्यात. सरांनी तुम्हाला द्यायला सांगितलेय असं ते म्हणाले." तिने उत्तर दिले होते.

मिटिंगला जायला कारची आवश्यकता पडेल हे शौर्याच्या ध्यानीही नव्हते; यशने मात्र दूरदृष्टीने चावी वॉचमनकडे सोपवून तिची अडचण दूर केली होती.

त्यावेळी तिच्या बारीकसारीक गोष्टींवर लक्ष ठेवून असलेला हा यश म्हणजेच ज्याच्यासोबत आपली मिटिंग ठरली आहे तोच यश पाटील असेल याची पुसटशी कल्पना देखील तिला नव्हती.

दोन दिवसापासून ती ज्याच्या घरात वावरत होती, जो तिला जीवापाड जपत होता तो यश पाटील म्हणजे बंगलोर मध्ये स्थायिक असलेल्या एका बड्या कंपनीचा मालक? तिचा तर अजूनही विश्वास बसत नव्हता.


"ग्लाड टू मीट यू मॅम." यशने स्मित करून त्याचा हात पुढे केला.

शौर्या मात्र तिच्याच तंद्रित होती. तिच्यासमोर सुटाबुटात असलेला यश अजूनही तिच्या पचनी पडत नव्हता.

"मॅमऽ" त्याने पुन्हा हलकेच हाक दिली.


"सेम हिअर मिस्टर पाटील." तंद्रीतून बाहेर पडत तिने त्याला प्रत्युत्तर दिले; मात्र त्याच्या हातात हात द्यायचे शिताफीने टाळले.


"कॅन वी स्टार्ट?" हात मागे घेत यश म्हणाला.


"या, शुअर." तिने विनीतकडे बघून इशारा केला. तसे प्रेजेंटेशन सादर करायला विनीत पुढे आला.


"सॉरी मिस्टर विनीत, पण मला हे तुमच्या सीईओकडून ऐकायला जास्त आवडेल." यश त्याला अडवत म्हणाला.


त्याच्या इच्छेनुसार शौर्याने तिच्या शैलीत तिचे म्हणणे मांडले. तिच्या प्रभावी सादरीकरणाने यश किती खूष झालाय हे त्याच्या चेहऱ्यावरून दिसून येत होते.


"मॅम, आजपर्यंतचे हे बेस्ट प्रेजेंटेशन आहे. मला वाटतं पुढची स्टेप घेण्यात मला काहीच हरकत नाहीये." तो आनंदाने म्हणाला.

"म्हणजे?"


"मिन्स वी आर इंटरेस्टेड इन युअर प्रोजेक्ट. काँग्रॅच्यूलेशन्स!" त्याने त्याचा परत एकदा समोर केला.


"थँक्स अँड काँग्रॅच्यूलेशन्स टू यू टू." यावेळी तिने त्याच्या हातात हात दिला.


"काँग्रॅच्यूलेशन्स मॅम!" तिच्या हातात फुलांचा गुच्छ देत मिस्टर दासने तिच्या सोबत विनीत आणि कीर्तीचे अभिनंदन केले.


"मिस्टर दास, चला. या आनंदात लंच करू या. एक छोटीशी पार्टी? तसेही आता भुकेने पोटात उंदीर उडया मारायला लागले आहेत."

यशने दासकडे बघून इशारा करताच त्यांनी रिसेप्शनवर फोन करून टेबल बुक केले.

शौर्याला नकार द्यायचा प्रश्न नव्हता कारण प्रोजेक्ट फायनल झाल्यानंतरच्या या अपरिहार्य बाबी होत्या. विनीत आणि कीर्ती तर जाम खूष होते. या प्रोजेक्टवर त्यांचे अवलंबून असलेले प्रमोशन त्यांच्या डोळ्यासमोर स्पष्ट दिसत होते.

यश निर्विकारपणे वावरत होता. शौर्याच्या चेहऱ्यावर न उमटलेला पण मनात चाललेला गोंधळ तो सहजरित्या टिपू शकत होता. लंचसाठी त्याने तिच्या आवडीचे जेवण ऑर्डर केले तेव्हा तिच्या डोळ्यातील भाव त्याला हवेहवेसे वाटत होते.

*******

"मॅम, हे पाटील सर किती भारी आहेत हो? म्हणजे आपली डील फायनल होईल हा विश्वास आम्हाला होताच पण त्यांनी किती सहजरीत्या सगळं समजून घेतलं." ऑफिसच्या परतीच्या प्रवासात कीर्ती यशचे गुणगान गाताना अजिबात थकत नव्हती.


"म्हणजे? यात माझे काहीच योगदान नाहीय का? संपूर्ण क्रेडिट मिस्टर पाटीलांचेच होय?" शौर्याने तिरकसपणे विचारले.


"नो मॅम, मी असे कुठे म्हणाले? तुम्ही पूर्ण प्रेजेंटेशन किती सफाईदारपणे सादर केलेत? पण समोरची व्यक्ती थोडी स्पोर्टींगली असली की आपल्यावर तेवढे दडपण येत नाही, हो ना रे विनीत?" शौर्याला दिसणार नाही अशा पद्धतीने विनीतला कोपराने धक्का देत ती म्हणाली.


"तू म्हणतेस ते खरे आहे. एक माणूस म्हणून पाटील सर खूप चांगले व्यक्ती आहेत. पण आपल्या मॅम देखील काही कमी नाहीत. पहिल्याच मिटिंगमध्ये त्यांनी चौकार ठोकलाय." कीर्तीची बाजू सावरत विनीत म्हणाला.


"विनीत पुरे! मला उगाच मस्का लावायची गरज नाहीये." त्याला आवरत ती म्हणाली.

तसेही यशपुढे बोलताना तिला मनातून किती दडपण आले होते हे केवळ तिला ठाऊक होते आणि यशला देखील नक्कीच कळले होते. ऑफिस आले तसे त्यांच्या चर्चेवर आपोआप कुलूप लागले.


केबिनमध्ये गेल्यावर थोड्याच वेळात तिने दिनकरला बोलावून घेतले आणि अर्ध्या तासात अर्जंट मिटिंगसाठी सर्वांना मिटिंग हॉलमध्ये उपस्थित राहण्याचे कळवण्यास सांगितले.

"आल्या आल्या लगेच मिटिंग? डील फायनल झाल्याचे मॅम जाहीर करणार आहेत की काय?" विनीतला मेसेज करत कीर्तीने विचारले.

"मला काय माहित? मीटिंगला गेल्यावर कळेलच." त्याचा मेसेज.

"पण तिथे नव्याशी नजर मिळवायला मला नाही जमणार. आपण कितीही बोलत असलो तरी या प्रोजेक्टमागे खरी मेहनत तिचीच होती." कीर्तीला अपराधीपणाची सल टोचत होती.

"मग जर मॅमनी प्रमोशन जाहीर केले तर ते नाकारायचे का?" विनीतचा प्रश्न.

"नकोऽऽ. आपल्या फ्युचर प्लॅनिंगवर सगळं पाणी फिरेल."

"मग आता गिल्टी वाटून घेऊ नकोस. एक पाऊल पुढे टाकलेय, आता परत मागे नको यायला." त्याचा मेसेज वाचून तिने त्याच्याकडे पाहिले.

'सगळं ठीक होईल.' विनीत तिला नजरेने धीर देत होता.

*****

"आजची मिटिंग एवढया तातडीने का बोलावलीय हा प्रश्न तुम्हा सर्वांनाच पडला असेल. तेच मी आता सांगणार आहे. आपल्या कंपनीचे प्रोजेक्ट एका प्रख्यात कंपनीला आवडले असून आज ती डील फायनल झालीय. ही गुड न्युज सर्वांना कळावी यासाठी ही मिटिंग आयोजित केली आहे." बोलताना तिने मुद्दाम नव्याकडे एक कटाक्ष टाकला.

डील फायनल झाल्याचे ऐकून तिलाही आनंदच झाला होता. शेवटी तिच्या मेहनतीचे हे फळ होते.


"खूप खूप अभिनंदन मॅडम." तिच्यावर स्टॉफकडून अभिनंदनाचा वर्षाव सुरु झाला.


"धन्यवाद!" शुभेच्छा स्वीकारत शौर्या म्हणाली.


"पण हे सर्व माझ्या एकटीचे यश नाहीये. इनफॅक्ट या यशाचे खरे शिलेदार मिस्टर विनीत आणि मिस कीर्ती आहेत. तेव्हा टाळयांच्या कडकडाटाने सर्वांनी परत एकदा त्यांचे अभिनंदन करुया." टाळ्या वाजवत ती म्हणाली. त्याबरोबर सर्वांनी टाळ्यांचा गजर केला.

"या यशाबरोबरच विनीत आणि कीर्ती यांच्यासाठी आणखी एक गुड न्युज आहे." ती बोलायला लागली त्याबरोबर टाळ्यांचा आवाज कमी झाला.

"कोणती मॅम?" एकाने विचारले.

"या दोघांचे प्रमोशन. उद्यापासून विनीतला त्याची स्वतंत्र केबिन मिळेल आणि कीर्ती त्याची असिस्टंट म्हणून त्याच्या सोबत असेल." शौर्याने अनाउंस करताच सर्वांनी पुन्हा टाळ्या वाजवल्या.


"तुम्हा दोघांचेही खूप खूप अभिनंदन!" नव्या विनीत आणि कीर्तीजवळ येत म्हणाली.


"थँक यू. बट इट ऑल बिकॉज ऑफ यू. तू तयार प्रेजेंटेशन आम्ही सादर केले आणि त्याचे फलित म्हणून हे प्रमोशन मिळतेय. खरं तर तुला थँक्स म्हणावे की सॉरी तेच कळत नाहीये." विनीत तिचे हात हातात घेत म्हणाला.


"अरे, सॉरी काय? जे ज्याच्या नशिबात असतं ते मिळतंच. सगळं विसरून तुम्ही फक्त हा क्षण तेवढा एंजॉय करा. मी तुमच्यासाठी खूप खूष आहे. ऑल द बेस्ट फॉर युअर फर्दर जर्नी." एक स्मित करत ती म्हणाली.

"म्हणजे नव्या, तू आमच्यावर रागावली नाहीस ना?" कीर्तीने घाबरत विचारले.

"वेडी आहेस का? मी का रागावू?"

"ओह! थँक यू सो मच डिअर." कीर्तीने तिला मिठी मारली.

"ओके. मिटिंग इज ओव्हर नाऊ. मिस नव्या, तुम्ही मला माझ्या केबिनमध्ये भेटायला या." केबिनकडे जाता जाता शौर्याने नव्याकडे एक नजर टाकली.

ती केबिनमध्ये गेल्यावर पाचच मिनिटात दारावर टकटक झाली.

"येस, कम इन."

दरवाज्यात उभ्या असलेल्या नव्याकडे पाहून शौर्या म्हणाली तसे काही न बोलता नव्या आत येऊन उभी राहिली.

"मिस नव्या, तुम्हाला मी इथे कशासाठी बोलावले आहे याचा अंदाज तर आला असेलच ना?" तिला खालून वरपर्यंत न्याहाळात शौर्याने विचारले.

"नो." नव्याने निर्विकारपणे मान हलवली.


काय असेल शौर्याच्या मनात? वाचा पुढील भागात.
:
क्रमशः
©®Dr. Vrunda F. (वसुंधरा..)
*साहित्यचोरी गुन्हा आहे. *
फोटो गुगल साभार.
*******


🎭 Series Post

View all