जलदलेखन स्पर्धा फेब्रुवारी 2026
भाग ३
ते तिघेही त्यांच्या मनाची तयारी करून पोलिस ठाण्यात पोहोचले. समोर असलेल्या माणसाकडे जाऊन त्यांनी तक्रार नोंदवायची असल्याचं सांगितलं. त्याने त्यांना दुसऱ्या एका कोपऱ्यात बसलेल्या माणसाकडे पाठवलं. ते तिघेही जड पावलांनी त्या टेबल जवळ गेले. पण, तिथे त्याचं लक्ष नव्हतं त्याच खाली कागदांमध्ये लक्ष होतं.
" बोला काय काम आहे?"
त्या टेबलवर असलेल्या माणसाने मान खाली घालूनच त्यांना विचारले.
त्या टेबलवर असलेल्या माणसाने मान खाली घालूनच त्यांना विचारले.
तक्रारदार म्हणून समोर उभी असली तरी तिच्या तोंडातून शब्द निघत नव्हता. काय बोलावे तिला समजत नव्हते. ती मान खाली घालून उभी होती. आई बाबा तिला पाहत होते.
" बोला लवकर काय काम आहे?"
त्यांच्याकडून काहीच उत्तर आले नाही हे कळताच त्याने पुन्हा विचारले.
त्यांच्याकडून काहीच उत्तर आले नाही हे कळताच त्याने पुन्हा विचारले.
" साहेब आम्हाला... एक तक्रार नोंदवायची आहे. आमच्या मुली सोबत... तिच्या ऑफिसमध्ये..."
बाबांच्या तोंडून स्पष्ट शब्द फुटत नव्हते. ते आजूबाजूला पाहत हळूच त्याला म्हणाले.
बाबांच्या तोंडून स्पष्ट शब्द फुटत नव्हते. ते आजूबाजूला पाहत हळूच त्याला म्हणाले.
" बसा..."
त्यांच्या तोंडून ते ऐकून त्याने मान करून तिला बघून समोरच्या खुर्चीवर बसायला सांगितले.
त्यांच्या तोंडून ते ऐकून त्याने मान करून तिला बघून समोरच्या खुर्चीवर बसायला सांगितले.
त्याने सांगितल्याप्रमाणे ती समोर बसली. त्याने समोर कागद घेतला आणि तिला प्रश्न विचारायला सुरुवात केली. आईने तिच्या खांद्यावर हात ठेवून तिला धीर दिला.
" ऑफिसच नाव काय?"
" त्या माणसाचे पूर्ण नाव?"
" घटना कुठे कशी घडली?"
" घटना घडली तेव्हा तिथे कोणीच नव्हतं का?"
" तू उशीरा पर्यंत का थांबली होतीस?"
" काही आरडाओरडा झाला का?"
" त्या माणसाचे पूर्ण नाव?"
" घटना कुठे कशी घडली?"
" घटना घडली तेव्हा तिथे कोणीच नव्हतं का?"
" तू उशीरा पर्यंत का थांबली होतीस?"
" काही आरडाओरडा झाला का?"
त्याच्या प्रश्नांनी तिला घाम फुटला. तिच्या नजरेसमोर ती खोली पुन्हा दिसली. तिच्या डोळ्यांमधून आपसुक अश्रू ओघळले. तिची मनस्थिती जाणून मागून आई बाबा दोघांनी तिच्या खांद्यावर हात ठेवला.
त्यांच्या आधाराने तिला थोडा धीर आला आणि तिने तिच्या ऑफीसच नाव आणि त्या व्यक्तीच पूर्ण नाव त्याला सांगितले. ते ऐकून त्याच्या हातातला पेन थांबला. तो तिच्या चेहऱ्याकडे पाहू लागला. त्यांना आलोच म्हणून सांगून तो आपल्या जागेवरून उठून आत वरिष्ठांच्या केबिनमध्ये निघून गेला.
काही वेळाने तो पुन्हा बाहेर त्याच्या जागेवर आला. काहीक क्षण शांत राहून तो बोलू लागला.
" बघा तक्रार नोंदवून घ्यायला हरकत नाही. पण, इतकं मोठं ऑफिस त्यांची बदनामी, सोबतच फुकट सर्वत्र मुलीची बदनामी होईल. समाजात तुम्हाला कुठे तोंड दाखवायला जागा राहणार नाही. तुम्ही या गोष्टीवर विचार करावा असं मला वाटतंय. उद्या जाऊन तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला त्रास व्हायला नको इतकंच वाटतं."
तो त्यांना समजावत म्हणाला.
तो त्यांना समजावत म्हणाला.
त्याच्या बोलण्यातला अचानक झालेला बदल पाहून तिघे थक्क झाले. आता त्यांच्या कानावर सारखे तिथले फोन वाजल्याचे आवाज येऊ लागले. त्यांच्यावर पडत असल्याचा दबाव त्यांच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होता. त्याने त्यांना त्यांच्या वरिष्ठांकडे देखील पाठवले. त्यांनी त्यांना एकट्यात समजावले. त्यांना घरी जाऊन या गोष्टीवर आणखीन विचार करायला सांगून जबरदस्तीने त्यांना तिथून घरी पाठवण्यात आले.
क्रमशः
लेखक : चेतन सुरेश सकपाळ.
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा