जलदलेखन स्पर्धा फेब्रुवारी 2026
भाग २
शांत झोपेत असताना तिच्या कानावर जोरजोरात दरवाजाची थाप ऐकू आली आणि ती त्याला घाबरून दचकून उठली. रात्री ती तशीच रडत रडत कधी जमिनीवर झोपी गेली तिचं तिलाच कळले नाही. तेव्हा झोपली ते आता अचानक तिला दरवाजाच्या आवाजाने जाग आली आणि ती दचकून उठली. घाबरून ती पुन्हा भिंतीला टेकून बसली आणि घाबरत एकटक दरवाजाकडे पाहू लागली. पुढच्याच क्षणी तिला दरवाजाच्या बाहेरून तिला तिच्या आई बाबांचा आवाज ऐकू आला. त्यांचा आवाज ऐकून तिला थोडा धीर आला. तिने जाऊन दरवाजा उघडला.
" हे काय बेटा... तू अजूनही कालच्याच कपड्यांमध्ये? काय झालं बरं वाटत नाही का तुला? चेहरा का असा उतरलाय तुझा?"
तिला समोर बघताच आईने तिला विचारले.
तिला समोर बघताच आईने तिला विचारले.
आईच्या प्रश्नाने ती भानावर आली आणि तिने तिचेच घातलेले कपडे पाहिले आणि तिला अचानक रडू कोसळले. तिने रडत रडतच आईला मिठी मारली. तिच्या अशा वागण्यामुळे आई बाबा दोघे थक्क झाले. दोघे तिला समजवण्याचा प्रयत्न करू लागले. दोघांनी तिला सोफ्यावर बसवले. बाबांनी तिला पाणी आणून दिले. पाणी पिऊन थोड्या वेळाने ती थोडी शांत झाली. आई बाबा पुन्हा तिला काय झाल्याचं विचारू लागले.
" आई... बाबा... मला माफ करा, मी चुकले."
ती पुन्हा रडत त्यांना म्हणाली.
ती पुन्हा रडत त्यांना म्हणाली.
" नक्की काय झालंय बेटा? आम्हाला नीट सांग. आणि तू शांत हो बघू आधी. काय चुकलीस तू?"
बाबांनी स्पष्ट शब्दात पण, हलक्या आवाजात तिला विचारले.
बाबांनी स्पष्ट शब्दात पण, हलक्या आवाजात तिला विचारले.
" बाबा मी त्याच्यावर विश्वास ठेवून चुकले. त्याच्या मनातला खेळ मी ओळखू नाही शकले. त्याच्या भोळ्या चेहऱ्यामागचा खरा चेहरा मला ओळखता आला नाही..."
ती रडतच त्यांना म्हणाली.
ती रडतच त्यांना म्हणाली.
" कोण? कोणाबद्दल बोलतेस तू? आणि काय झालं? प्रेमात वगैरे कोणी फसवलं का कोणी तुला? जे आहे ते आम्हाला स्पष्ट सांग बघू. आम्ही आहोत तुझ्यासोबत."
आई तिच्या खांद्यावर हात ठेऊन तिला हिंमत देत म्हणाली.
आई तिच्या खांद्यावर हात ठेऊन तिला हिंमत देत म्हणाली.
“आई… काल त्याने मला उशिरा ऑफिसमध्ये थांबवून ठेवलं. काम जास्त होतं म्हणून मीही थांबले. तो ओळखीचा होता. चांगला माणूस वाटला होता. म्हणून मला कधीच वाटलं नाही…”
तिचा आवाज अडखळला.
तिचा आवाज अडखळला.
“पण काल… त्याने माणुसकीची सगळी हद्द पार केली आई. एकटी आहे, हे त्याला माहीत होतं. माझ्या विश्वासाचा, माझ्या शांतपणाचा फायदा घेतला.”
ती क्षणभर थांबली.
ती क्षणभर थांबली.
“मी काहीच करू शकले नाही. कदाचित मी त्याला ओळखायला चुकले… म्हणूनच मी स्वतःलाच दोष देते.”
तिने डोळे खाली घातले.
तिने डोळे खाली घातले.
“माफ करा… मला माफ करा.”
ती म्हणाली.
ती म्हणाली.
" बाळ... तुझी यात काहीच चूक नाही. असल्या नराधमांना समाजात जगण्याचे स्थान नाही. तू नको काळजी करुस आम्ही आहोत तुझ्यासोबत काही झालं तरी. तू शांत हो, आपण आधी जाऊन त्या विरोधात पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवू. त्याला असाच सोडून फायदा नाही."
बाबा कठोर शब्दात म्हणाले.
बाबा कठोर शब्दात म्हणाले.
त्यांच्या बोलण्याने तिला धडकी भरली. पोलिसमध्ये तक्रार म्हणजे विचारपूस, प्रश्न, उत्तर हे सगळं आलंच. पण, बाबा म्हणतात ते ही बरोबर आहे. त्याला असंच सोडून चालणार नाही.
क्रमशः
लेखक : चेतन सुरेश सकपाळ.
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा