हे बंध रेशमाचे - भाग 8

Love story

हे बंध रेशमाचे - भाग 8


नेहा आणि आनंद या दोघांचही आपापलं रुटीन सुरू  असत....लग्नाचा विषय तात्पुरता बाजूला झाला असला तरी त्या दोघांशीही बोलणं गरजेचं होतं...एक दिवस नेहा अनाथाश्रमातून नुकतीच घरी आली होती....त्यामुळे ती खुश दिसत होती....हीच संधी साधून आप्पानी नेहाशी बोलायचं ठरवलं.....


अप्पा    -  "दमलेयस का बाळा ? ....थोडं बोलायच होतं.."
नेहा   -  "बाबा बोला ना "
अप्पा  -  "आपल्याकडे त्या वृषालीताई आल्या होत्या आठवतय तुला ?" 
नेहा  - "हो , त्यांचं काय पण "
अप्पा - "त्यांनी त्यांच्या मुलासाठी तुला लग्नाची मागणी घातली आहे...."
नेहा - "पण मी तुम्हाला सोडून कुठेही जाणार नाही "
अप्पा - "अग वेडाबाई लगेच तुझं उद्याच लग्न लावून नाही देत ...." ते हसत म्हणाले....
"हा बघ मुलाचा फोटो ...आनंद नाव आहे त्याचं.... चांगला डॉक्टर आहे...त्यांचं हॉस्पिटल आहे मोठं मुंबईला स्वतःच...." आप्पानी नेहाकडे फोटो दिला....


नेहाने तो फोटो पाहिला.... आणि फोटो घेऊन ती आपल्या खोलीत निघून गेली...आप्पाना काही कळेना....असुदे थोड्या वेळाने विचारू तिला.. ....असा विचार करून ते तिथेच बसले....


नेहा फोटो घेऊन खोलीत आली....तिनं खोलीचं दार लावलं...आनंदचा फोटो तिन नीट पाहिला... घारे डोळे, उजळ रंग ....मोठं कपाळ..तिला तो आवडला होता..!!!!..कितीतरी वेळ ती फोटो हातात धरून बसली होती....जणू काही तिच्या स्वप्नातला राजकुमार तिच्यासाठीच आला होता....!!!!!..... ती आपल्या विचारातून बाहेर आली...खोलीचं दार ढकलून आप्पा आत आले.....


अप्पा - "पहिलास का फोटो ?"
नेहा - "हं....."
अप्पा - "कसा आहे मुलगा , तुला नसेल आवडला तर तस सांगू आपण त्यांना ...."
नेहा - "पण मी अस कधी म्हटलं ....." .आपण काय बोललो हे लक्षात येताच नेहाने जीभ चावली.आणि ती मान खाली घालून बसून राहिली........
अप्पा - " अस होय..... छान झालं...मग आपली पसंती कळवू ना त्यांना ....? "
नेहाने होकारार्थी मान हलवली......आता प्रश्न होता तो फक्त आनंदच्या होकाराचा .....!!!!!... आप्पानी वृषालीताईंना फोन करुन नेहाला आनंद पसंत असल्याचं सांगितलं ......त्याही खुश झाल्या....आनंदशी बोलून मी कळवेन अस सांगून त्यांनी फोन ठेवला ....

..........…...........

आनंद रेग्युलर हॉस्पिटलला जात होता....त्याच वागणं, बोलणं यामुळे कोणावरही त्याची छाप पडत असे....त्याच्या हाताखाली काम करणाऱ्या ज्युनिअर डॉक्टर्स आणि इंटर्नशीपसाठी आलेल्या विद्यार्थ्यांना तो प्रत्येक गोष्ट नीट समजावून सांगे.... त्यामुळे त्याच्यावर सर्वजण खुश असत.....आनंद दिसायला छान देखणा होता शिवाय वागणं बोलणंही उत्तम ....त्यामुळे इंटर्नशिपला येणाऱ्या मुली देखील त्याच्यावर फिदा झाल्या होत्या....

"कसले हँडसम आहेत ना ग आनंद सर ...."
"हो ना, सांगतात पण छान समजावून लगेच कळतं...."
"त्यांचं बोलणं तर ऐकत राहावंसं वाटत..."
"जाम भारी आहेत ते.....पण चिडले की कोणी उभं सुध्दा राहत नाही त्यांच्यासमोर....."

इंटर्नशीपसाठी आलेल्या मुलांमध्ये अशा चर्चा रंगत.... शिवाय ज्युनिअर डॉक्टर्स पैकी काही डॉक्टर ही आनंद भोवती घुटमळत असतं......पण आनंदला त्याच काही वाटत नसे....पेशंटची ओ.पी.डी संपल्यानंतर तो केबिन मध्ये बसून अभ्यास करत असे....डॉ .परांजपे , डॉ.सर्वजण त्याला मार्गदर्शन करत ....

एक दिवस आनंद लवकर घरी आला होता....हॉस्पिटल मध्येही त्याला जास्त काम न्हवतं.... त्यामुळे घरी जाऊन मस्त आराम करावा या विचाराने तो घरी आला....
तेवढ्यात हॉस्पिटल मधून त्याला इमर्जन्सीचा कॉल आला....एक अक्सिडेंट केस होती....त्यामुळे त्याला तातडीने  हॉस्पिटलला बोलावलं होतं.....आल्या पावलीच आनंद पुन्हा हॉस्पिटलला गेला...एका मुलीची कार ओव्हरटेक करताना समोरून येणाऱ्या बसला धडकली होती....बसच फारस नुकसान झाल न्हवतं ....पण त्या मुलीला बऱ्यापैकी लागलं होतं...बाहेर फेकले गेल्यामुळे तिच्या डोक्याला मार बसला होता....हातापायांना खरचटलं होत....त्याने तातडीने सर्व स्टाफला उपचार करण्यास सांगितले.....डोक्याला लागल्यामुळे तिच्या चेहऱ्यावर रक्त ओघळलं होतं.... त्यामुळे तिचा चेहरा नीट ओळखू येत न्हवता......


............................

आनंदने त्या मुलीचे चेकअप केले...ती अजूनही बेशुद्धच होती .....त्याने उपचार सुरू केले होते...नर्सला सुचना देऊन .....बाहेर ज्या लोकांनी तिला ऍडमिट केलं त्यांच्याशी बोलण्यासाठी आनंद बाहेर आला....

"तुमच्यापैकी कोण ओळखत का त्या मुलीला....?" 

"नाही डॉक्टर ती रस्त्यात पडलेली दिसली सो आम्ही तिला आमच्या गाडीतून हॉस्पिटलला आणलं ....बाकी तिचाबद्दल आम्हाला काही माहीत नाही .."

अस बोलून ती लोक निघून गेली ...आनंदला वाटत होते की तिच्या घरच्यांना कळवणे गरजेचे आहे....पण तिचा घरच्यांशी कसा संपर्क साधायचा हे त्याला कळत न्हवते.... कोणतीही अपघाताची केस आल्यास तो ती आधी हँडल करी ....अपघात झालेल्यांना वेळेत उपचार मिळाले पाहिजेत अस त्याला वाटे...त्यामुळे बाकी पोलीस केस करणे आणि अन्य फॉर्मलिटीस तो नंतर करत असे.....श्रीकांत गेल्यापासून ; अपघाताची बातमी आल्यास तो स्वतः जाऊन त्या रुग्णाचे उपचार करी.... आपल्या बाबांना वेळेवर उपचार मिळू शकले नाहीत ही सल त्याच्या मनात कायम होती....


...........................

दोन दिवसांनंतर त्या मुलीला शुद्ध आली .....नर्सने लगेच आनंदला फोन करून पेशंट शुद्धीवर आल्याच त्याला सांगितलं.... मी थोड्या वेळाने चेकअपसाठी येतो ' असे सांगून त्याने फोन ठेवला...शुद्धीवर आल्यानंतर त्या मुलीला सर्व चेहरे अनोळखी दिसत होते...आपण हॉस्पिटलला कसे आलो हे तिला आठवत न्हवते....मग जवळच उभ्या असलेल्या नर्सने तिला तिचा अक्सिडेंट झाला त्यामुळे हॉस्पिटलला आणलं गेलं हे थोडक्यात सांगितलं...
तोपर्यंत आनंद चेकअपसाठी आला होता..आल्या आल्या त्याने तिचे रिपोर्ट्स चेक केले...त्यावेळी आनंदची त्या मुलीकडे पाठ होती....तिला चेकअप करण्यासाठी तो वळला....

"आनंद .....??? .....आनंद तू......??? ".......दोघेही आश्चर्याने एकमेकांकडे पाहत होते ....

ती होती आनंदची कॉलेज फ्रेंड......मिताली...!!!!

क्रमशः......

🎭 Series Post

View all