Login

हव्यास भाग १

हव्यास भाग १
हव्यास भाग १
कार मधे जूनी मराठी गाणी चालू होती. त्या तालावर त्यांनी स्टिअरिंग वर बोटांनी ताल धरला होता. ओठांचा चंबू करून शिळ घालत ते समोरचा रेड सिग्नल ग्रीन होण्याची वाट बघत होते. कमी कमी होत जाणारे नंबर बघून त्यांनी गिअर बदलला. कार सुरू झाली. पाच सात मिनिट ट्रॅफिक शी दोन हात करत ते बँकेत पोचले.

लक्ष्मी विकास कॉ ऑपरेटिव्ह बँक अशी पाटी दिमाखात ऊभी होती. शेजारी बँकेचं एटीएम होत. बँकेच्या कर्मचारी आणि येणाऱ्या ग्राहकांच्या साठी पार्किंग ची सोय होती. त्या इमारतीच्या खालच्या मजल्यावरच्या चार दुकान एकत्र मिळून बँक होती. बँकेच्या पार्किंग लॉट मधे त्यांनी त्यांची कार पार्क केली. इतक्यात शेजारी एक बाईक पार्क करून एक मुलगा आला.

" गूड मॉर्निंग सर " त्यांना विष करून त्या मुलाने त्यांची बॅग त्याच्या हातात घेतली.

" गूड मॉर्निंग हर्षल. अरे असू दे मी घेतो."

तो नुसताच हसला. त्याची घाई बघून ते नुसतेच हसले.ते दोघं पायऱ्या चढून आले. पायरी जवळ अजून काही त्यांचे सहकारी जमले होते. त्यांनी आपल्या खिशातून किल्ली काढली.
पियूनच्या कडे दिली. पिऊन आणि हर्षल ने मिळून दुकानाच शटर उघडल.

" अरे हर्षल किती ती गडबड. तुझ घड्याळ बँकेत आहे. म्हणजे सुरक्षित आहे." त्यांनी हर्षल ची चेष्टा केली. ते ऐकुन त्याचे गाल लाल झाले.

" काय रे हर्षल , काय झालं ? सर असं का म्हणतात ?" रवींद्र ने विचारलं.

" रवींद्र सर, तुम्हाला समजलं नाही का शुक्रवारी काय घडलं ते ! " किर्ती मॅडम नी आश्चर्याने विचारलं.

" मी तर आज येतो आहे. मागच्या आठवड्यात मी सुट्टी वर होतो. मला कस काय माहीत असेल ?" त्यांनी विचारलं.

" रवींद्र सर, हर्षल त्याचं घड्याळ बँकेत विसरला. "
" मग त्यात काय एवढं विशेष. कधी तरी गडबडी मधे अस घडू शकत." रवींद्र सर म्हणले. त्यांना समजेना हे दोघं अस का बोलतं आहेत. आणि त्याशिवाय ते हर्षल कडे बघून हसत का आहेत ?

" रविंद्र सर, हर्षलला ते घड्याळ त्याच्या होणाऱ्या बायकोने घेउन दिलं होतं. शुक्रवारी संध्याकाळी तो सुरभी सोबत फिरायला गेला होता. तेव्हा त्याच्या कडे ते घड्याळ नव्हत. म्हणून तिने विचारल तेंव्हा समजलं साहेबाना आपण घड्याळ बँकेत विसरलो आहे." अस म्हणत त्या हसु लागल्या.

" काय रे हर्षल, बायकोने गिफ्ट दिलेलं घड्याळ असं कसं काय विसरला ?"

" ते आम्ही दोघं पिक्चर बघायला जाणार होतों. काम संपायला उशिर झाला. म्हणून पटा पट सामान बॅग मधे भरल. नी निघालो. नी घड्याळ बँकेत राहिलं." तो थोडा ओशाळून बोलत होता.

" हर्षल ने आपल्या व्हॉट्स ॲप ग्रुप वर विचारलं होत. तेंव्हा समजलं."

" तू व्हॉट्स ॲपवर विचारलं ?"  एकाने आश्चर्याने विचारलं.

" सर ते तिला भेटायला गेलो तेंव्हा लक्षात आलं. मी घड्याळ विसरलो. मला आठवत नव्हत मी नक्की घड्याळ कुठं विसरलो. तर ते विचारायला मी फोन केला होता. कीर्ती मॅडम ना."

" मग वहिनी चिडल्या का ?"

" चिडली नाही. मला हसत होती. मी वेंधळा आहे. अस म्हणत होती." तो गाल फुगवून म्हणाला. त्यावर सगळे खळाळून हसले.

हे सगळे जण लक्ष्मी विकास को ऑपरेटिव्ह बँकेत, साधना नगर ब्रांच मधे काम करत होते. अविनाश सर बँकेत मॅनेजर होते. तर हर्षल सचिन रविंद्र सर किर्ती, सारिका मॅडम या बँकेत नोकरी करत होते. ते सगळे साधारण मध्यम वयीन लोकं होते. त्यातल्या त्यात हर्षलच काय तो तरुण मुलगा होता. हर्षल च नुकतच लग्न ठरलं होतं.त्यामुळे त्याचे इतर सहकारी त्याला चिडवत असे.त्याच्या वाढदिवसाला सुरभि ने म्हणजे त्याच्या होणाऱ्या बायकोने त्याला एक घड्याळ गिफ्ट दिलेलं होत.मागच्या आठवड्यात शुक्रवारी संध्याकाळी त्याला तिच्या सोबत सिनेमा बघायला जायचं होत. तर त्याने त्यांचं काम संपवलं. नी पटा पट तो बँकेतून गेला. सिनेमा थिएटर जवळ कॅफे मध्ये गेल्यावर त्याला समजलं त्याचं घड्याळ त्याच्या कडे नाही. त्याने आठवण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्याच्या लक्षात आले तो त्याचं घड्याळ बँकेत विसरला आहे. त्याची खात्री करून घेण्यासाठी त्याने बँकेत किर्ती मॅडम ना फोन करून विचारलं होत. त्यांनी त्याला सांगितल होत,

" हर्षल तुझं घड्याळ इथ बँकेत विसरला आहेस."

" ठिक आहे मॅडम मी सोमवारी आल्यावर घेतो. "

त्याने घड्याळ बँकेत विसरलं आहे का ? हा मॅसेज व्हॉट्स ॲप ग्रुप वर पोस्ट करून विचारला होता. नी आयताच या सगळ्यांच्या तावडीत सापडला. सगळे जण त्याला चिडवत होते. त्यामुळें सकाळीं बँकेचं शटर उघडताना त्याची घाई बघून सगळे त्याला चिडवत होते.

हासत खेळत त्यांचा दिवस सुरू झाला. पिऊन ने सगळ्यांना सकाळचा चहा दिला. क्लीन करण्यासाठीं येणाऱ्या बाई देखील आल्या होत्या. त्यांनी बँकेत झाडू पोछा केला. बँकेच्या रूटीनला सुरवात होत होती. दर सोमावरी बँकेच्या लॉकर रूम मध्ये पण पोछा केला जायचा. तर लॉकर रूम उघडण्यासाठी रविंद्र सर मॅनेजर साहेबांच्या केबिन मध्ये गेले. किल्ली घेऊन ते लॉकर रूम मध्ये आले.
बँकेचा वर्किंग स्टाफ बसतो.त्याच्या मागच्या बाजूला बँकेची स्ट्रोंग लॉकर रूम आहे.

रविंद्र सरांनी किल्ली ने लॉकर रूम चा पहिला दरवाजा उघडला. नंतर आत गेल्यावर दुसरा दरवाजा उघडला. समोरचं दृश्य बघून त्यांच्या पाया खालची जमीन सरकली. हृदयाची धडधड वाढली. श्वास पण कोंडला गेला. किंकाळी बाहेर पडणार इतक्यात त्यांनी त्यांच्या हाताचा पंजा तोंडावर घट्ट आवळला. बाणा सारखे धावत पळत ते मॅनेजर साहेबांच्या केबिनच्या दिशेने धावले.

" बँकेच्या लॉकर रूम मध्ये उलथा पालथ झाली होती. बऱ्या पैकी लॉकर चे दरवाजे उघडे होते. खोलीच्या मध्य भागी मोठा खड्डा दिसत होता."
बँकेत चोरी झाली होती. दरोडा पडला होता. अज्ञात व्यक्तींनी बँकेत घुसून लॉकर रुम मधील सुरक्षित ऐवज चोरून नेला होता.

क्रमशः


VedaV
WRITTEN BY

Veda

Read more

🎭 Series Post

View all