हे बंध रेशमाचे - भाग 24

Love story

हे बंध रेशमाचे - भाग 24

आनंद तरातरा चालत त्या दोघांजवळ आला. 

"पियुष काय चाललंय हे मला कळेल का ? " त्यानं स्वतःला शांत करत विचारलं.

त्याच्या आवाजाने पियुष आणि नेहाने मागे वळून पाहिलं. तिनं पटकन पियुषच्या हातातून आपला हात सोडवून घेतला. पण पायाला लागल्यामुळे तिला पाय टेकवता येईना. पुन्हा तिचा तोल जाणार इतक्यात आनंदने तिला पकडलं. पियुष कडे दुर्लक्ष करून तो नेहाला धरून हळू हळू खुर्ची जवळ घेऊन गेला. त्यानं तिला मागून घट्ट पकडलं होतं कदाचित तिचा तोल जाईल म्हणून तो काळजी घेत होता. नेहाला मात्र या सगळ्याच आश्चर्य वाटत होतं.आनंद आज काहीतरी वेगळाच जाणवला तिला. त्याने तिला नीट आधार देऊन खुर्चीवर बसवलं आणि तो पाहुण्यांशी बोलण्यासाठी गेला. कोणीतरी जाऊन म्युझिक सिस्टीम चालू केली. त्यामुळे सगळेचजण नाचू लागले. काही कपल्स डान्स करायला लागले तर काही जण आपापल्या फ्रेंड्स सोबत नाचत होते. मिताली आनंद उभा होता तिथे आली आणि त्याला नाचण्यासाठी आग्रह करू लागली. ती मुद्दाम नेहाला दिसेल अशा अंतरावर येऊन उभी राहिली आणि आनंदच्या खांद्यावर हात ठेवून नाचू लागली. नेहाने तिकडे बघितलं तिला कसंतरीच झालं तिनं आपली नजर दुसरीकडे वळवण्याचा प्रयन्त केला पण तरीही तिचं लक्ष त्या दोघांकडेच होतं. आनंद मिताली सोबत नुसता नाचल्यासारखं दाखवत होता पण त्याचं सगळं लक्ष मात्र नेहाकडे होतं. कोणतरी येऊन तिला डान्स करायला नेईल अस त्याला वाटलं. पण आपल्याला आज असं का वाटतंय असा एक विचार त्याच्या मनात डोकावून गेला. मग त्यानं मितालीला आपल्यापासून दूर केलं आणि स्टेजवर गेला. सर्वाना त्यानं डिनर तयार असल्याचं सांगितलं आणि सर्वांनी त्याचा आस्वाद घ्यावा ही विनंती केली. तो स्टेजवरून उतरून नेहजवळ आला आणि तू इथेच बस मी तुझ्यासाठी इथेच जेवण घेऊन येतो असं त्यानं तिला सांगितलं. नेहाला खरंतर खूप छान वाटत होतं.पण हे प्रेम आहे की आनंद आपल्या मित्रांसमोर म्हणून देखावा करतोय ते तिला कळेना. तिनं शांत राहून जे होईल ते बघायचं असं ठरवलं. सर्वजण हळू हळू जाऊन डिनर घेऊन येत होते. जेवणात पंजाबी आणि महाराष्ट्रीयन असे दोन्ही पदार्थ होते. प्रत्येक जण आपापल्या आवडीप्रमाणे वाढून घेत होते. एक बाजूला त्यासाठी टेबल्स मांडली होती. वृषालीताई प्रत्येकाला काय हवं नको ते आग्रहाने विचारत होत्या. त्यामुळे पाहुण्याकडे लक्ष द्यायची आनंदला गरज नव्हती. त्यानं एका ताटात जिरा राईस , दाल फ्राय , व्हेज कढाई अस नेहासाठी वाढून आणलं. 

"हे चालेल ना तुला की दुसरं काही आणू अजून " त्यानं तिला ताट दाखवत विचारलं

"खाईन मी .." ती म्हणाली

"सुरवात कर तोपर्यंत मी स्वीट डिश घेऊन येतो.." अस बोलून तो तिच्यासाठी स्वीट आणायला गेला. तो पदार्थ मांडले होते त्या टेबल जवळ आला. गुलाबजाम , बासुंदी, रासमालाई आणि वेगवेगळ्या प्रकारचे केक पेस्ट्रीज तिथे मांडल्या होत्या. त्यानं एका बाउल मध्ये गुलाबजाम घेतले आणि तो नेहाजवळ आला. त्यानं तिच्यासाठी वाढून आणलं होतं पण  तिनं जेवायला सुरवात नव्हती केली. आनंद अजून जेवायचा होता त्यामुळे ती वाट बघत होती.  तो बाउल घेऊन तिच्या इथे आला. आधीच ती ताट घेऊन बसली होती त्यामुळे बाउल कुठे ठेवायचा तिला प्रश्न पडला. तस त्यानं सांगितलं 'तू जेव सावकाश मी थांबतो इथे हे घेऊन..'असं सांगितलं. तोपर्यंत बाकीच्यांच डिनर झालं होतं सगळी हळूहळू घरी जायला निघाली. आनंदच्या मित्रांचा ग्रुप जेऊन निघत होता त्यामुळे त्याला भेटायला सगळेजण आले. 

"काय आनंद बायकोची सेवा वाटतं ? " केदारने हसून विचारलं.

"नाही रे तिच्या पायाला दगड लागला मगाशी सो तिला इथेच जेवण घेऊन आलो. " त्यान सांगितलं.

"हो का....चांगलं आहे..." केदार बोलला त्यावर सगळे हसायला लागले. 

"अरे मग तिला भरव ना नुसता बाउल घेऊन काय उभा आहेस.. " केदार बोलला तसे सगळेच त्याला नेहाला भरवण्यासाठी आग्रह करू लागले.

त्याने नेहाकडे पाहिलं. लग्नाच्या दिवशी सुद्धा त्याने जीवावर आल्यासारखं तिला घास भरवला होता आणि आज पुन्हा तिला असं भरवताना त्याला काहीतरी वेगळं वाटत होतं. त्याने गुलाबजामचा एक घास उभ्यानेच नेहाला भरवला. नकळत तिच्या चेहऱ्यावर स्माईल आली होती. त्याने भरवल्यावर सगळ्यांनी एकच हुर्यो केला..टाळ्या वाजवल्या. 

"तुम्ही जेवलात का ? " नेहाने हळू आवाजात आनंदला विचारलं. तो मानेनेच नाही म्हणाला. 

केदारच्या ते लक्षात आलं..तो म्हणाला 

"अरे आनंद तू पण जेवायचायस ना ? मग मी वेटरला तुझं ताट इथेच आणायला सांगतो थांब ..." अस सांगून केदार वेटरला सांगायला गेला.

आनंद नको नको म्हणेपर्यंत त्या दोघांसमोर एक टेबल आणलं गेलं आणि खुर्ची ठेवली गेली. केदारने नेहाला तसच पुढे होऊन ती खुर्ची टेबल जवळ आणायला सांगितले तिनं मग त्याप्रमाणे केलं आणि हातातलं ताट टेबलवर ठेवलं. तोपर्यंत आनंदच देखील ताट आलं होतं. दोघेही समोरासमोर जेवायला बसले. 

"चला तुम्ही जेवा सावकाश आम्ही निघतो .....Happy married life both u you " असं बोलून सगळे फ्रेंड्स निघून गेले. त्यांच्यासोबत मिताली देखील आनंद आणि नेहाला बाय करून घरी निघून गेली.

"तुला अजून काही हवंय का ?" आनंदने नेहाला विचारलं

ती मानेनंच नाही म्हणाली. खरतर आजच्या त्याच्या चांगल्या वागण्यानेच तिचं पोट भरलं होतं. वृषालीताई दुरूनच हे सगळं पाहत होत्या. आनंदची गाडी हळूहळू रुळावर येतेय असं त्यांना वाटलं. त्यांच्याही ओळखीच्या बायका आल्या होत्या . त्या त्यांच्या सोबत गप्पा मारत जेवत होत्या. 

.........................

एकेक करून पार्टीला आलेली सगळी माणसं घरी जाऊ लागली. जाताना पार्टी छान झाल्याचं त्यांनी आवर्जून आनंद आणि नेहाला सांगितलं. बहुतेकशी सगळी माणसं गेली होती. त्यामुळे आनंद नेहाला धरून वरती रूम मध्ये सोडून आला. वृषालीताई देखील आत घरात गेल्या. आनंदची मैत्रीण स्नेहा आनंदला बाय करायला थांबली होती. तो नेहाला सोडून पुन्हा खाली आला. 

"चल मी पण निघते आता....छान झाली पार्टी..You both are looking so beautiful...!!!"  स्नेहा म्हणाली.

"Thank u so much dear..."  तो हसून म्हणाला

"आनंद एक विचारू ? " 

"बोल ना...विचारायचं काय त्यात..." तो म्हणाला

"नाही थोडं पर्सनल आहे म्हणून........." स्नेहा

"बोल तू बिनधास्त " आनंद

"तुझ्यामध्ये आणि नेहामध्ये सगळं ठीक आहे ना ? " स्नेहा

"का ? असं का विचारतेयस ? " त्याच्या चेहऱ्यावर प्रश्नचिन्ह होतं.

"का माहीत नाही पण मला वाटलं की तुमचं रिलेशन नीट नाही चाललंय....अरे नव्याने लग्न झालेले कपल्स किती खुश असतात....कायम एकमेकांच्या सोबत राहण्यासाठी धडपडत असतात....तुमच्या कडे बघून तसं काहीच जाणवलं नाही...Sorry  पण मी जरा स्पष्टच बोलतेय..." स्नेहा

आनंदने इकडे तिकडे पाहिलं आणि तो बोलू लागला.
"खरंतर मला आत्ता लग्न करायचंच नव्हतं. हॉस्पिटल आणि अभ्यास यातच माझा सगळा वेळ जातो. आईच्या शब्दाखातर मी हे लग्न केलं. पण नेहा अगदीच काकूबाई आहे ग...काहीही करताना तिला भीती वाटते. कशी राहते कशी वागते..माझ्यासारख्या डॉक्टरची बायको कोण म्हणेल का तिला...अगदीच गावंढळ असल्यासारखी असते ग...."  त्यानं सांगितलं

"हे बघ आनंद गावंढळ असणं आणि शहरी असणं हा आपण जिथे राहतो तिथला परिणाम आहे. यावरून ती कशी आहे हे सिद्ध होत नाही. कदाचित ती वेल एज्युकेटेड सुद्धा असू शकते....आणि राहिला प्रश्न तिच्या राहण्याचा तर एखाद्या माणूस साधा असू शकतो म्हणून तो बावळट नसतो...हे लक्षात घे.." ती सांगत होती. आनंदला आज त्याचेच विचार नव्याने ऎकवणार कोणीतरी भेटलं होतं. 


"पण मला नाही आवडत अशा मुली...पण का कोण जाणे आज मात्र नेहा वेगळीच वाटत होती मला..त्या वन पिस मध्ये आणि साडी मध्येही ती खूप सुंदर दिसत होती..तिच्याकडे बघतच राहावंसं वाटत होतं..ती त्या ड्रेस मध्ये इतकी सूंदर दिसेल अशी मी अपेक्षाच केली नव्हती..." आनंद म्हणाला.


"हाच फरक आहे तुझ्यात आणि तिच्यात तिन तुझ्या इच्छेसाठी तो ड्रेस घातला तिला पटत नसताना सुद्धा...सो याचा विचार कर...ती साधी आहे इतकंच... तिला समजून घे. काम करण्यासाठी आत्मविश्वास दे....आधी तिला एक माणूस म्हणून तरी समजून तर घ्यायचा प्रयन्त कर..." स्नेहा बोलत होती...आनंद भान हरपल्या सारख ऐकत होता तिचा प्रत्येक शब्द...!!!


"चल मी निघते आता...." आनंदला शेकहँड करून 'happy married life 'म्हणून ती निघून गेली.आनंदही तिच्या बोलण्याचा विचार करत घरात आला.


क्रमशः...


प्रिय वाचक 
तुमच्या सगळ्यांच्या कमेंट्स वाचून आणि पुढच्या  भागाबद्दलची तुमची उत्सुकता पाहून खरच खूप बरं वाटलं. कथेबद्दल तुमचे अभिप्राय खरच फार छान आहेत. माझ्या काही कामांमुळे किंवा साईट प्रॉब्लेम मुळे भाग पोस्ट करायला उशीर होतो. तरी शक्यतो एक दिवस आड पुढील भाग पोस्ट करायचा माझा प्रयन्त असतो. कथेचे भाग लहान असतात याची मला कल्पना आहे. परंतु मी सगळं टायपिंग पूर्णतः मोबाईलवर करतेय आणि भाग पोस्ट करतेय. त्यामुळे भाग लहान असला तरी तुम्हाला तो वाचावासा वाटेल या कडे लक्ष दिलं जातंय. I hope की तुम्ही मला समजून घ्याल.  धन्यवाद.

🎭 Series Post

View all