जलदलेखन स्पर्धा फेब्रुवारी 2026
भाग ४
तिथे त्यांना काहीच नाही मिळाले. ते तिघेही तिथून बाहेर पडले. मनात विचार केला होता तसे तिथे काहीच घडले नाही. पुढे काय करावे त्यांना काहीच समजत नव्हते. तिघांमधून कोणीच काहीच बोलत नव्हते. ते तिथून मुख्य गेटच्या बाहेर आले.
गेटच्या बाहेर येऊन चालत असतानाच तिने मान वर केली आणि तिला समोर चौकात मोठा महाराजांचा पुतळा दिसला आणि तिचे पाय जागीच थिजले. तिच्या डोळ्यांमध्ये अश्रू दाटून आले. मनात विचारांचे वादळ उठले. आईबाबांना ती मैत्रिणीकडे जात असल्याचं सांगून तिने त्यांना पुढे घरी निघून जायला सांगितले. तिला बोलून ती ऐकेना झाली. शेवटी तिला लवकर घरी यायचे सांगून ते तिथून घरी जाण्यासाठी निघाले. ते तिथून दिसेनासे झाल्यावर तिची पावले तिथून विरुद्ध दिशेला चालू लागले.
चालताना तिचे तिला भान राहिले नव्हते. ती तशीच भान हरपून चालत राहिली. चालता चालता तिची पाऊले एका ठिकाणी येऊन थांबली. तिच्या नकळत ती राजधानी वर येऊन पोहोचली होती, स्वराज्याच्या राजधानीवर...!
एका उंच खोल दरीच्या टोकावर ती उभी होती. ती अश्रू भरलेल्या नजरेने समोर शून्यात पाहू लागली. तिने तिचे डोळे घट्ट मिटून घेतले.
पुढच्या काहीक क्षणात तिच्या कानावर कसलातरी आवाज येऊ लागला. तिने लगेच आपले डोळे उघडले आणि समोरचे दृश्य पाहू लागली. समोर तिला दरबार भरलेला दिसला, महाराजांचा दरबार!
दरबारात कसला तरी खटला चालला होता. दरबारात मधोमध एक अपराधी साखळ दंडात बांधून असलेला दिसला. तो महाराजांकडे सुटकेसाठी विनवण्या करत होता. दरबार बऱ्याच माणसांनी भरलेला होता. त्या माणसांमध्येच एक स्त्री उभी असलेली तिला दिसली.
दरबारातील खटल्याला सुरुवात झाली. ते दृश्य पाहून तो खटला कशाबद्दल भरला आहे हे तिच्या ध्यानात आलं.
" स्वराज्यासाठी स्त्रिया म्हणजे, माते समान... जो कोणी त्यांचा सन्मान करणार नाही त्याची गय केली जाणार नाही. हात पाय छाटा ह्या नराधमाचे. चौरंगा करा ह्याचा."
खटला संपला निर्णय लागला होता. सर्वत्र नीरव शांतता पसरली.
खटला संपला निर्णय लागला होता. सर्वत्र नीरव शांतता पसरली.
अचानक टेकडीवरच्या गार वारा तिच्या अंगाला स्पर्शून गेला. आरोपीच्या किंचाळण्याने ती भानावर आली. तिच्या चेहऱ्यावरचे भाव बदलले. मनाशी काही तरी निश्चय करून ती मागे फिरली. तिची पावले घराकडे वळली. घरी जाऊन तिने तिचा निश्चय घरच्यांना सांगितला. ते सगळे मिळून पुढच्या प्रक्रियेला लागले.
क्रमशः
लेखक : चेतन सुरेश सकपाळ.
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा